कोरोना अलर्ट : प्राप्त 401 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 62 पॉझिटिव्ह
- 27 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 463 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 401 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपिड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 363 तर रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 401 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : 4, विकमशी चौक 3, अभय नगर 1, कदमापूर ता. खामगांव : 1, शेगांव : रोकडीया नगर 1, मोदी नगर 1, धनगर नगर 1, व्यंकटेशन नगर 5, धानुका 1, शासकीय रूग्णालय 1, मंगलम नगर 1, एसबीआय कॉलनी 1, माळीपुरा 1, चिंचखेड ता. शेगांव : 1,तिव्हाण ता. शेगांव : 1, सागोन ता. शेगांव : 1, मोताळा :7, तपोवन ता. मोताळा : 3, दे. राजा : 4, कारखेडा ता. चिखली : 1, किन्ही सवडत ता. चिखली : 1, जांभोरा ता. चिखली : 1, कि. राजा. सिं. राजा : 1, वाघाळा ता सिं. राजा : 2, लोणार : 2, बिबी ता. लोणार : 2, बुलडाणा : 4, वावरे ले आऊट 2, धाड ता. बुलडाणा : 1, सावरगांव ता. बुलडाणा : 1,सागवन ता. बुलडाणा : 1, मेहकर : 2, जानेफळ ता. मेहकर : 1, मलकापूर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 62 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान बुलडाणा येथील 82 वर्षीय पुरूष व सागवन ता. बुलडाणा येथील 58 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आजपर्यंत सर्वात आज 27 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 5, नगर परिषद मागे 1, जुना गांव 1, साखरखेर्डा ता. सिं.राजा : 2, खामगांव : जुना फैल 1, गोपाल नगर 1, सराफा 1, वामन नगर 1, समता कॉलनी 1, देशमुख प्लॉट 2, शंकर नगर 2, शेगांव : देशमुखपुरा 1, माळीपुरा 1, जलंब ता. शेगांव : 2, धा. बढे ता. मोताळा : 1, चिखली : 1, मेहकर : 1, निमखेड ता. जळगांव जामोद : 1, किन्ही सवडत ता. चिखली : 1,
तसेच आजपर्यंत 16419 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1968 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1968 आहे.
आज रोजी 910 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 16419 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2806 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1968 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 794 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 44 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
**************
No comments:
Post a Comment