Saturday, 4 July 2020

DIO BULDANA NEWS 4.7.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 126 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 7 पॉझिटिव्ह
• दहा रूग्णांची  कोरोनावर मात, मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 133 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 126 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये  साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 65 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी देऊळगाव राजा येथील 30 वर्षीय पुरूष व 30 वर्षीय महिला, मूळ पत्ता जळगांव खांदेश सध्या खामगांव येथे दाखल असलेले 28 वर्षीय पुरूष, तसेच मेरा ता. चिखली येथील 35 वर्षीय महिला आणि चिखली येथील 19 वर्षीय तरूण रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 7 नवीन रूग्ण आढळले आहे.
  तसेच आज 10 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आहे.  त्यामध्ये जलंब नाका खामगांव येथील 27 वर्षीय महिला, मूळ पत्ता रामदास पेठ अकोला व खामगांव कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेली 20 वर्षीय तरूणी, 8 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.  तसेच बावनबीर ता. संग्रामपूर येथील 27 वर्षीय पुरूष, शादीखाना शेगांव येथील 60 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 45 वर्षीय पुरूष, सुलतानपूर ता. लोणार येथील 42 वर्षीय महिला, मोहनपुरा मलकापूर येथील 30 वर्षीय महिला व शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला रूग्णाला आज सुट्टी देण्यात आली आहे.
    आजपर्यंत 2993 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 172 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 172 आहे.  तसेच आज 4 जुलै रोजी 133 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 7 पॉझीटीव्ह, तर 126 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 277  नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2993 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 278 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 172 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 93 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

--

No comments:

Post a Comment