Wednesday, 15 July 2020

DIO BULDANA NEWS 15.7.2020

आषाढधारांनी जिल्हा चिंब…!
  • सरासरी 21.2 मि.मी पावसाची नोंद
  • मोताळा तालुका वगळता सर्वत्र दमदार पाऊस
  • शेगांव तालुक्यात तब्बल 108.8 मि.मी पावसाची नोंद
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : जिल्ह्यातील पुर्वेला असणाऱ्या खामगांव, शेगाव व मेहकर तालुक्यांमध्ये रात्री पासून कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आज सकाळपासूनच सर्वदूर आषाढधारांनी वर्षाव करीत बळीराजाला सुखावले आहे. दमदार पावसामुळे खरीपातील पिके डौलाने डोलत आहेत. तालुक्यातील अन्य तालुक्यांमध्येही पावसाने आपले अस्तित्व दाखवित चांगलीच बॅटींग केली आहे. मोताळा तालुका वगळता जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 21.02 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 4.1 मि.मी (308.2), चिखली : 7.2 (262.8), दे.राजा : 3.6 (236.4), सिं. राजा : 10.6 (309.2), लोणार : 6 (255.6), मेहकर : 15.5 (253.1), खामगांव : 40.3 (203), शेगांव : 108.8 (306.2), मलकापूर : 4.2 (346.6), नांदुरा : 22.2 (280.1), मोताळा : निरंक (167.6), संग्रामपूर : 46.4 (369.8), जळगांव जामोद : 6.6 (293.8)
 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3592.4 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 576.3 मि.मी आहे. सर्वात जास्त  108.8 मि.मी अतिवृष्टीची नोंद शेगांव तालुक्यात झाली आहे.
                                                                        **********
                 सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करावी
  • जुन्या उमेदवारांनी आपल्या नोंदणीचे अद्ययावतीकरण करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : राज्य शासनाच्या पुर्वीच्या रोजगार व स्वयंराजेगार व सध्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या उमेदवारांनी आपल्या नोंदणीचे अपडेशन करावे लागणार आहे.
  नोंदणी क्रमांकास आपला आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे. ही माहिती अपडेट करण्याकरीता उमेदवारांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. उमेदवार आपल्या नोंदणी कार्डचे अपडेशन मोबाईल, लॅपटॉप, सायबर कॅफे येथून करू शकतात. जर उमेदवारांना याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास आपण कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर 07262-242342 क्रमांकावर संपर्क करून माहिती घ्यावी. जर उमेदवारांनी आपली नोंदणीमधील माहिती अपडेट न केल्यास जुन्या नोंदणी असलेल्या उमेदवारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2020 पर्यंत रद्द होणार आहे. तरी उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नाव नोंदणी करावी व जुन्या नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अपडेट करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  सु. रा झळके यांनी केले आहे.
                                                                                    ******




कोरोना अलर्ट : प्राप्त 311 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 69 पॉझिटिव्ह
  • 13 रूग्णांची  कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 380 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 311 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 69 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 14 तर रॅपिड टेस्टमधील 297 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 311 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव : भुसारी गल्ली - 73, 32, 35, 44, 6 व 36  वर्षीय पुरूष, 28, 33, 45, 22, 65 वर्षीय महिला, 6 महिन्याची मुलगी. बाळापूर फैल :  15, 21, 65, 85, 38, 22, 28 वर्षीय महिला, 11, 35, 10, 15 व 5  वर्षीय पुरूष. जलंब नाका : 20 वर्षीय पुरूष, 21, 42 वर्षीय महिला. बोदडे कॉलनी : 29 व 35 वर्षीय महिला. दे. राजा : वाल्मिक नगर- 65, 31, 36, 37, 30, 11 व 9 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, आंबेडकर नगर : 59 वर्षीय पुरूष, सिव्हील कॉलनी : 51 व 19 वर्षीय पुरूष,43 वर्षीय महिला, अग्रसेन चौक : 29 व 2 वर्षीय पुरूष, जुना जालना रोड : 57 वर्षीय  पुरूष व 45 वर्षीय  महिला, बालाजी नगर : 34 वर्षीय  पुरूष, जळगांव जामोद : 22 वर्षीय पुरूष,  रामनगर - 60 वर्षीय पुरूष, शेगांव : 60 व 59 वर्षीय महिला, चारमोरी : 60 वर्षीय महिला, खिरानी मळा 19 वर्षीय महिला, उमेश नगर 46 वर्षीय महिला, दसरा नगर 30 वर्षीय पुरूष, नांदुरा : विदर्भ चौक 60 वर्षीय पुरूष, माळीपुरा 51 वर्षीय पुरूष, ओमनगर 32 व 40 वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द 70 वर्षीय पुरूष, बुलडाणा : मुठ्ठे ले आऊट 58 वर्षीय पुरूष, नागापूर ता. मेहकर : 50 वर्षीय पुरूष, चिखली : शिक्षक कॉलनी 70 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरूष, बगीचाजवळ 26 वर्षीय पुरूष, दुध डेअरीजवळ 10 वर्षीय मुलगी, आनंद नगर 29 वर्षीय पुरूष, करवंड ता. चिखली : 60 वर्षीय महिला आणि मलकापूर :  47 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 69  रूग्ण आढळले आहे.
  यामध्ये आज उपचारादरम्यान करवंड ता. चिखली येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
      तसेच आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये मंगल गेट मलकापूर येथील 17, 48 व 27 वर्षीय पुरूष, 45 व 31 वर्षीय महिला, आळंद ता. मलकापूर येथील 19 वर्षीय महिला, बस स्थानकाजवळ खामगांव येथील 34 वर्षीय महिला, मखानीया मैदान खामगांव येथील 35 व 32  वर्षीय महिला, शेगांव रोड खामगांव येथील 18 वर्षीय महिला, आळसणा ता. शेगांव येथील 40 व 56 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 24 वर्षीय महिला  रूग्णाचा  समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 5339 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 285 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 285 आहे. 
  आज रोजी 35 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5339 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 625 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 285 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 319 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 18 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******

No comments:

Post a Comment