जिल्ह्यात पावसाची संततधार…!
- सरासरी 14.9 मि.मी पावसाची नोंद
- चिखली तालुक्यात सर्वात जास्त 28.6 मि.मी पाऊस
बुलडाणा,(जिमाका) दि.17 : जिल्ह्यात पर्जन्यराजाने चांगलीच मनसोक्त बरसात केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सुर्यदर्शन होत नसून सारखी पावसाची रिपरिप सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे तुरळक स्वरूपात बरसणारा पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ करीत आहे. मूग काढणीच्या अवस्थेत असून अन्य पिके पक्वतेच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात चिखली तालुक्यात सर्वात जास्त 28.6 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 14.9 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 7.2 मि.मी (624), चिखली : 28.6 (551.4), दे.राजा : 14.9 (462.8), सिं. राजा : 36.9 (584.4), लोणार : 31.6 (459.9), मेहकर : 21.8 (505.4), खामगांव :6.8(413.2), शेगांव : 5 (447.7), मलकापूर : 6.5 (625.3), नांदुरा : 7.5 (552.3), मोताळा : 6.7 (373.6), संग्रामपूर : 15.3 (544.1), जळगांव जामोद : 4.4 (549.1)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6693.2 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 514.9 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 373.6 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 41.51 दलघमी (59.88), पेनटाकळी :49.58 दलघमी (82.67), खडकपूर्णा :72.45 दलघमी (77.57), पलढग : 4.51 दलघमी (60.51), ज्ञानगंगा : 30.42 दलघमी (89.65), मन : 33.68 दलघमी (91.45), कोराडी : 14.87 दलघमी (98.35), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 6.07 दलघमी (76.93) व उतावळी : 19.79 दलघमी (100).
*****
पाच लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो !
- नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
- करडी, येळगांव प्रकल्पाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले
- पेनटाकळी, खडकपूर्णा व मस प्रकल्पांतून विसर्ग सुरू
- धाड- माहोरा, धाड-कुंबेफळ मार्ग वाहतुकीसाठी बंद
बुलडाणा,(जिमाका) दि.17 : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. आज 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पाच लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील मातला, करडी, पळसखेड भट, कव्हळा ता. चिखली, तांबोळा ता. लोणार आदींचा समावेश आहे. तसेच बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगांव धरण 100 टक्के भरले आहे.
तसेच पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व 9 वक्रद्वारे 25 से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात 7890 क्युसेक (223.44 क्यूमेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदीपात्राशेजारील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे आज खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पा 8 वक्रद्वारे 30 से.मी ने व 11 वक्रद्वारे 60 से.मी ने उघडण्यात आली आहेत. नदीपात्रात 31 हजार 650 क्यूसेक (896 cumec) एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच मस व उतावळी प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. करडी प्रकल्पाचे पाणी स्वयंचलीत दरवांमधून नदीपात्रात येत आहे. त्यामुळे धाड ते माहोरा, धाड ते कुंबेफळ मार्गावर पाणी आले आहे. पर्यायाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मातला प्रकल्प भरल्यामुळे नदी काठावरील मातला, रायपूर, सिंदखेड, सोनेवाडी व उंबरखेड गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पळसखेड भट प्रकल्प भरल्यामुळे पळसखेड भट, पिं. सराई, रायपूर व सोनेवाडी गावांना सतर्कतेचा इशारा शाखाधिकारी, सिंचन शाखा, बुलडाणा यांनी दिला आहे.
********
पुर परिस्थितीत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.17 : आगामी काळात जिल्ह्यात पावसामुळे किंवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदीकाठावरील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुर परिस्थितीमध्ये नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
नाले, ओढे, नदीकाठावरील नागरिकांनी दक्ष रहावे, नदीची पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर रहावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडून जावू नये. सेल्फी काढण्यासाठी तथा पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेवू नये. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारा, इलेक्टी्रक पोल व इलेक्ट्रीक वस्तू यापासून सावध रहावे. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्नपदार्थ सेवन करू नये. पिण्याचे पाणी उकळून प्यावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट/ डोंगर रस्ते/ अरूंद रस्ते/ दरी – खोरे येथून प्रवास करणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय बुलडाणा यांच्या 07262-2424100, टोल फ्री क्रमांक 100, बुलडाणा शहर पोलीस स्टेशन 07262 242327, बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन 07262- 241255, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा 07262-242683, जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा 07262-242500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
****
कोरोना अलर्ट : प्राप्त 84 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 21 पॉझिटिव्ह
- 46 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 105 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 84 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 18 तर रॅपिड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 84 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : गाडगे नगर 1, सरस्वती नगर 1, विष्णूवाडी 1, माळेगांव ता. मोताळा : 1, हनवतखेड ता. सिं.राजा : 2, खामगांव : 1, जलालपूरा 1, सुदर्शन नगर 1, गोपाल नगर 4, सुटाळा 2, वाडी 2, भालेगांव बाजार ता. खामगाव : 3, जोशीनगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 21 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 46 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : पोलीस वसाहत 10, जानकी कॉम्प्लेक्स 1, सुटाळा 1, शिक्षक कॉलनी 2,शंकर नगर 1, सती फैल 2, झोडगा वसर ता. खामगांव : 1, पिं.काळे ता. जळगांव जामोद : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, मेहकर : 6, जानेफळ ता. मेहकर : 1, घाटबोरी ता. मेहकर : 1, लोणार : 10, चिखली : 6, येसापूर ता. लोणार : 1, दहीफळ ता. लोणार : 1.
तसेच आजपर्यंत 14216 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1399 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1399 आहे. आज रोजी 243 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14216 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2252 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1399 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 813 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 40 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
No comments:
Post a Comment