Wednesday, 5 August 2020

DIO BULDANA NEWS 5.8.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 429 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 78 पॉझिटिव्ह 39 कोरोना बाधीत रूग्णांना सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.5: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 507 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 429 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 78 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 129 तर रॅपिड टेस्टमधील 300 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 429 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : 1 पुरूष, वाडी 3 महिला, सिंधी कॉलनी 5 पुरूष,नवा फैल 3 पुरूष, 1 महिला, सराफा लाईन 1 पुरूष, वानरे ले आऊट 1 महिला, 1 पुरूष, बालाजी मंदीराजवळ 1 पुरूष, 1 महिला, बालाजी प्लॉट 1 पुरूष, सुटाळा 1 पुरूष, शुक्ला ले आऊट सुटाळा 1 पुरूष, 3 महिला, यशोधरा नगर 1 पुरूष, शिवाजी वेस 1 पुरूष, जुना फैल 1 पुरूष, जळगांव जामोद : 1 पुरूष, वाडी ता. जळगांव जामोद : 1 पुरूष, 1 महिला, वजीराबाद ता. मलकापूर : 1 पुरूष, मलकापूर : 1 पुरूष, 1 महिला, राधाकृष्ण अपार्टमेंट 2 पुरूष, 2 महिला, चिखली : 1 महिला, रोहणा ता. खामगांव : 1 पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा : 3 पुरूष, 1 महिला, दिग्रस ता. दे.राजा : 2 पुरूष, 1 महिला, दे. राजा : 4 महिला, 2 पुरूष, माळीपुरा 1 पुरूष, बोराखेडी 1 पुरूष, बुलडाणा: परदेशीपुरा 1 महिला, युनीयन बँक अपार्टमेंट 1 महिला, जुना गाव 1 पुरूष, राम मंदीराजवळ 1 पुरूष, सुवर्ण नगर 2 महिला, 1 पुरूष, डोंगरशेवली ता. चिखली : 1 पुरूष, मेहकर : 1 पुरूष, चिखली : संभाजीनगर 1 पुरूष, लोणार : 1 पुरूष, येसापूर ता. लोणार : 1 पुरूष, वसाडी ता. संग्रामपूर : 1 पुरूष, शेगांव : 1 पुरूष, ओमनगर 3 पुरूष, जानोरी रोड 1 पुरूष, माटरगांव ता. शेगांव : 2 महिला, 1 पुरूष, घाटबोरी ता. मेहकर : 1 पुरूष, दाताळा ता. मलकापूर : 1 पुरूष, डोणगांव ता. मेहकर : 1 पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 78 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे 4 कोरोनाबाधीत रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये तेलगु नगर बुलडाणा येथील 78 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष, चिखली येथील 70 वर्षीय महिला आणि लोणार येथील 55 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आज 39 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : बालाजी फैल 1 पुरूष,पाजवा नगर 1 पुरूष, भुत बंगला जवळ 1 पुरूष, उपजिल्हा रूग्णालय 4 महिला, 3 पुरूष, वडनेर भोलजी ता. नांदुरा : 1 पुरूष, अडगांव राजा ता. सिं. राजा : 2 पुरूष, 1 महिला, शेंदुर्जन ता. सिं. राजा : 1 महिला, मलकापूर : 1 महिला, खामगांव : सुटाळा 1 महिला, 2 पुरूष, शिवाजी वेस 3 महिला, 1 पुरूष, टाकळी ता. बुलडाणा : 2 पुरूष, नांदुरा : विठ्ठल मंदीराजवळ 1 पुरूष, आठवडी बाजार 1 पुरूष, मोतीपूरा 1 पुरूष, जामा मस्जिदजवळ 2 पुरूष, मारवाडी गल्ली 2 पुरूष, मिलींद नगर 1 महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 1 पुरूष, गोतमारा ता. मोताळा : 3 पुरूष, मेहकर : 1 पुरूष, चांदूर बिस्वा ता. नांदुरा : 1 पुरूष. तसेच आजपर्यंत 10691 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 979 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 979 आहे. आज रोजी 101 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 10691 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1617 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 979 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 604 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 34 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. *******

No comments:

Post a Comment