Monday, 10 August 2020

DIO BULDANA NEWS 10.8.2020,1



 

कोविड समर्पित रूग्णालयाचे पालकमंत्री यांच्याहस्ते उद्घाटन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : स्थानिक स्त्री रूग्णालयाचे कोविड समर्पित रूग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. सदर रूग्णालय टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अद्ययावत करण्यात आले आहे. या रूग्णालयाचे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आज 10 ऑगस्ट रेाजी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सांकेतिक स्वरूपात फित कापून प्रत्यक्षात रूग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, जि. प सभापती रियाजखॉ पठाण, जि. प सदस्य रामभाऊ जाधव, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, मो. सज्जाद आदी उपस्थित होते.

   फित कापून उद्घाटन केल्यानंतर रूग्णालयातील सुविधांची पाहणी मान्यवरांनी केली. आयसीयु कक्षाचे फित कापून उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. रूग्णालयातील सुविधांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते रूग्णालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अन्य मान्यवरांच्याहस्तेसुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.  

दृष्टीक्षेपात कोविड समर्पित रूग्णालय :

एकूण खाटांची संख्या 111, तळमजला – ब्लड बँक, सोनोग्राफी रूम, लॅबोरेटरी रूम, एक्स रे रूम, मेडीकल स्टोअर्स, पहिला मजला – ऑपरेशन थिएटर्स 3, इमरजन्सी रिसप्शन, फॅमिली प्लॅनिंग रूम 15 खाटा, आयसीयु 6 खाटा, एनआयसीयु 15 खाटा, पोस्ट ऑपरेटीव्ह रूम 25 खाटा, दुसरा मजला- पेडीॲट्रीक वार्ड 10 खाटा, गायनिक वार्ड 10 खाटा, फॅमिली प्लॅनिंग रूम 15 खाटा, पीएनसी 15 खाटा, आवार – ड्रेन, सम्पवेल/पंपहाऊस/ बोअरवेल, अंतर्गत रस्ते व पार्किंग व्यवस्था, उद्वाहन 2, 200 केव्हीचा डिझेल जनरेटर सेट.

 

                                                            ***********    

      कोरोना अलर्ट : प्राप्त 259 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 64 पॉझिटिव्ह

  • 9 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.10: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 323 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 259 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  प्रयोगशाळेतील 41 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 84 तर रॅपिड टेस्टमधील 175 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 323 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा : विठ्ठल नगर 1, भावसार मंदीराजवळ 1, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1, संकल्प कॉलनी 4, शिवाजी नगर 1,    मेहकर : मँगो होस्टेलजवळ 1, संताजी नगर 1, विठ्ठल नगर 1, डोणगांव ता. मेहकर : 3,  वडशिंगी ता. जळगांव जामोद : 1, आडोळ ता. जळगांव जामोद : 3, चिखली : 2, आनंद नगर 2, संभाजी नगर 1, वाल्मिकी नगर 1, शिंदी हराळी ता. चिखली : 2,  बुलडाणा : शरद  कला कॉलेज जवळ 4, जिल्हा रूग्णालय 1, बालाजी नगर सुंदरखेड 1, इंदिरा नगर 1,  शिवाजी नगर 1, सुवर्णा नगर 1, खेडी पान्हेरा ता. मोताळा : 1,   पिंपळगांव सराई ता. बुलडाणा : 5, मोहोज ता. बुलडाणा 7, मूळ पत्ता वालसावंगी ता. भोकरदन, जि. जालना 1, खामगांव : 1, जुना फैल 3, गजानन कॉलनी 1, राठी प्लॉट 4, सती फैल 2,   मलकापूर : 2, सुलतानपूर ता. लोणार : 1, धा. बढे ता. मोताळा : 1,     संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 64  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 9 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : इंदिरा नगर 1, जानेफळ ता. मेहकर : 1, दाताळा ता. मलकापूर : 1, चिखली : 2, बुलडाणा : 2, मलकापूर : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1. 

   त  सेच आजपर्यंत 12320 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1160 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1160 आहे. 

  आज रोजी 116 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 12579 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1971 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1169 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 767 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

**************

 

No comments:

Post a Comment