सोयाबीन पिकाची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी द्याव्या
- 5 जुलै पर्यंत मुदत, कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि.1 : खरीप हंगाम 2020 मध्ये जिल्ह्यात प्रथम 4 जुन व नंतर 13 जुनपासून पावसास सुरूवात झाली. जिल्ह्यात 15 जुनपर्यंत 20 हजार 27 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या होत्या. त्यानंतर पडलेल्या 16 जुन रोजीच्या पावसामुळे 20 जुनपर्यंत पेरण्या झाल्या. या दिवसापर्यंत पेरलेले सोयाबीन बियाणे पुढील 8 दिवसात उगवणे अपेक्षीत होते. सदरची उगवण झाली नसल्यास लगेचच तक्रार करणे अपेक्षीत होते. तरी शेतकऱ्यांनी पुढील 5 जुलैपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे द्याव्यात.
तरी शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाण्याची उगवन झाली नसल्यास लेखी तक्रार, बियाणे खरेदी केलेल्या पावती, टॅग, बियाणे पिशवी व पेरणी दिनांकासह संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधीत पंचायत समिती कृषि अधिकारी यांचेकडे 5 जुलै पर्यंत द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment