कर्जमाफीसाठी थेट कारागृहातच केले आधार प्रमाणीकरण
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वेगळा प्रयत्न
बुलडाणा, (जिमाका) दि. 11: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर लागलीच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होते. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्न दादगांव ता. नांदुरा ग्रामसेवा सहकारी संस्थेचे कर्जदार गोपाळ दीपा तेलंग रा. दादगांव कर्जमाफीस योजनेस पात्र होते. यायेजनेच्या निकषानुसार सभासदाला संबंधीत बँक शाखेमध्ये स्वत: बोटाचे ठसे देऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक होते. त्यानंतरच सभासदास कर्जमाफीचा लाभ मिळणार होता.
मात्र सभासद बुलडाणा कारागृहात शिक्षा भोगत असल्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हा कारागृह अधिक्षक, बुलडाणा यांच्या परवानगीने 6 ऑगस्ट 2020 रोजी बुलडाणा कारागृहात जावून थेट कारागृहातूनच सभासदाचे बोटाचे ठसे घेत आधार प्रमाणीकरण करण्यात आले. थेट कारागृहातच बंदीजन असले तरी कर्जमाफी योजनेचे लाभार्थी म्हणून कर्जदार शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करीत जिल्हा बँकेने वेगळा प्रयत्न केला आहे. तसेच शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी बँकेकडून करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक महेश कृपलानी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अ. वा. खरात, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. चव्हाण, व्यवस्थापक एम. एम ठाकरे, आयटी अधिकारी डी. एस गायकवाड, सहा. मुख्य अधिकारी जी. एस रहाटे आदी उपस्थित होते.
सभासदाचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हा कारागृह अधिक्षक श्री. गुल्हाने, तुरूंग अधिकारी श्री. हिवाळे, दिलीप काळे, श्रीमती अर्चना खंदारे आदींचे सहकार्य लाभले.
माजी सैनिकांच्या इयत्ता 10 वी 12 सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या पाल्यांचा होणार सन्मान
बुलडाणा, (जिमाका) दि. 11: जिल्ह्यातील युद्ध विधवा व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या पाल्याचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना एअर मार्शल व्ही. ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार मिळणार आहे. इयत्ता 10 व 12 वी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उर्तीण झालेल्या एक -एक पाल्याचे नाव एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आवश्यक कागदपत्रांसह दि. 16 सप्टेबर 2020 पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे कल्याण संघटक, सुर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे. संपर्कासाठी कार्यालयीन दुरध्वनी क्र. 07262-242208 वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष पुरस्कार
बुलडाणा, (जिमाका) दि. 11: जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नाटय, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, सामाजिक कार्य आणि पर्यावरणा विषयी पुरस्कार प्राप्त करणारे देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून इयत्ता 10 वी 12 वी 90 टक्के अधिक गुण मिळवून उतीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील 10 वी व 12 वी चे पहिले गुणाक्रमाचे 5 पाल्य यांना एक रक्कमी 10,000 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कार्याबद्दल 25,000 हजार रुपये व राज्यस्तरीय कार्याबद्दल 10,000 हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच आय. आय. टी, आय. आय. एम, ऐ. आय. आय. एम. एस. अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना एक रक्कमी 25,000 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांचे पाल्यांना गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच केंद्रिय शिक्षा बोर्ड, नवी दिल्ली येथून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना ग्रेड शिट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शवित नसल्याने संबधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीचे प्रमाणपत्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे दि. 16 सप्टेबर 2020 पुर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी सदर कार्यालयाचे कल्याण संघटक संर्यकांत सोनटक्के यांचेशी संपर्क साधावा. संपर्कासाठी कार्यालयीन दुरध्वनी क्र. 07262- 242208 वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी आधार कार्ड सेवायोजन कार्डाशी संलग्न करावे
- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 11: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात उमेदवारांनी नोकरी संदर्भात नोंदणी केली आहे. मात्र आधार कार्ड क्रमांक सेवायोजन कार्डाशी लिंक केले नसेल, अशा उमेदवारांनी आपला आधार कार्ड क्रमांक सेवायोजन कार्डाशी लिंक करणे गरजेचे आहे. अशा उमेदवारांनी आपले आधार कार्ड आपल्या सेवायोजन कार्डाशी लिंक करण्याकरिता www.mahaswayam.
उमेदवारांनी www.mahaswayam.
***********
चिखली येथे रानभाज्या महोत्सव
बुलडाणा, (जिमाका) दि. 11: जिल्ह्यात चिखली येथे रानभाजा महोत्सव 2020 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात रानभाजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार डॉ अनितकुमार येळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
या रानभाजी महोत्सवामध्ये तालुक्यामधून विविध प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये कंटुले, फांद, तांदुळचुका, चिवळ, कपाळफोडी, पिवळ, हडसन, केणा तसेच शतावरी आदी प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता. शतावरीचा प्रामुख्याने उपयोग हा औषधी वनस्पती म्हणून केल्या जातो. शारीरिक व मानसिक ताण घालवण्यासाठी रोग प्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. सदर वनस्पतीच्या कांड्या दुधकांडी म्हणूनसुद्धा वापर होतो. या वनौषधी शेतकऱ्याच्या बांधावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
या रानभाज्यांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्यामुळे सर्वांनी रान भाज्यांचे सेवन करावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाला कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी…!
- सरासरी 30.6 मि.मी पावसाची नोंद
- चिखली तालुक्यात सर्वात जास्त 47 मि.मी पाऊस
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून उघाड दिलेल्या पावसाने काल रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात सर्वत्र हजेरी लावली. श्रावणधारांनी चागलीच बरसात करीत बळीराजाला सुखावले. सध्या अनेक भागात मूग पक्व झाला असून तोडणीच्या अवस्थेत आहे. तर सोयाबीन फुलावर आहे. उडीद व मका पक्वतेच्या अवस्थेत आहेत. कापूस पिकात आंतर मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात चिखली तालुक्यात सर्वात जास्त 47 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 30.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 44 मि.मी (574.2), चिखली : 47 (474.4), दे.राजा : 39.6 (412.4), सिं. राजा : 46 (504), लोणार : 46 (399.3), मेहकर : 45.9 (436.3), खामगांव : 24.5 (355.9), शेगांव : 6.4 (409.4), मलकापूर : 41.4 (534.8), नांदुरा : 31.8 (450.5), मोताळा : 10.3 (295.9), संग्रामपूर : 4.2 (483.9), जळगांव जामोद : 11.2 (486.6)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5799.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 446.1 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 295.9 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 40.85 दलघमी (58.93), पेनटाकळी : 40.38 दलघमी (67.33), खडकपूर्णा :71.11 दलघमी (76.13), पलढग : 3.84 दलघमी (51.13), ज्ञानगंगा : 28.51 दलघमी (84.03), मन : 29.67 दलघमी (80.56), कोराडी : 11.39 दलघमी (75.33), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 3.97 दलघमी (50.32) व उतावळी : 19.79 दलघमी (100).
*****
दोन मध्यम व 18 लघु प्रकल्पांनी गाठली शंभरी..!
- नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : जिल्ह्यात सुरू असलेल्या कमी अधिक दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडूंब होत आहेत. तर काही तुडूंब होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात दोन मध्यम, तर 18 लघु पाटबंधारे प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी नदीपात्रात प्रवाहीत होत आहे. नदीकाठांवरील गावांना सावधनतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पाटबंधारे विभागातंर्गत येत असलेले दोन मध्यम प्रकल्प मस व उतावळी 100 टक्के भरले आहे. मस प्रकल्प हा खामगांव तालुक्यात असून उतावळी प्रकल्प मेहकर तालुक्यात येतो. तसेच लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पिंपळगांव चिलम, सावखेड भोई व अंचरवाडी 2 ता. दे. राजा, मांडवा, जागदरी व केशव शिवणी ता. सिं.राजा, ढोरपगांव, हिवरखेड 1, हिवरखेड 3, टाकळी व गारडगांव ता. खामगांव, चिखली ता. चिखली, चोरपांग्रा व खळेगांव ता. लोणार, पांग्री केसापूर, झरी, बोधेगांव व मासरूळ ता. बुलडाणा आदी प्रकल्प 100 टक्के भरले आहे. या प्रकल्पांचा सांडवा प्रवाहीत झाला आहे.
झरी प्रकल्प भरल्यामुळे नदी काठावरील झरी, अंभोडा, हतेडी बु व हतेडी खु ता. बुलडाणा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बोधेगांव प्रकल्प भरल्यामुळे बोधेगांव, म्हसला बु, बेलोरा व चांडोळ ता. बुलडाणा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मासरूळ प्रकल्पामुळे नदीकाठावरील मासरूळ, धामणगांव, टाकळी, कुंबेफळ व सातगांव म्हसला गावांना पुराचा धोका आहे. पांग्री केसापूर प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे पांग्री, केसापूर व शिरपूर गावांना सतर्कतेचा इशारा शाखाधिकारी, सिंचन शाखा, बुलडाणा यांनी दिला आहे.
******************
नाबार्ड योजनांच्या लाभासाठी कुणालाही कमीशन देवू नका
- जिल्हा विकास प्रबंधक यांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड ची जिल्ह्यात एकच शाखा आहे. अन्यत्र कुठेही शाखा नाही. या शाखेत केवळ एकच अधिकारी जिल्हा विकास प्रबंधकाच्या माध्यमातून काम करतो. कुठल्याही योजनेतंर्गत नाबार्डचा प्रत्यक्ष लाभार्थी सोबत संबंध येत नाही. नाबार्ड आपल्या योजनांच्या लाभासाठी कुठलेही कमीशन व शुल्क आकारत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणालाही कमीशन देवू नये, असे आवाहन जिल्हा विकास प्रबंधक विक्रम पठारे यांनी केले आहे.
********
No comments:
Post a Comment