कोरोना अलर्ट : प्राप्त 437 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 118 पॉझिटिव्ह
- 288 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.1: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 555 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 437 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 118 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 47 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 137 तर रॅपिड टेस्टमधील 300 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 437 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, चिखली शहर : 5, चिखली तालुका : शेलूद 1, मलकापूर शहर : 24, मलकापूर तालुका : वरखेड 1, जांभुळधाबा 1, शेगांव तालुका : जवळा 1, शेगांव शहर : 6, शेगांव तालुका : वरखेड 1, मनसगांव 1, खामगांव शहर : 17, खामगांव तालुका : सुटाळा बु 1, घाटपुरी 1, बुलडाणा शहर : 21, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, रायपूर 1,वरवंड 1,मढ 1, डोंगरखंडाळा 1, म्हसला 1, मोताळा तालुका : गोतमारा 1, दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : पोखरी 1, दे. मही 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : खंडाळा 2, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : खांडवी 2, सिं. राजा शहर : 9, मूळ पत्ता अंदूरा ता. बाळापूर जि. अकोला 1, वडगांव वरूड जि. अमरावती 1, मुक्ताई नगर जि. जळगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 118 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डोंगरखंडाळा ता. बुलडाणा येथील 77 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 288 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 45, बुलडाणा : अपंग विद्यालय 56, स्त्री रूग्णालय 12, कोविड समर्पित रूग्णालय 6, नांदुरा : 14, दे. राजा : 72, लोणार : 6, सिं. राजा : 6, चिखली : 54, जळगांव जामोद : 8, मलकापूर : 9.
तसेच आजपर्यंत 137269 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16064 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 16064 आहे.
आज रोजी 9335 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 137269 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 18786 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 16064 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2528 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 194 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*****
कोविड लसीकरणाचा 60 वर्षावरील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
- जिल्हयात 60 वर्षावरील व्यक्तींचे शासकीय रूग्णालयात मोफत लसीकरण
- लसीकरणासाठी सध्या 4 खाजगी रूग्णालयांना मान्यता
- दोन डोससाठी खाजगी रूग्णालयात 500 रूपये आकारणी
- लसीकरणासाठी कोविन, आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी सुरू
- https://selfregistration.
cowin.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करता येते
बुलडाणा,(जिमाका) दि.1: कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. पहिल्या दोन फळीतील लसीकरणानंतर तिसऱ्या फळीतील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त व्यक्तीना लस देण्यात येणार आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी या फळीतील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ सावके उपस्थित होते.
लसीकरणासाठी COWIN, AAROGYA SETU या ॲपवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे https:// selfregistration.cowin.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी या ॲप, संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्राच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी सुरू राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या संदेशामध्ये लसीकरण सत्राचे ठिकाण, दिनांक व वेळ याची माहिती देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 13 शासकीय रूग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील शासकीय रूग्णालय आहे. या ठिकाणी विनामूल्य लसीकरण करण्यात येणार आहे. तर अमृत हृदयालय व मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, कोलते हॉस्पीटल मलकापूर व कोठारी हॉस्पीटल चिखली या चार खाजगी रूग्णालयांमध्ये दोन डोससाठी 500 रूपये आकारण्यात येणार आहे. भविष्यात आणखी हॉस्पीटल यामध्ये जोडण्यात येणार आहे. एक डोस 250 रूपयांना मिळणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणीसुद्धा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका लसीकरण केंद्राला 100 व्यक्तींचे दैनंदिन उद्दिष्ट असणार आहे. त्याचप्रमाणे 45 ते 60 वर्षादरम्यान असलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींनासुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 3615 बेड कोविड रूग्णांसाठी उपलब्ध आहे.
स्त्री रूग्णालय परीसरात लिक्वीड ऑक्सीजन टँकमध्ये 20 किलोलीटर ऑक्सीजनची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी ऑक्सीजनची निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे. सध्या यंत्रणेकडे जंबो, टेरा सिलींडर उपलब्ध आहेत. त्यामुळे रूग्णांची ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असताना शासनाने निर्धारीत केलेल्या दरापेक्षा अधिकचा दर घेतल्याचे समोर आल्यास किंवा तशी तक्रार आल्यास संबंधीत रूग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी 250 रूपये प्रतिडोस दर द्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
********
No comments:
Post a Comment