Friday, 21 August 2020

DIO BULDANA NEWS 21.8.2020

 कोरोना संसर्ग सुरक्षीतता पाळून महामंडळाची प्रवाशी वाहतूक सुरू

  • प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात कोविड-19 च्या संकटात आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुक  दि. 20 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात आली आहे. सदर प्रवाशी सेवा कोरोना संसर्ग सुरक्षीततेचे सर्व नियम पाळून सुरू राहणार आहे. अशा सुरक्षीत सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्कचा वापर करुन सामाजिक अंतर ठेवून प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.

     एस. टी महामंडळ आता  सज्ज झाले असून आपल्या सुरक्षित प्रवास, सामाजिक अंतर ठेवून बसेस निर्जंतुकीकरण करुन माहे जानेवारी 2020 मध्ये जे प्रवास भाडे होते, त्याच प्रवास भाडे दरामध्ये प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे.  अधिक माहिती करीता विभागीय नियंत्रण कक्षाशी अथवा संबंधित आगार व्यवस्थापकांशी थेट संपर्क साधावा.  नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी बुलडाणा आगार 07262-242788, चिखली 07264-242084, खामगाव 07263-252224, मेहकर 07268 -224554, मलकापूर 07267-222170, जळगांव जामोद 07266-221453, शेगांव 07265-252028 असे

आहे. तरी या सुरक्षीत प्रवाशी सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

0000000

आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने दि.20 ऑगस्ट 2020 आंतरजिल्हा प्रवाशी बसेस सुरु केल्या आहेत. सदर प्रवाशी वाहतूक बसेस 50 टक्के आसन (प्रत्येक बसमध्ये फक्त22) क्षमतेने प्रवाशांना पुर्वीच्या दराने प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक राहील. बसेस पुर्णत: निर्जंतुकीकरण करुन चालविण्यात येणार आहेत. तसेच आंतरजिल्हा बस वाहतुकीचे वेळापत्रक बुलडाणा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

   प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार फेऱ्यामध्ये वाढ करण्यात येईल, प्रवाशांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक राहील. प्रवाशांसाठी ईपासची आवश्यकता राहणार नाही. तरी या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

आंतरजिल्हा बसेसचे वेळापत्रक

   बुलडाणा आगारातून  अकोला सकाळी 8 व दुपारी 2, औरंगाबाद सकाळी 5.30, 6.15, दुपारी 1, 1.30, 3.30, भुसावळ सकाळी 6.45, जामनेर सकाळी 7.15, नागपुर सकाळभ्‍ 9, 11 व दु 1.30, अमरावती सकाळी 6.30, 8, 10.15, दु. 12 व सायं 4,   लातुर सकाळी 8.30, पुणे सकाळी 9.15, रात्री 9.15, पंढरपुर सकाळी 7.30, यवतमाळ दुपारी 3.30, धुळे सकाळी 7.15, परतवाडा, दु. 1,  चिखली आगार येथून औरंगाबाद दु. 12.30, दु. 3.15,  जळगांव खां स 6.15, 11.45,नाशिक सकाळी 8.15, नागपुर सकाळी 9.15, पुणे सकाळी 7.30 व सायं 6.30,  त्र्यंबकेश्वर सकाळी 9.30, शिर्डी सकाळी 6, खामगांव आगार येथून अकोला दर अर्ध्यातासाला विना वाहक, नाशिक सकाळी 9.45, शिर्डी सकाळी 6.15, सकाळी 7.05, सकाळी 9.45,  नांदुरीगड (सप्तश्रंगीगड) सकाळी 8.30, औरंगाबाद सकाळी 9.30,  मेहकर आगार येथून पुणे सकाळी 8, पंढरपुर सकाळी 8.15, नागपुर सकाळी 7.30, त्र्यंबकेश्वर सकाळी 7, लातुर सकाळी 9.45, जळगांव खांदेश सकाळी 6, 7, 8, 9 व सकाळी 10, अकोला सकाळी 6.30, मलकापुर आगार येथून पुणे सकाळी 6.45 व सायं 6.30, वाशिम सकाळी 9, औरंगाबाद सकाळी 4.45, 5.15, 6, 7, 7.30, 7.45, 8.15, 8.45, 9.30, 10.15, 11.15, 12, दु. 2, वझर सरकटे सकाळी 8.45, जळगांव जामोद आगार येथून अकोला सकाळी 6.25, 9.30, 1.30, 2.15, पुणे सकाळी 8, 9.15, नागपुर सकाळी 10, औरंगाबाद सकाळी 5.30, दु. 2.30.  शेगांव आगार येथून अकोला दर अर्ध्या तासाला विना वाहक, चंद्रपुर सकाळी 9, शिर्डी सकाळी 9.15, पुणे सकाळी 7, पंढरपुर सकाळी 7.30, नागपुर सकाळी 10.30, यवतमाळ दु. 1.15, औरंगाबाद सकाळी 6.15 व 8.30 वाजता .

********

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवसथापन करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : गलाबी बोंडअळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसीपीएल्ला (सान्डर्स) ती गण लेपिडोप्टेरा आणि कुळ जेलेचिडी मध्ये वर्गीकृत आहे. हया किडीचे मुळ उगमस्थान भारत, पाकीस्तान आहे. मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते. मादी अंडी पात्या, फुलावर, नविन बोंडावर, देठावर आणि कोवळया पानांच्या खालच्या बाजुस घालते. अंडीचा आकार 0.5 मि मि लांब व 0.25 मिमि रुंद असतो. अंडी लांबट व चपटी असुन रंगाने मोत्यासारखी चक चकीत असतात. पंधरा दिवसाचे बोंड अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते. अंडी उबवण्याचा काळ हा 3 ते 6 दिवसाचा असतो. पहिल्या दोन अंतरीक अळी अवस्था पांढूरक्या असतात आणि तिसऱ्या आंतरीक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात.

   उष्ण भागात अळी अवस्था ही 9 ते 14 दिवसांची असते. पुर्ण वाढलेल्या अळीची लांबी 10 ते 13 मिमि असून डोके गडद रंगाचे असते. कोष साधारण 10 मि‍मि लांब बदामी रंगाचा असून अवस्था 8 ते 13 दिवसात पुर्ण केल्या जाते. जिवनक्रम 3 ते 6 आठवडयात पुर्ण होतो. पतंग 8 ते 10 मिमि तपकिरी करडया रंगाचा असून पंखावर काळे ठिपके असतात. पतंग कोषातून सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर निशाचर असतात आणि दिवसाला मातीत किंवा जमिनीच्या भेगात लपून बसतात. खाध्य वनस्पती अभावी गुलाबी बोंडअळी 6 ते 8 महिनेपर्यत निद्रावस्थेत राहते.

    उघडलेल्या बोंडावरती डाग हे गुलांबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीला येणाऱ्या फुलोऱ्यावस्थेत आणि पिकांच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते. कामगंध सापळयामध्ये नर पतंग अडकल्यास कामगंध सापळयाद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग आकर्षित होतात. डोम कळी फुले पुर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात. हिरव्या बोंडावर दिसणारे डाग हिरव्या बोंडावर दिसणारे. डाग हे गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव लक्षण आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र अंदाजे 1.5 ते 2 मिमि व्यासाची लहान छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.

                                                  गुलाबी बोंडअळी येण्याचे कारणे

जास्त कालावधीच्या संकरीत वानाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीला यजमान वनस्पतीचा अखंडीत खाद्य पुरवठा. असंख्य संकरीत वाण ज्यांचा फुलोरा आणि फळधारणेचा कालावधी वेगवेगळा असतो. जो गुलाबी बोंडअळीच्या एकापाठोपाठ येणाऱ्या पिढीला अखंडीत पुरवठा करतो. जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्चा कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्यामुळे येणाऱ्या कापसाच्या पिकांसाठी गुलाबी बोंडअळीचे स्त्रोतस्थान म्हणून काम करते. पुर्वहंगामी (एप्रिल-मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जुन- जुलै मध्ये येणाऱ्या कमी तिव्रतेच्या गुलाबीबोंड अळीसाठी लाभदायक ठरतो. गुलाबी बोंडअळीचे क्राय 1 एसी 2 एबी या दोन्ही जनुकाप्रती प्रतिकार निर्माण होतो. त्यामुळे त्या बोलगार्ड 2 वरती सहजपणे जगू शकतात. संकरीत वानाची बोंडातील बियामध्ये वेगवेगळे असलेल्या विषाच्या प्रमाणामुळे लवकर प्रतिकार निर्माण होतो. ही परिस्थिती निवडक प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी अतिशय आदर्श ठरते. सुरुवातीला पेरलेले पिक आणि अगोदरचे पीक यांच्या सलग उपलब्धतेमुळे गुलाबी बोंडअळीला वर्षभर निरंतर खाद्य पुरवठा होतो. त्यामुळे त्यांच्या अनेक पिढया एक वर्षात तयार होतो. ज्यामुळे गहन निवडक दबाव तयार होऊन प्रतीकार तयार होण्यास मदत होते. गैर बीटी कपाशीची (रेफुजी) आश्रय पिक म्हणून वापर न करणे. वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव.

    अशा करा उपायोजना :  कापुस पिकाचा हंगाम डिसेंबर ते जनवारी दरम्यान संपुष्टात आणणे. अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकांच अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीने प्रादृर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठवण करु नये. बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जुन महिन्यात पेणी करावी. बीटी बियाण्यासोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी. पतंगाच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीच्य प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवळी निरीक्षण करावी. ज्या ठीकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीया अंडयावर उपजिविका करणारा परोपजीवी मित्र किटक 60000 एकर या प्रमाण एका आठवडयाच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तिनदा प्रसारण केलयास चांगले नियंत्रण मिळते. लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क 5 टक्के निम तेल 5 मिली प्रती लिटरची एक फवारणी करावी. मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटनाशकाची फवारणी (लेबल क्लेम) प्रमाणे करावी. जहाल विषारी व उच्च विषारी किटनाशकाची फवारणी टाळावी. किटनाशकाचा मिश्राणचा कोटेकोरपणे वापर टाळावा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपुर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायरेथ्रोईड, असिफेट, फिप्रोनील इत्यादी चा वापर करु नये. बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळया झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पाहावी. खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करुन त्वरीत नष्ट करावीत. आर्थिक नुकसान पातळी (8 पतंग, कामगंध सापळा, दिन किंवा एक अळी,10 फुले किंवा एक अळी 10 हिरवी बोंडे) ओलांडल्यास तक्त्यात दिलेल्या रासायनिक किटनाशकांचा गरजेनुसार वापर करावा. स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र वेचनी करुन विक्री अथवा योग्य साठवणूक करावी. तसेच किडग्रस्त कापुस त्वरीत नष्ट करावे. सुतगिरणी, जिनिंग मिलमध्ये साठवलेल्या किडग्रस्त कापसात सुप्तावस्थेत असलेल्या अळयांपासून निघनाऱ्या पंतगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावे.

              गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली किटनाशके

सप्टेंबर महिन्यात किटकनाशक क्विनॉलफॉस प्रती 10 लीटर पाण्यात 25 टक्के एएफ 20 मिली, किंवा थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी प्रती 10 लीटर पाण्यात 20 मिली मात्रा,  ऑक्टोबर महिन्यात क्लोरपायरीफॉस 20 टक्के इसी 25 मिली प्रती 10 लीटर पाण्यात किंवा थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी 20 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात, नोव्हेंबर महिन्यात फेनव्हलरेट 20 टक्के इसी किंवा सायपरमेथ्रिन 10 टक्के इसी 10 मिली प्रती 10 लीटर पाण्यामध्ये फवारणी करावी, असे  आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment