कोरोना अलर्ट : प्राप्त 450 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 72 पॉझिटिव्ह
- आजपर्यंत एका दिवसात सुट्टी झालेले सर्वात जास्त 106 रूग्ण
बुलडाणा,(जिमाका) दि.8: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 522 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 450 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 72 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 43 व रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 66 तर रॅपिड टेस्टमधील 384 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 450 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा : 1, बालाजी मंदीराजवळ 1, बालाजी नगर 1, सावखेड भोई ता. दे.राजा : 6, दे. मही ता. दे. राजा : 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, नांदुरा : 1, संभाजी नगर 3, महाराणा चौक 4, अर्बन कॉलनी 1, आयटीआय जवळ 1, तहसिल कार्यालय 1, लोणार : 7, दहीफळ ता. लोणार : 1, भानापूर ता. लोणार : 2, सुलतानूपर ता. लोणार : 6, खळेगांव ता. लोणार : 1, शेंदुर्जन ता. सिं. राजा : 1, येसापूर ता. लोणार : 1, चिखली : 4, मलकापूर : शिवाजी नगर 1, खामगांव : जोशी नगर 2, राठी प्लॉट 1, सुटाळा बु 6, गांधी चौक 3, पोलीस वसाहत 4, सती फैल 1, बुलडाणा : पाळणा घराजवळ राम नगर 2, जानेफळ ता. मेहकर 1, डोणगांव ता. मेहकर : 1, गोतमारा ता. मोताळा : 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 72 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज एका दिवसामध्ये सर्वात जास्त 106 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. ही आजअखेर एका दिवसात सुट्टी दिलेल्या रूग्णांची सर्वात जास्त संख्या आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : निंभोरा ता. जळगांव जामोद : 2, माकोडी ता. मोताळा : 5, मलकापूर : उपजिल्हा रूग्णालय 1, दे. मही ता. दे. राजा : 2, वरवट बकाल ता. संग्रामपूर : 1, पातुर्डा ता. संग्रामपूर : 2, अंचरवाडी ता. चिखली : 1, मूळ पत्ता किन्ही ताठे ता. जाफ्राबाद जि. जालना : 1, असोला ता. दे. राजा : 4, लोणी गवळी ता. मेहकर : 11, घाटबोरी ता. मेहकर : 2, सवणा ता. चिखली : 13, मेहकर : 1, चिखली : 1, खामगांव : सती फैल 2, सुलतानपूरा 2, रेखा प्लॉट 4, सिंधी कॉलनी 1, इंदिरा नगर 1, शितलामाता मंदीराजवळ 1, गौरक्षण रोड 3, उदासी मठ 1, जगदंबा रोड 1, मोची गल्ली 1, सराफा लाईन 1, दे. राजा : शिवाजी नगर 4, शेगांव : आरोग्य कॉलनी 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 8, धानोरा खुर्द ता. नांदुरा : 5, सिंधी कॉलनी 4,केशव अर्बन बँकेजवळ 2, मारवाडी गल्ली 1, नागरजे भवनजवळ 1, जामा मस्जीदजवळ 2, विठ्ठल मंदीराजवळ 5, मिलींद नगर 3, डवंगेपुरा 1, राम मंदीरावजळ 3, वसाडी बु. ता. नांदुरा : 1.
तसेच आजपर्यंत 11988 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1125 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1125 आहे.
आज रोजी 227 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 11988 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1840 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1125 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 680 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment