जिल्ह्यात बरसल्या दमदार पर्जन्यधारा…!
- सरासरी 18.3 मि.मी पावसाची नोंद
- दे.राजा तालुका वगळता सर्वत्र जोरदार पाऊस
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : जिल्हाभरात काल 8 जुलै सायंकाळी सर्वत्र कमी अधिक प्रमाणात दमदार पर्जन्यधारांचा वर्षाव झाला. पुनर्वसु नक्षत्रापर्यंत पावसाळा आला असून दमदार पावसाच्या प्रतिक्षेत जिल्हा होता. काल ती अपेक्षा पावसाने पुर्ण केली. दे.राजा तालुका वगळता जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 18.3 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 26.6 मि.मी (299.4), चिखली : 2.7 (235.9), दे.राजा : निरंक (227.8), सिं. राजा : 0.3 (286.1), लोणार : 4.5 (240.6), मेहकर : 11.1 (217.9), खामगांव : 14.4 (159.3), शेगांव : 30.4 (197.4), मलकापूर : 39.2 (330.2), नांदुरा : 36.5 (252.7), मोताळा : 30 (161.7), संग्रामपूर : 29.6 (322.6), जळगांव जामोद : 12.6 (287.2)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3218.8 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 247.6 मि.मी आहे. सर्वात जास्त मलकापूर तालुक्यात पाऊस झाला आहे.
फळबागेसाठी शासकीय रोपवाटीकेतील रोपांची लागवड करावी
- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : जिल्ह्यामध्ये सन 2020-21 चा लागवड हंगाम सुरू झालेला आहे. त्यासाठी रोगमुक्त कलमांचे लागवड करण्याकरिता कृषि विभागातंर्गत शासकीय रोपवाटीकांमधील डाळींब, लिंबू, आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, सिताफळ, चिंच आदी रोपांची रोपवाटीका तपासणी समितीतील कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या तसेच वनस्पती विकृती शास्त्र विभाग या शास्त्रज्ञांनी कलम – रोपांची तपासणी केलेली आहे. शासकीय रोपवाटीकेतील उपलब्ध कलमा – रोपे लागवडीस योग्य असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या शासकीय रोपवाटीकेतून रोगमुक्त कलमा – रोपांची उचल करून लागवड करावी.
जिल्ह्यात बुलडाणा, दे. मही, सिं.राजा, पिं.राजा व आसलगांव येथे शासकीय रोपवाटीका आहेत. रोप- कलमांसाठी जिल्हा फळबाग रोप वाटीका बुलडाणा येथे मयुरी खलाने 9421284843, दे. मही रोपवाटीकेमध्ये के. एन इंगळे 8793956800, सिं. राजा फळबाग रोपवाटीकेसाठी स्वाती इंगोले 7517766494, पिं. राजा ता. खामगांव रोपवाटीकेत व्ही. व्ही. परमार 9404870009, आसलगांव ता. जळगांव जामोद रोपवाटीकेतील यु. आर. आढाव 8275231916 क्रमांकावर संपर्क साधावा.
फळपिकनुसार वाण व दर पुढीलप्रमाणे : आंबा कलमे - वाण केशर व दशहरी, दर 60 रूपये. आंबा रोपे – केशर, दर 25 रूपये. संत्रा- वाण नागपूर संत्रा, किन्नो, दर 50 रूपये. मोसंबी - वाण न्युसेलर, दर 50 रूपये. पेरू कलमे- वाण एल 49, दर 50 रूपये. चिकु- वाण कालीपत्ती, दर 70 रूपये. डाळींब- वाण भगवा, दर 35 रू. सिताफळ रोपे- वाण बालावनगर, दर 25 रू व सिताफळ कलमे- वाण बालानगर , दर 40 रू. कागदी लिंबू रोपे व कागदी लिंबू कलमे – वाण साई सरबत्ती, दर अनुक्रमे 25 व 30 रूपये. बदाम – वाण स्थानिक, दर 25 रू, जांभुळ रोपे- वाण बहारडोली, दर 25 रू, फणस- वाण स्थानिक, दर 25 रू, चिंच- वाण स्थानिक, दर 25, आवळा कलमे – वाण कृष्णा, दर 40 रू, आवळा रोपे- दर 25 रू, जंबेरी, फुलरोपे व बांबु वाणासाठी दर 25 रूपये आहे.
तरी फळबाग लागवड कार्यक्रम सन 2020-21 साठी शासकीय रोपवाटीकेवरील शास्त्रज्ञांच्या तपासणी समितीद्वारे तपासणी झालेले कलमे- रोपे उचल करून लागवड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
- 31 जुलै 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,(जिमाका) दि.9 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत ऑगस्ट 2020 चे नियतनातील प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेकरीता गहू व तांदूळ धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 जुलै 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो, तर परिमाण प्रति लाभार्थी 3 किलो गहू व तांदूळ 2 किलो आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 4320 क्विंटल व तांदूळ 2880 क्विंटल, बुलडाणा : गहू 5164 क्विंटल व तांदूळ 3441, दे.राजा गोदामाकरीता गहू 2197 तांदूळ 1445, अमडापूर : गहू 1404 क्विंटल व तांदूळ 936, मोताळासाठी गहू 3287 क्विंटल व तांदूळ 2192, नांदुरासाठी गहू 3211 क्विंटल व तांदूळ 2141, खामगांव गोदामकरीता गहू 4976 व तांदूळ 3316, शेगांवकरीता गहू 2695 व तांदूळ 1797, जळगांव जामोद करीता गहू 3141 व तांदूळ 2094, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2722 व तांदूळ 1815, मेहकरसाठी गहू 3496 व तांदूळ 2329, लोणारकरीता गहू 2423 व तांदूळ 1615, सिंदखेड राजाकरीता गहू 1675 क्विंटल व तांदूळ 1116, मलकापूर : गहू 3181 व तांदूळ 2121, साखरखेर्डा गहू 1271 व तांदूळ 847 आणि डोणगांव करीता गहू 1237 क्विंटल व तांदूळ 825 असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 46370 क्विंटल व तांदूळ 30910 पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
********
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
- 31 जुलै 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,(जिमाका) दि. 9 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत ऑगस्ट 2020 चे नियतनातील अंत्योदय लाभार्थी योजनेकरीता गहू व तांदूळ धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 जुलै 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो, तर परिमाण प्रति कार्ड 20 किलो गहू व तांदूळ 15 किलो आहेत.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 630 क्विंटल व तांदूळ 473 क्विंटल, बुलडाणा : गहू 1386 क्विंटल व तांदूळ 1039, दे.राजा गोदामाकरीता गहू 558 तांदूळ 419, अमडापूर : गहू 215 क्विंटल व तांदूळ 161, मोताळासाठी गहू 1147 क्विंटल व तांदूळ 860, नांदुरासाठी गहू 1239 क्विंटल व तांदूळ 929, खामगांव गोदामकरीता गहू 974 व तांदूळ 731, शेगांवकरीता गहू 622 व तांदूळ 467, जळगांव जामोदकरीता गहू 1028 व तांदूळ 771, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 1239 व तांदूळ 928, मेहकरसाठी गहू 836 व तांदूळ 627 , लोणारकरीता गहू 1334 व तांदूळ 1000, सिंदखेड राजाकरीता गहू 551 क्विंटल व तांदूळ 414, मलकापूर : गहू 911 व तांदूळ 684, साखरखेर्डा गहू 306 व तांदूळ 229 आणि डोणगांव करीता गहू 264 क्विंटल व तांदूळ 198 असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 13240 क्विंटल व तांदूळ 9930 पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
*************
महाडिबीटी प्रणालीतंर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 17 जुलैपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : महाडीबीटी प्रणालीवर सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर 979 अर्ज प्रलंबित आहेत. सदर शिष्यवृत्ती, प्रथम हप्ता शिष्यवृत्ती , शिक्षण व परीक्षा शुल्क अर्ज महाविद्यालयास महाडीबीटी प्रणालीवर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यास 17 जुलै 2020 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.
महाविद्यालय प्राचार्य यांनी अर्ज तात्काळ अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क पात्र अर्ज समाजकल्याण कार्यालयास ऑनलाईन सादर करावे. शासनाकडून अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर दि. 10 जुलै 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे आगमन, दु. 12.35 वा शासकीय विश्रामभवन येथून काँग्रेस भवन करीता प्रयाण, दु. 2.15 वा काँग्रेस भवन येथून शासकीय विश्राम भवनाकडे प्रयाण व राखीव, दु. 3.15 वा शासकीय विश्राम भवन येथून जिल्हा परिषद बुलडाणाकडे प्रयाण, दु. 3.20 वा महिला व बालविकास तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, बुलडाणा विभागाची जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक, सायं 5.10 वा जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग् अधिकारी यांचेसमवेत कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत चर्चा व आढावा, सायं 5.45 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथून वडनेर भोजली ता. नांदुराकडे प्रयाण, सायं 7 वा वडनेर भोलजी, ता. नांदुरा येथे श्री. राजेश देशमुख यांचे निवासस्थानी आगमन व मुक्काम असेल.
No comments:
Post a Comment