Friday, 19 March 2021

DIO BULDANA NEWS 19.3.2021,1

 


पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : जिल्ह्यातील शहीद जवान सतिष सुरेश पेहरे रा. अमोना पो. शेलगांव आटोळ ता. चिखली हे पुर्व लद्दाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे 14 जुलै 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती जया सतिष पेहरे, वीरमाता श्रीमती अलका सुरेश पेहरे यांना 20 लक्ष रूपये, वरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना 20 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला.   

*****

दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी भोवली ; दोन आरोपी ताब्यात

  • खामगांव वनपरिक्षेत्रातील घटना

बुलडाणा,(जिमाका) दि.19 : खामगांव वनपरिक्षेत्रात 15 मार्च 2021 रोजी मिळालेल्या माहितीनुसार वरखेड फाटा येथे दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या तस्करी प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग यांना मिळालेल्या माहितीनुसार वरखेड फाटा येथे आरोपी शेख इरफान शेख बाबु रा. अहमदाबाद ह. मु वरखेड, दुसरा आरोपी शेख नासीर शेख गफुर रा. वरखेड यांच्याजवळ मांडुळ प्रजातीचा साप असून चहा- नाश्ताच्या हॉटेलवर बसलेले होते. त्यानुसार 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान त्यांच्याजवळील थैलीमध्ये 1.500 किलोग्रॅम वजनाचा साप, लांबी अंदाजे 95 से. मी, गोलाई 4 से. मी असल्याचे नमूद केले. सदर घटनेचा पंचनामा नोंदविण्यात आला.

   सदर घटनेनंतर आरोपीस ताब्यात घेवून त्याचे वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगांव यांचेकडे आरोपी व जप्त मांडूळ सापासह वर्ग करण्यात आले. प्रकरण वनविभागास प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने सदर आरोपीकामी ताब्यात घेवून तपास सुरू केला. आरोपीस तपास कामी ताब्यात घेवून 15 मार्च रोजी सायंकाळी शहर पोलीस स्टेशन, खामगांव येथे कोठडीत ठेवण्यात आले. पुढील तपास कामी आरोपी शेख इरफान शेख बाबु रा. अहमदाबाद ह. मु वरखेड, शेख नासीर शेख गफुर रा. वरखेड यांचेविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार वनअपराध क्र 760/17 दि. 15.3.2021 कायम करण्यात आला. या आरोपीस न्यायदंडाधिकारी, खामगांव यांचे न्यायालयात हरज करून वनकोठडी मंजूर करण्यात आली. पुढील तपास उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सहायक वनसरंक्षक श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगांव व त्यांचे अधिनस्थ सहकारी करीत आहे. वनयजीव तक्रारी बाबत माहिती असल्यास वनविभागास कळविण्याबाबतचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment