सुट्टी असल्याने आजचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द
बुलडाणा,(जिमाका) दि.25: जिल्हा सामान्य रूग्णालय येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी तपासणी होत असते. मात्र या बुधवारला 26 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ गौरी पुजन निमित्ताने जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 26 ऑगस्ट रोजी होणारे अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान नाक घसा संबंधीत दिव्यांग तपासणी बाबतचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील सदर अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण व कान नाक घसा संबंधीत दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
********
दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.25: दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगसाठी मोफत् प्रशिक्षण देते. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची शासन मान्यता आहे. तसेच एमएस सीआयटी संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासनाची मान्यतासुद्धा आहे. या संस्थेला अखिल स्तरावरील फिक्की अवार्ड प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत् प्रवेश देणे सुरू आहे. संस्थेत सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस ऑफीस, मोटार अँड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, एमएससीआयटी आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. यासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असून केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.
संस्थेत प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत् प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, उज्ज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायाकरीता बीज भांडवल योजना आदी सोयी सवलती आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज जि. सांगली पिनकोड 416410 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत् मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पुर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झालयानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येणार आहे. तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 0233-2222908, 7972007456, 9922577561, 9975375557 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक यांनी केले आहे.
कोरोना अलर्ट : प्राप्त 321 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 54 पॉझिटिव्ह
- आजपर्यंत सर्वात जास्त 112 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 375 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 321 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 52 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 309 तर रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 321 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. मही ता. दे. राजा : 1, दे. राजा : 7, मोताळा : 1, धा. बढे ता. मोताळा : 1, मेहकर : रामनगर 4, मलकापूर : 4, उपजिल्हा रूग्णालय 2, भालगांव ता. चिखली : 4, काटोडा ता. चिखली 4, मेरा बु ता. चिखली : 1, बुलडाणा : 4, जोहर नगर 1, वानखेडे ले आऊट 7, धामणगांव ता. बुलडाणा : 4, मासरूळ ता. बुलडाणा : 1, खामगांव : 2, बाळापूर फैल 1, सती फैल 2, वाडी 1, किसान नगर 1, नटराज गार्डनजवळ 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे.
तसेच आजपर्यंत सर्वात जास्त 112 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा :भगवान कॉलनी 7, भक्ती निवास जवळ 1, शनिवार पेठ 2, शिवाजी नगर 1, बस स्थानकाजवळ 2, सिवील कॉलनी 1, असोला जहागीर ता. दे. राजा : 2, असोला ता. दे. राजा : 14, खामगांव : 1, सुटाळा 1, वामन नगर 1, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ 7, आठवडी बाजार 1, देशमुख प्लॉट 2, रेखा प्लॉट 1, शेगांव रोड 1, शिवाजी नगर 1, विनायक नगर 1, मलकापूर : 1, सिंधी कॉलनी 1, गौलखेड 1, उपजिल्हा रूग्णालय 2, दाताळा ता. मलकापूर : 2, टाकळी ता. बुलडाणा : 1, सागवन ता. बुलडाणा : 1, हतेडी ता. बुलडाणा : 4, बुलडाणा : 1, तेलगू नगर 1, इंदिरा नगर 1, दिवठाणा ता. चिखली : 1, अमडापूर ता. चिखली : 3, अंचरवाडी ता. चिखली : 5, चिखली : 4, सवणा ता. चिखली : 2, शेगांव : ब्राम्हणपूर 2, भैरव चौक 1, ब्राम्हणवाडा 2, मोदी नगर 1, ओम नगर 1, माळीपुरा 2, वारुडी ता. सिं. राजा : 1, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 4, जामोद ता. जळगांव जामोद : 1, बिबी ता. लोणार : 1, अंजनी ता. मेहकर : 1, गवंढळा ता. मेहकर : 1, नागापूर ता. मेहकर : 1, जानेफळ ता. मेहकर : 4, मेहकर : 4, नांदुरा : नवाबपुरा 5, खैवाडी 2.
तसेच आजपर्यंत 15633 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1895 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1895 आहे.
आज रोजी 1174 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15633 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2689 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1895 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 752 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
**************
No comments:
Post a Comment