पर्जन्यधारांची दमदार बरसात…!
- सरासरी 27 मि.मी पावसाची नोंद
- जळगांव जामोद तालुक्यात सर्वात जास्त 69.8 मि.मी पावसाची नोंद
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : काल झालेल्या मुसळधारेनंतर आज सकाळपर्यंत जिल्ह्यात पर्जन्यधारांनी दमदार बरसात केली. परिणामी शेतकरी सुखावला आहे. आंतर मशागतीची कामे आटोपल्यानंतर अनेक भागात पावसाची आसा होती. ती पूर्ण झाली. जळगांव जामोद तालुक्यात सर्वात जास्त 69.2 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार सरासरी 27 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 19.6 मि.मी (327.8), चिखली : 8.5 (271.3), दे.राजा : 3.2 (239.6), सिं. राजा : 2.6 (311.8), लोणार : 3.7 (259.3), मेहकर : 5.9 (259), खामगांव : 22.4 (225.4), शेगांव : 29.6 (335.8), मलकापूर : 67.2 (413.8), नांदुरा : 43.7 (323.8), मोताळा : 33 (200.6), संग्रामपूर : 41.4 (411.2), जळगांव जामोद : 69.8 (363.6)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3943 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 303.3 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 200.6 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.
इयत्ता 12 वीचा जिल्ह्याचा निकाल 92.18 टक्के
- मुलांचा 90.17, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.85
- विज्ञान शाखा 98.18, कला 90.55, वाणिज्य 93.44 व व्होकेशनल शाखा 87.96 टक्के
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता 12 वी चा निकाल आज जाहीर झाला. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निकाल कधी लागणार असा प्रश्न असताना मंडळाने आज लावलेला निकाल महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून सर्व शाखांमध्ये मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 92.18 टक्के लागला आहे.
जिल्ह्यात इयत्ता 12 वी ची परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये पार पडली. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण 32 हजार 552 विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी 32 हजार 440 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 514 मुले, तर 13 हजार 926 मुली आहेत. त्यापैकी 16 हजार 694 मुले आणि 13 हजार 209 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 90.17 असून मुलींची टक्केवारी 94.85 आहे.
शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेस जिल्ह्यातील 14510 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 14119 परीक्षेस बसले असून 13 हजार 862 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याची टक्केवारी 98.18 आहे. तसेच कला शाखेत 12712 विद्यार्थ्यांनी नोंदणी होती. त्यापैकी 12651 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाखेत 11 हजार 456 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी 90.55 आहे. वाणिज्य शाखेमध्ये 3316 विद्यार्थी नोंदणी व 3309 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्यापैकी 3092 उत्तीर्ण झाले असून 93.44 निकालाची टक्केवारी आहे. व्होकेशनल शाखेत विद्यार्थी नोंदणी 1099 आहे, तर 1088 विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी 957 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 87.96 आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 1273 विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षा दिली. त्यापैकी 536 पुर्नपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 42.11 आहे.
जिल्ह्यात नियमित विद्यार्थ्यांमध्ये 17 हजार 548 मुलांनी परीक्षेस नोंदणी केली. तसेच 13 हजार 729 मुलींनी नोंदणी केली. यामध्ये 17 हजार 505 मुले व 13 हजार 662 मुली परीक्षेस बसले. तर 16 हजार 287 मुले व 13 हजार 80 मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचप्रमाणे पुर्नपरीक्षार्थ्यांनी व्होकेशनल शाखेत उत्तीर्णतेचा अधिक टक्का दिला आहे. जिल्ह्यात इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा प्रशासनाने अभिनंदन केले आहे
No comments:
Post a Comment