Thursday, 6 August 2020
DIO BULDANA NEWS 6.8.2020
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
अर्ज सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, युध्द, विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबीत यांच्या पाल्यांना शालांत परिक्षा व इतर शिक्षणामध्ये 60 टक्के गुण उर्तीण होऊन पदव्युत्तर शिक्षण घेईपयर्त माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती व विद्यावेतन योजने अंतर्गत कल्याणकारी निधीमधून शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सदर सैनिकांच्या पाल्य वर्ष 2019-2020 या सत्रात शालांत परिक्षा 10 वी, उच्च माध्यमिक परिक्षा 12 वी, पदवी व पदविका या परिक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त असतील त्यांनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी दि. 15 नोव्हेंबर 2020 पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
तसेच पाल्यास कॉलेज कडून इतर कोणतेही योजने अंतर्गत शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी माजी सैनिकांचे अथवा माजी सैनिक विधवेचे फक्त तीन पाल्यांनाच लागू राहील. ज्या पाल्यांनी सी ई टी किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणासोबत गॅप प्रमाणपत्र जोडणे जरुरी आहे. माजी सैनिक, विधवा पत्नी व अवलंबीत यांनी संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी कल्याण संघटक सुर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000
खरीप पिकांवरील किड व्यवस्थापन करावे
कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : पावसात खंड पडल्यास खरीप पिकांमध्ये डवरणी करून जमीन भुसभुसीत ठेवावी. पावसाचे पाणी जागेवरच मुरविले तर मातीची धूप कमी होते. तसेच पावसाचे पाणी निचरण्याकरिता डवऱ्याचा जानकुलास नारळी दोरी बांधून दर दोन ओळी नंतर सरी काढावी. मुंग, उडीद पिकावर भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॅप 10 मिली किंवा पा. मि. गंधक 30 ग्रॅम 10 लीटर पाण्यात टाकून फवारणी करावी. कापूस पिकावर मित्र किटक लेडी बर्ट बीटल, क्रायसोपा व किड मावा, तुडतुडे, फुलकिडे, अळ्या व बोंड अळ्या यांचे प्रमाण 1:5 आढळल्यास रासायनिक किटक नाशकांऐवजी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव समजण्यासाठी कापूस पेरणी पासून 40 ते 45 दिवसांनी एकरी 2 कामगंध सापळे व 10 ते 12 पक्षी खांबे उभारावेत. किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीवरती गेल्यावरच थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम किंवा सायपरमेथ्रेन 25 ईसी 3 मिली किंवा फेनवेलरेट 20 ईसी 6 मिली प्रती 10 लीटर पाण्यात टाकून सायंकाळी फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीचा पातळीवरती गेल्यानंतर प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायक्लोप्रीड 21.7 एसी 15 मिली किंवा क्लोरेनट्रॅनिलीप्रोल 18.5 ई.सी 3 मिली 10 लीटर पाण्यात टाकून सायंकाळी 4 वाजेनंतर फवारणी करावी. मक्यावरील अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वेक्षण करून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
मक्यातील अमेरीकन लष्करी अळीमुळे किडग्रस्त झाडे 5 टक्के आढळून आल्यास कार्बोफेरोन 3 टक्के दाणेदार 3.3 किलो ग्रॅम प्रती हेक्टर किंवा फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो ग्रॅम प्रती हेक्टर ही किटकनाशके जमिनीत ओलावा असताना फेकीव पोंग्यात पडतील याची काळजी घ्यावी. किंवा थायमीथोक्साम 12.3 टक्के अधिक ल्यॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी किंवा क्लोरोनट्रॅनिलीप्रोल 18.5 ईसी 3 मिली 10 लीटर पाण्यात टाकून सायंकाळी 4 वाजेनंतर फवारणी करावी. किटकनाशकांची फवारणी करीत असताना याआधी तज्ज्ञांनी ज्या सावधगिरीच्या उपाययोजना सांगितल्या आहेत, त्याचा अवलंब करावा. जेणेकरून फवारणी करणाऱ्यास विषबाधा होणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
*********
कोरोना अलर्ट : प्राप्त 402कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 70 पॉझिटिव्ह
11 कोरोना बाधीत रूग्णांना सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 472 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 402 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 70 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपिड टेस्टमधील 48 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 53 तर रॅपिड टेस्टमधील 349 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 402 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 1, बजरंग नगर 1, काँग्रेस नगर 1, जिल्हा न्यायालय 2, जुनागाव 2, सुंदरखेड 2, तानाजी नगर 1, केसापूर ता. बुलडाणा : 1, साखळी ता. बुलडाणा : 1, दत्तपूर ता. बुलडाणा : 1, मलकापूर : मंगल गेट 1, आनंद सोसायटी 1, नांदुरा : सिंधी कॅम्प 4, डवंगेपुरा 1, आठवडी बाजार 1, मिलींद नगर 2, वसाडी बु. ता. नांदुरा : 3, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, चिखली : 1, शेगांव : सरकारी फैल 1, मोदी नगर 1, लखपती गल्ली 1, आयटीआय कॉलेजजवळ 1, लोणार : मापारी गल्ली 5, मोतमारा ता. मोताळा : 10, अंभोरा ता. दे.राजा :1, असोला ता. दे. राजा : 2, दे. राजा : 5, डिग्रस ता. दे. राजा : 13, खामगांव : शिवाजी नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 70 रूग्ण आढळले आहे.
त्याचप्रमाणे आज शिवाजी नगर खामगांव येथील 62 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. .
तसेच आज 39 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मलकापूर : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, नांदुरा : 2, राम मंदीराजवळ 1, डवंगेपुरा 1, विदर्भ चौक 1, खामगांव : देशमुख प्लॉट 1, सिंधी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, एकता नगर 1.
तसेच आजपर्यंत 11093 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 990 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 990आहे.
आज रोजी 166 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 11093 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1687 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 990 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 662 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment