Monday, 24 August 2020

DIO BULDANA NEWS 24.8.2020

 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

  • 28 ऑगस्ट 2020 पर्यंत अंतिम मुदत
  • अर्ज swfs.applications@gmail.com ईमेलवर सादर करावा

बुलडाणा,(जिमाका) दि.24: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परिपूर्ण अर्ज भरून व आवश्यक कागदपत्रांसह 28 ऑगस्ट 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकृतीसाठी स्कॅन कॉपी swfs.applications@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावा. जे विद्यार्थी ई मेल द्वारे अर्ज पाठवतील त्यांनी ई मेल द्वारे पाठविलेल्या अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च रोड, पुणे 41100 येथे सादर करावी.

     योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील असावा, राज्याचा रहीवासी असावा, पदव्युत्तर अभ्यास क्रमासाठी  35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असणार आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये व लंडन स्कुल ऑफ इकॉनिमिक्स  मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे, मात्र द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत दोन वर्ष कालावधीचाच एम.बी.ए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेत स्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे विद्यार्थीदेखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास  पात्र असतील. परदेशातील शिक्षणसंस्था ही जागतिक क्रमवारीत 300 च्या आत असावी. अटी व शर्ती या सविस्तर जाहीरातीप्रमाणे व शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.

योजनेचा असा मिळणार लाभ

विद्यापीठाने प्रमाणीत केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम, तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती योजनेतंर्गत लागू करण्यात आलेले इतर शुल्क, आरोग्य विमा, व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्ती धारकासाठी अनुज्ञेय असणार आहेत. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी 15,400 युएस डॉलर, तर इंग्लडसाठी 9900 जी बी पौंड इतका अदा करण्यात येतो. विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर भारतात परत येण्याससाठी कमीत कमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा इकॉनॉमी क्लास विमान प्रवास दर दिला जाणार आहे. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी युएसए व इतर देशासाठी 1500 युएस डॉलर व इंग्लडकरीता 1100 जी.बी पौंड इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये पुस्तके, अभ्यास दौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

     सध्या कोविड – 19 या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणतेही कारण न देता सदर योजनेची प्रक्रिया रद्द करणे, प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलणे यासह योजने / निवड, अंमलबजावणीबाबतचे सर्व अधिकार शासन स्वत:कडे राखून ठेवत आहे. यावर्षी 11 मे 2020 च्या जाहीरातीचे अनुषंगाने ज्या विद्यार्थ्याने अर्ज केलेले  आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.

 

****

कोरोना अलर्ट : प्राप्त 165 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 55 पॉझिटिव्ह

  • 95 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 220 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 165 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 165 अहवालांचा समावेश आहे.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 4, परदेशीपुरा 1,  वार्ड क्रमांक दोन 2, पैनगंगा अपार्टमेंट 8, हाजी मलंग दर्गाजवळ 1, धाड ता. बुलडाणा : 1,  नांदुरा : 2, संकल्प कॉलनी 4, सिनेमा रोड 1, नवाबपूरा 1, कृष्णा नगर 1, रसलपुर ता. नांदुरा : 1,  शेगांव :  गजानन सोसायटी 1, जुना चिंचोली रोड 1, जळगांव जामोद : 1, दुधलगांव ता. मलकापूर : 3, तपोवन ता. मोताळा : 13, धा.बढे ता. मोताळा : 1, बोराखेडी ता. मोताळा : 1,  चिखली : 3,  मूळ पत्ता पातोंडा जि. अकोला : 1, आलेगांव ता. पातूर जि. अकोला : 1, अकोलखेड ता. अकोट जि. अकोला : 1, वाकी जि. अकोला : 1,  

 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 95 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली :13,  गांधीनगर 1, कालिंका मंदीराजवळ 2, पोलीस स्टेशनजवळ 2, सरस्वती नगर 1,  बागवानपुरा 1,  जळगांव जामोद : 9, दे. राजा : 7, चांदेश्वरी मंदीराजवळ 1, अहिंसा नगर 1, दुर्गापुरा 1, शनिवार पेठ 1, बालाजी फरस 3, असोला जहागीर ता. दे. राजा : 3,   शेगांव : दसरा नगर 1, बालाजी फैल 1, आदर्श नगर 3, उपजिल्हा रूग्णालय 1,   किनगांव राजा ता. सिं. राजा : 1, सिंदखेड राजा : 1, आंबेवाडी ता. सिं. राजा : 1, शेंदुर्जन ता. सिं. राजा : 1,    मलकापूर : पंत नगर 1, खामगांव : राठी प्लॉट 1, रॅलीस प्लॉट 5, भुसावल चौक 2,  पिं. राजा ता. खामगांव : 2, जानेफळ ता. मेहकर : 4, मेहकर : 1, डोणगांव रोड 2, पिं. काळे ता. जळगांव जामोद : 11, सुलतानपूर ता. लोणार : 7, लोणार : 2, अळसणा ता. शेगांव : 1,  

   तसेच आजपर्यंत 15312 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1783 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1783 आहे. 

  आज रोजी 1162 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15312 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2635 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1783 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 810 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************


No comments:

Post a Comment