सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर कमीतकमी दरात विकावे
- पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे
- मेडीकल स्टोअर्सवरील फार्मासिस्ट, कर्मचारी यांचे लसीकरण करावे
बुलडाणा, (जिमाका) दि 19 : कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शन आता जिल्ह्यामध्ये 1110 रु ते 1400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिली आहे.
रेमेडेसिवीर औषधांच्या दर, उपलब्धतेबाबत जिल्हा केमीस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन समवेत बैठकीचे आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके, केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव गजानन शिंदे, अमरावती विभागाचे राम ऐलानी आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन घ्यावी लागत आहे. परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसीविर इंजेक्शनची खरेदी किंमत कमी झालेली असतांनादेखील एमआरपी दराने हे इंजेक्शन विकून एकप्रकारे ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याची बाब अन्न औषध प्रशासन मंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निर्दशनास आली. त्यांनी हे दर कमी कसे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर खरेदी किमतीवर फक्त 10 टक्केच मार्जिन घेऊन त्याची ग्राहकांना विक्री करावी असे आवाहन केले.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत औषधी दुकानदारांनी देखील जिल्ह्यामध्ये 1110 ते 1400 रुपयापर्यंत रेमडेसीविर इंजेक्शन ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दर्शविली असून आता जिल्ह्यात 1110 ते 1400 रुपायापर्यंतच रेमडेसीविर इंजेक्शन मिळणार आहे. तसेच लवकरच सदर कंपनीशी चर्चा करून सर्व विक्रेत्यांना एकाच दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णांना हे इंजेक्शन फक्त 1110 रुपयात मिळणार असून एकप्रकारे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
*****************
कोरोना अलर्ट : प्राप्त 4703 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 732 पॉझिटिव्ह
• 387 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5435 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4703 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 732 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 432 व रॅपीड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 637 तर रॅपिड टेस्टमधील 3765 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4402 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 92, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, नांद्राकोळी 1, दहीद 1, धाड 4, कुंबेफळ 1, घाटनांद्रा 1, चांडोळ 1, सुंदरखेड 3, कुलमखेड 1, डोंगरखंडाळा 2, सागवन 4, शिरपूर 1, बिरसिंगपूर 3, पोखरी 1, डोमरूळ 1, कोलवड 4, मलकापूर शहर : 13, मलकापूर तालुका : दसरखेड 4, लासुरा 2, सावळी 1, उमाळी 1, नरवेल 1, पिंपळखुटा 5, निंबारी 3, लोणवडी 1, देवधाबा 2, वाघुड 3, बहापुरा 1, चिखली शहर : 63, चिखली तालुका : ढासाळवाडी 1, पेठ 1, मेरा 2, खासगांव 1, केळवद 1, खैरव 1, पेनटाकळी 1, सावरगांव 1, सवणा 2, मोहाडी 1, मोहोज 1, अमडापूर 2, मंगरूळ नवघरे 1, पळसखेड 1, हातणी 2, वैरागड 1, रानअंत्री 1, सोनेवाडी 2, येवता 7, गांगलगांव 1, शेलूद 1, इसोली 2, उंद्री 2, मोताळा शहर : 23, मोताळा तालुका : तालखेड 1, शिरवा 1, शेलापूर 1, कोथळी 1, डिडोळा 1, लिहा बु 3, रोहीणखेड 1, गुळभेली 2, परडा 7, खरबडी 1, बोराखेडी 1, किन्होळा 1, घुस्सर 1, आव्हा 1, कुऱ्हा 1, पिं. देवी 3, सारोहा 1, पिंपळपाटी 1, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आडोळ 3, मानेगांव 5, गोळेगांव खु 2, आसलगांव 8, दे. राजा शहर : 7, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, पाडळी शिंदे 2, अंढेरा 1, सिनगांव जहा 1, असोला जहा 1, सुरा 1, दे. मही 7, दिग्रस 1, गिरोली 1, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : बाळसमुद्र 1, शिंदी 1, वरूडी 1, साखरखेर्डा 2, दत्तपूर 5, आडगांव राजा 2, सावरगांव माळी 2, शिवणी टाका 1, देवखेड 2, हिवरखेड 1, उमरद 1, कि. राजा 1, शेंदुर्जन 1, गुंज 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : सोनाळा 2, टाकळेश्वर 1, वरवट खंडेराव 1, बावनबीर 4, पातुर्डा 3, वानखेड 3, वरवट 4, उकडगांव 2, शेगांव शहर : 46, शेगांव तालुका : गौलखेड 1, लोहारा 2, लासुरा 1, गायगांव 1, माटरगांव 1, जवळा 2, जानोरी 1, काटोडा 1, खामगांव शहर : 92, खामगांव तालुका : किन्ही महादेव 1, पिं. राजा 1, जनुना 2, निमकवळा 1, पिंप्री कोरडे 1, हिंगणा कारेगांव 1, सुटाळा 6, मेहकर तालुका : डोणगांव 1, जानेफळ 2, सांगवी 1, वर्दडी वैराळ 3, हिवरा आश्रम 11, रत्नापूर 5, बाभुळखेड 2, उकळी 5, कळमेश्वर 2, जयताळा 3, महागांव 1, ब्रम्हपूरी 1, दे. माळी 6, अंत्री देशमुख 1, मेहकर शहर : 21, नांदुरा शहर : 4, नांदुरा तालुका : काटी 1, शिरसोळी 1, हिंगणा 2, शेंबा 3, खैरा 2, टाकरखेड 3, टाकळी वतपाळ 2, चांदुर बिस्वा 3, वडनेर 1, धानोरा 4, लोणार तालुका : तांबोळा 1, मोप 1, गांधारी 1, धायफळ 1, महारचिकना 1, पिंपळनेर 1, बिबी 1, असोला 1, सुलतानपूर 2, पळसखेड 2, देऊळगांव 2, बिबखेड 1, मांडवा 1, बोरखेडी 5, देऊळगांव वायसा 14, खळेगांव 6, लोणार शहर : 20, मूळ पत्ता पारध जि जालना 1, तुळजा खु जि. अकोला 1, खोगी ता. पातुर 1, फर्दापूर जि. जळगांव 1, यावल जि जळगांव 1, जालना 1, रिसोड जि वाशिम 1, वालसावंगी जि. जालना 1, जाफ्राबाद जि जालना 1, सोनखेड जि.जालना 1, अमरावती 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 732 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान संजसय नगर, दे. राजा येथील 50 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरूष, जानेफळ ता. मेहकर येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 387 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग 34, मुलींचे वसतीगृह 46, कोविड हॉस्पीटल 9, खामगांव : 14, शेगाव : 96, दे. राजा : 41, मेहकर : 27, मलकापूर : 38, लोणार : 7, मोताळा : 26, जळगांव जामोद : 3, सिं. राजा : 7, चिखली : 39,
तसेच आजपर्यंत 177154 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 23503 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23503 आहे.
तसेच 4202 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 177154 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 28537 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 23503 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4802 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 232 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
*****
महाडीबीटी पोर्टल योजनाः अर्ज एक, योजना अनेक..!
• जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषि योजनांचा लाभही एकाच अर्जाद्वारे
• महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांची अर्ज करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टल योजना ही अर्ज एक व योजना अनेक असलेली आहे. या दोन्ही योजनांमध्ये नविन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, शेततळे अस्तरीकरण, इलेक्ट्रीक मोटार पंप, ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच याबाबींकरीता सुद्धा महाडीबीटीवर अर्ज करता येणार आहे.
महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
सदर कामासाठी जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेता येणार आहे. तसेच तांत्रिक अडचण असल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई मेलवर किंवा 020-25511479 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कृषि विकास धिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.
*****
जळगांव जामोद – पुणे बसमध्ये बनावट पास जप्त
- वाहकाने केली कारवाई
बुलडाणा,(जिमाका) दि.19 : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगांव जामोद आगाराच्या जळगांव जामोद – पुणे बसमध्ये वाहकाच्या चाणाक्षतेने राज्य परिवहन कर्मचाऱ्याची बनावट पास जप्त करण्यात आली. वाहक योगेश दत्तात्रय किवंडे बिल्ला क्रमांक 83056 हे 6 फेब्रुवारी 2021 रोजी बस पुणे ते जळगांव जामोद फेरीवर कर्तव्य बजावित होते. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून सदर बस दु 3 वाजता जळगांव जामोदकडे निघाली.
प्रवाशांना तिकिटे देत असताना एजाज पठाण यांनी रा. प कर्मचाऱ्याची मोफत प्रवास सवलत पास दाखविली. सदर पास बनावट असल्याची शंका वाहकाला आली असता त्यांनी हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये बस थांबवून सदर पास व पासधारक प्रवाशाला पोलीसांच्या ताब्यात दिले. औरंगाबाद आगार क्रमांक 2 येथेस सदर पासची तपासणी केली असता ती पास बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनला वाहकाने तक्रार दिली. वाहक योगेश किवंडे यांच्या चतुराईने रा. प महामंडळाच्या अशा बनावट पास बनविल्या जात असल्याचा खुलासा झाला. आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविले. या कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी वाहकाचा सत्कार केला.
*******
No comments:
Post a Comment