कोरोना अलर्ट
: प्राप्त 2249 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 446 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.4: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट
टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2695 अहवाल प्राप्त झाले आहेत.
यापैकी 2249 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 446 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 360 व रॅपीड टेस्टमधील 86
अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1610 तर रॅपिड
टेस्टमधील 639 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2249 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगाव शहर : 34,
शेगांव तालुका : टाकळी विरो 7, खेर्डा 1, सगोडा 1, जलंब 1, पहुरजिरा 3, खामगांव
शहर : 34, खामगांव तालुका : पिं. राजा 2, लोणी गुरव 1, लाखनवाडा 1, पळशी 7, सुटाळा
बु 7, किन्ही महादेव 15, गारडगांव 4, अटाळी 2, संग्रामपूर तालुका : पांचाळ बु 1, पातुर्डा 1,
पळशी झाशी 1, वरवट बकाल 6, सोनाळा 1, वानखेड 5, कोलद 1, बुलडाणा शहर : 34,
बुलडाणा तालुका : रायपूर 1, धामणदरी 1,
वरवंड 5, सुदंरखेड 4, दहीद 1, मोताळा शहर : 8, मोताळा तालुका : तरोडा 4, पिं.
नाथ 7, पान्हेरा 3, बोराखेडी 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : किन्होळा 1, आमखेड
1, सावरगांव 2, येवता 1, करतवाडी 1, काळेगांव 1, टाकरखेड मुसलमान 1, उत्रादा 1,
कोलारा 1, भोकर 3, शिंदी हराळी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : दाताळा 1,
आळंद 1, पिंपळखुटा 2, वाकोडी 2, नांदुरा शहर : 28, नांदुरा तालुका : निमगांव 2,
शेंबा 3, कोळंबा 1, वडनेर 1, मामुलवाडी 1, टाकरखेड 7, शेलगांव मुकूंद 2, नायगांव
4, पोटळी 1, जळगांव जामोद शहर : 11, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, हिंगणा 1,
मानेगांव 5, झाडेगांव 1, दे. राजा शहर : 23, दे. राजा तालुका : नागणगांव 2,दे.
मही 1,नारायणखेड 1, आळंद 1, पोखरी 1, तुळजापूर 1, सिनगांव जहागीर 5, अंढेरा 3, दगडवाडी 1, उंबरखेड 1, मेहकर तालुका : हिवरा
खुर्द 2, जानेफळ 5, सिं. राजा शहर : 13, सिं. राजा तालुका : अंचली 2, कि. राजा 2,
उगला 1, शेलगांव राऊत 2, साखरखेर्डा 3, रताळी 2, लोणार शहर : 1, मूळ
पत्ता पारशिवणी जि. नागपूर 2, येनगांव ता. बोदवड जि. जळगांव 1, औरंगाबाद 1 संशयीत
व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 446 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 581
रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी
देण्यात आली आहे. कोविड
केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद : 158, बुलडाणा : सिद्धीविनायक
हॉस्पीटल 6, अपंग विद्यालय 107, स्त्री रूग्णालय 9, मुलींचे वसतीगृह 3, शेगांव : 40,चिखली : 56, खामगांव : 7, दे.
राजा : 43, लोणार : 17, मेहकर : 23, नांदुरा : 45, सिं. राजा : 12, मोताळा : 8, मलकापूर
: 43. तसेच आजपर्यंत 144246 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 17293 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 17293 आहे. आज रोजी 7910 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे.
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 144246 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19980 कोरोनाबाधित
रूग्ण असून त्यापैकी 17293 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात
सध्या
रूग्णालयात 2492 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधीतांचा मृत्यू
झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** लसीकरण
काळातही आरोग्याची त्री सुत्री पाळावी
बुलडाणा,(जिमाका) दि.4: जिल्हा रूग्णालय येथे सध्या कोविड साथरोगावरील लसीकरण
वेगाने सुरू आहे. सदरच्या लसीकरणामध्ये एकूण दोन मात्रा देण्यात येतात. पहिल्या मात्रेनंतर
28 दिवसांनी दुसरी मात्रा देण्यात येते. त्यानंतर 15 दिवसांत शरीरामध्ये विषाणू
विरूद्ध प्रतिपिंड (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे या काळामध्ये आरोग्याची
त्रि सुत्री पाळणे जसे वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व सामाजिक अंतर ठेवणे
आवश्यक आहे. तरी नागरिकांनी या त्रि सुत्रींचा अवलंब करावा, असे आवाहल जिल्हा
शल्य चिकित्सक यांनी केले आहे. ***** दिव्यांग
तपासणी शिबिर रद्द बुलडाणा,(जिमाका) दि.4: जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड
सुरू असते. मात्र कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जाहीर
झालेले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील अस्थिव्यंग,
नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान नाक घसा संबंधित दिव्यांग तपासणी बाबतचे दिव्यांग
तपासणी शिबिर पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी जिल्हा
सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील संबंधित दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास
झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही. जेव्हा कोरोना संसर्गाचा
प्रादुर्भाव कमी होईल, तेव्हा पुन्हा दर बुधवारला दिव्यांग तपासणी बाबतचे कामकाज
नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे. |
|
|
|
No comments:
Post a Comment