Tuesday, 18 August 2020

DIO BULDANA NEWS 18.8.2020

 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर

  • मस्त्यकास्तकार, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी योजनेचा लाभ घ्यावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 18: प्रधानमंत्री मत्ससंपदा योजना 2020-21 ते 2024-25 या करिता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी यांचे निर्देशनुसार अटी व शर्तीचे अधिन मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

       प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेचा पात्रताधारक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यकास्तकार, मत्स्यसंवर्धक, खाजगी मत्स्य शेततळीधारक तसेच मत्स्य कामगार आदींनी लाभ देण्याची कार्यवाही, जिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांचे मार्गदर्शनानुसार  सुरु आहे. योजनेबाबत लवकरच राज्य शासनाची मार्गदर्शन सुचना निर्गमित होणार आहे. 

       प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेचे व्हिजन पर्यावरणीय दृष्टया सशक्त, आर्थिकदष्टया फायदेशिर आणि सामाजिकदृष्टया सर्वसमावेशक मत्सव्यवसाय विभागाचा समावेश करुन आर्थिक सुबत्ता आणि मच्छिमार, मत्सकास्तकार, मत्सशेतकरी यांचे कल्याण करणे आहे.  देशाला अन्न आणि जिवनसत्व सुरक्षितता नियमित आणि जबाबदार पध्दतीने देणे हा यो योजनेचा मुख्य उद्देश आहे.

       मत्स्यवव्यसायाचे उपलब्ध पायाभूत सुविधा यांची क्षमता नियमित आणि जबाबदार पध्दतीने सम प्रमाणात एकत्रिरित्या वाढविणे,  मत्स्यउत्पादन आणि उत्पादकता या मत्स्यव्यवसायाचे क्षेत्रास विस्तारीकरणास चालना देणे, उपलब्ध पायाभूत सुविधा, जसे पाणी जलक्षेत्र, विविध स्त्रोत असलेले जलक्षेत्र जास्तीत जास्त उपयोगात आणणे, अन्न साखळी आधुनिक पध्दतीने मजबुत व बळकटीकरण करणे, मासळी हंगाम तथा मासळी पकडणे, काढणी पश्चात व्यवस्थापण दर्जेदार पध्दतीने सुधारणा करणे, मच्छिमार, मत्स्यकास्तकार यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविणे आणि रोजगाराची नियमित सुविधा वाढविणे, निर्माण करणे, राष्ट्रीय कृषी उत्पन्नातील मत्स्यव्यवसाय विभागाचा उत्पन्नाचा हिस्सा वाढविणे, मच्छिमार मत्स्यकास्तकार, मत्स्य शेतकरी यांना वैयक्तीक, सामाजिक, आर्थिक आणि व्यक्तीगत सुरक्षितता मत्स्योत्पादन दुप्पटीने वाढवून उपलब्ध करुन देणे, मत्स्यव्यवसायाचा डाटाबेस आणि व्यवस्थापन आराखडा तयार करणे आणि नियमित मत्स्यव्यवसाय करणे, आदी या योजनेचे उद्दिष्ट आहेत.   

        ही  योजना पुर्णपणे मत्स्यविकास व संवर्धनाची छत्रीसारखी योजना आहे.अनुसुचित जाती, अनु. जमाती, महिला, अपंग व्यक्ती, मत्स्यपालन सहकारी संस्था, संघ, मत्स्य उत्पादन संघटना, बचत गट, संयुक्त दायित्व गट, (जे.एल.जी.) आणि वैयक्तिक उद्योजक इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याद्वारे मच्छिमार व मत्स्यकास्तकार यांचे उत्पन्न दुप्पट करणे व रोजगार निर्मिती करणे या महत्वाच्या उद्दिष्ट साध्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीने आवश्यक योजनांकरीता बॅका, वित्तिय संस्थाशी संबंध जोडून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे उद्दिष्ट साध्य करणे अभिप्रेत आहे.

       सदर योजनेचे प्रामुख्याने दोन भाग राहणार आहेत. (अ) केंद्रिय क्षेत्र योजना (ब) केंद्र पुस्कृत योजना, सर्वसाधारण लाभार्थीसाठी केंद्राचे आर्थिक सहाय्य व लाभार्थ्याचा हिस्सा याचे प्रमाण 40:60 प्रमाणे राहिल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आर्थिक सहाय्य व लाभार्थ्याचा हिस्सा याचे प्रमाणे 60:40 प्रमाणे राहिल. या केंद्र स्तरीय योजनेकरिता 5 वर्षाकरीता रुपये 1720 कोटींचा नियतव्यय ठेवण्यात आलेला आहे. केंद्र पुरस्कृत योजनेची संरचना बऱ्याच अशी नीलक्रांती योजनेशी आहे. केंद्रीय क्षेत्र योजना व केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केलेल्या तरतूदीचे नियोजन खालील घटक उपक्रमात करणे प्रस्तावित आहे.  उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, पायाभूत सुविधा व काढणी पश्चात व्यवस्थापन, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन आणि नियामक रचना.

    या योजनेअंतर्गत नविन मत्स्यसंवर्धन तळी तयार करणे, शितपेटीसह ॲटोरिक्षा, शितपेटीसह मोटार सायकल, इन्सुलेटेड व्हॅन (6 टन), लघु मत्स्यखाद्य कारखाना तयार करणे, निविष्ठा अनुदान, इत्यादी योजनांचा समावेश आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन काही योजनांना मंजूरी देऊन कार्यान्वित होत आहेत. जसे बायोफ्लॉक इत्यादी योजनांचा समावेश आहे.  सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या इच्छूक लाभार्थ्यानी अर्ज सादर करावेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहीत कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करुन घेण्यात येणार आहेत.  योजनेबाबत अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) प्रशासकीय इमारत, बस स्टँड समोर, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे  सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

                                                                                    ***************

                       कोरोना अलर्ट : प्राप्त 155 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 104 पॉझिटिव्ह

  • 50 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.18: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 259 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 155 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 104 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 92 व रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 99 तर रॅपिड टेस्टमधील 56 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 155 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले कोविड केअर सेंटरनिहाय अहवाल पुढीलप्रमाणे : कोविड केअर सेंटर बुलडाणा : महिला 13, पुरूष 27, एकूण 40.  कोविड केअर सेंटर आयुर्वेद महाविद्यालय बुलडाणा : पुरूष 6, महिला 3, एकूण 9. कोविड केअर सेंटर मेहकर : महिला 4, पुरूष 7, एकुण 11. कोविड केअर सेंटर नांदुरा : पुरूष 7, एकूण 7. कोविड केअर सेंटर मलकापूर : महिला 2, पुरूष 3, एकूण 5.  शासकीय सामान्य रूग्णालय खामगांव : महिला 10, पुरूष 15,  एकूण 25. कोविड केअर सेंटर सिंदखेड राजा : महिला 2, पुरूष 1, एकूण 3. कोविड केअर सेंटर शेगांव :  महिला 2. कोविड केअर सेंटर देऊळगांव राजा : महिला 1 व पुरूष 1, एकूण 2  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 104  रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 50 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर निहाय सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोविड केअर सेंटर बुलडाणा : महिला 10, पुरूष 6, एकूण 16. कोविड केअर सेंटर देऊळगांव राजा : महिला 4. कोविड केअर सेंटर जळगांव जामोद : महिला 1, पुरूष 2, एकूण 3 . कोविड केअर सेंटर खामगांव : पुरूष 5, महिला 4, एकूण 9. कोविड केअर सेंटर लोणार : पुरूष 5, महिला 1, एकूण 6. कोविड केअर सेंटर मेहकर : महिला 1. कोविड केअर सेंटर नांदुरा : महिला 1. कोविड केअर सेंटर शेगांव : महिला 4, पुरूष 2, एकूण 6. शासकीय सामान्य रूग्णालय खामगांव : पुरूष 2, महिला 1, एकूण 3 . महिला रूग्णालय बुलडाणा : पुरूष 1.

   तसेच आजपर्यंत 14371 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1449 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1449 आहे. 

  आज रोजी 123 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14371 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2356 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1449 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 867 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 40 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


--

No comments:

Post a Comment