Saturday, 1 August 2020

DIO BULDANA NEWS 1.8.2020

ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन • कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय • मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क बुलडाणा,(जिमाका) दि.1: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन सणाची सार्वजनिक सुट्टी असल्याने मंगळवार 4 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता हा लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्यार कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. *********** जिल्ह्यात टाळेबंदीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली • आरोग्यसेतू ॲप वापरण्याचे आवाहन • रात्री 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी लागू • सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक, धुम्रपान, थुंकण्यास बंदी बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यभर 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य शासनाने राज्यभर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत टाळेबंदीला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात टाळेबंदी 31 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत. या कालावधीत सर्व दुकाने, सेवा, आस्थापना सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकाने / बाजारपेठ येथे गर्दी किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्यात बाबतचे आदेश काढण्यात येणार आहे. दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची काळजी दुकान मालकाने घ्यावी. दुकानात ग्राहकामध्ये 6 फुटाचे अंतर असावे. जिल्ह्यात रात्री 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. या काळात कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, शारिरीक अंतर राखणे (किमान 6 फूट) बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने थुंकणे गुन्हा आहे. जिल्ह्यात तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास , थुंकण्यास व ई सिगारेटसह सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास प्रतिबंध करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे, आदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 21 जुलै च्या आदेशानुसार 21 ऑगस्ट पर्यंत यापूर्वीच प्रत्येक शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी औषधालये, दवाखाने, दुध वितरण व संकलन, आवश्यक ती शासकीय वगळून कडक संचारबंदी लागू केलेली आहे. सदर कालावधीत कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कारणास्तव रूग्ण व त्यांचेसोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास त्यांचेविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. आरोग्य सेतू वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्या प्रादुर्भावाबाबत त्वरित सूचना मिळते. त्याचा फायदा व्यक्तीश: व समाजाला सुद्धा होतो. त्यामुळे ॲण्ड्राईड फोनचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यात या सेवांना परवानगी : सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह जिल्ह्यातंर्गत बस वाहतूकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे. संपूर्ण मालवाहतूकीस राज्या बाहेर जाण्यास व येण्यास परवानगी असणार आहे. सर्व दुकाने / बाजारपेठा (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 9 ते सायं 7 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मेडीकल, दवाखाने व तत्सम सेवा, अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू राहण्यास परवानगी असेल. विवाह समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या मर्यादीत उपस्थितीने खुले लॉन, विना वातानुकूलीक मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी राहील. निर्बंधासह खुल्या मैदानात व्यायाम करण्यास मुभा असेल. खाजगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, हॉटेल्स/ रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थांची केवळ पार्सल घरपोच सुविधा सुरू करण्यास परवानगी आहे. जिल्यापोतील सर्व मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट 2020 पासून सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत कार्यान्वीत करण्यास मुभा असेल. त्याचप्रमाणे चालक व एका व्यक्तीसह हेल्मेट व मास्कसह दुचाकी चालविण्यास परवानगी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि चालकासह तीन व्यक्तींसाठी फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील. जिल्ह्यातील सर्व मैदाने, जिम्नॅस्टीक्स, टेनिस, बॅडमिंटन व मल्लखांब खेळास 5 ऑगस्ट 2020 पासून सामाजिक अंतराचे नियम पाळून परवानगी राहणार आहे. केश कर्तनालये, पार्लर सुरू राहणार. जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे: जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीस विना परवानगी बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील, सर्व सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, असेंब्ली हॉल, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदींवर बंदी असेल. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने, पानठेले बंद राहतील. तसेच कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील. विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, अनेक व्याधी असणारे व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील. मोठ्य प्रमाणावर लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असेल. कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम : कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल ठेवावा. वारंवार निर्जंतुकीकरण करावे. प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरावा. थुंकण्यास बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. ******* लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन बुलडाणा,(जिमाका) दि.1: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आज 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पुरी यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगीअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *************** कोरोना अलर्ट : प्राप्त 307 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 80 पॉझिटिव्ह • 42 रूग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि.1: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 387 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 307 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 80 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपिड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 129 तर रॅपिड टेस्टमधील 178 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 307 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर : 4 महिला, 3 पुरूष, लोणी गवळी ता. मेहकर: 6 पुरूष, 5 महिला,घाटबोरी ता. मेहकर : 3 पुरूष, नांदुरा : 1 पुरूष, 1 महिला, राम मंदीराजवळ 1 महिला, दबंगेपुरा 1 पुरूष, विदर्भ चौक 1 पुरूष, चिखली : 1 पुरूष, सवणा ता. चिखली: 9 पुरूष, 4 महिला, धाड ता. बुलडाणा: 4 महिला, 2 पुरूष, बुलडाणा : 1 पुरूष, 1 महिला, दे. मही ता. दे. राजा : 2 महिला, खामगांव : सती फैल 2 पुरूष, सुलतानपूरा 1 पुरूष, 1 महिला, देशमुख प्लॉट 2 मुली, 1 पुरूष, रेखा प्लॉट 3 महिला, 1 मुलगा, 1 पुरूष, बालाजी प्लॉट 2 पुरूष, 2 महिला, शेगांव रोड 1 पुरूष, शिवाजी नगर 1 पुरूष, 2 महिला, सिंधी कॉलनी 1 महिला, विनायक नगर 1 पुरूष, एकता नगर 1 महिला, माटरगांव ता. शेगांव : 1 पुरूष, दे. राजा : शिवाजी नगर 2 महिला, 2 पुरूष, सिव्हील कॉलनी 1 महिला, बावनबीर ता. संग्रामपूर : 1 महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 80 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा : 4 पुरूष, 2 महिला, शेगांव : 7 पुरूष, 3 महिला, नांदुरा : 1 पुरूष, जळगांव जामोद : 6 महिला, बुलडाणा: 4 महिला, 2 पुरूष, मलकापूर : 1 पुरूष, चिखली : 2 पुरूष, 1 महिला, खामगांव : 2 महिला, 7 पुरूष. तसेच आजपर्यंत 9222 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 830 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 830 आहे. आज रोजी 118 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 9222 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1348 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 830 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 488 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 30 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment