भुमि अभिलेखच्या सेवा ऑनलाईन
- https://landrecord.mahaonline.
gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : भूमि अभिलेख कार्यालयाच्या सेवा 9 मार्च 2020 पासून ऑनलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी https//landrecord.mahaonline. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अनेक नागरिक नकलांची मागणी करण्यासाठी उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात येतात. त्यांना ऑनलाईन अर्ज घरूनच करता येतात.
सदर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज व सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. ऑनलाईन अर्ज कसा करावा, या बाबत प्रात्याक्षिकासह समजावून सांगण्यात येते. नागरिकांना याबाबत मार्गदर्शन केले नाही, तर त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भूमि अभिलेख कार्यालयात नागरिकांना त्रास देण्यात येत नाही. तसेच ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली हेलपाटे देण्याचा कुठलाही प्रकार होत नाही. अर्जदार हे सेतु किंवा मान्यताप्राप्त संगणक केंद्रावर जावून त्यांना हव्या असलेल्या नकलेसंदर्भात उपरोक्त संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करतात. त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत सेतु चालक किंवा शासन मान्यताप्राप्त संगणक केंद्र चालक यांचेकडून अर्जदारांनी केलेल्या नकल अर्जाची प्रत संबंधीत अर्जदारास देण्यात येते. ती प्रत घेवून अर्जदार सदर कार्यालयात नक्कल मागणी करतात. अर्जदार संबंधीत कार्यालयात आल्यानंतर त्यांनी मागणी केलेल्या नक्कलेची अभिलेखावरून खात्री करण्यात येवून नक्कल शुल्क त्यांनी केलेल्या अर्जाप्रमाणे ऑनलाईन कळविण्यात येते.
त्यानंतर संबंधीत अर्जदार त्यांनी ज्या सेतू किंवा मान्यता प्राप्त संगणक केंद्रावरून ऑनलाईन अर्ज दाखल केला. तेथून नक्कल शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतात. त्यानंतर त्यांना विहीत कालावधीत संबधीत नक्कल पुरविण्यात येते. सदरची प्रक्रिया ही शासनाने दिलेल्या निर्देशाचाच एक भाग आहे. त्यामुळे भूमिलेख कार्यालयात नागरिकांना त्रास, ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली हेलपाटे मारावे लागणे, असे म्हणणे योग्य होणार नाही. तसेच सदर कार्यालयाकडून नागरिकांना त्रास देण्याचा कुठलाही मानस नाही. याउलट कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून योगय त्या सेवा त्यांना तत्पर मिळणेबाबत योग्य ते सहकार्यच केले जात आहे, असे उपअधिक्षक भूमि अभिलेख ए. डी मडके यांनी कळविले आहे.
जून महिन्याचे विवरणपत्र ऑनलाईन सादर करावे
- कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, अनुदानीत, विना अनुदानीत शाळा, महाविद्यालये यांनी माहे जुन 2020 चे त्रैमासिक इ आर -1 विवरण पत्र www.mahaswayam.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करावे. विवरण पत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 आहे. तरी सर्व आस्थापना, उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करावे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाने www.mahaswayam.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. यावर सर्व रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. . जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा यांचेकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक, आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसुचीत करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्वये सदर कार्यालयास विवरण पत्र सादर करावयाचे आहे. ऑनलाईन ई आर- 1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक 07262-242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु. रा झळके यांनी केले आहे.
कोरोना अलर्ट : प्राप्त 142 कोरोना अहवाल निगेटीव्ह; 17 पॉझीटीव्ह
- 3 रूग्णांची कोरोनावर मात, मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किट्स द्वारे प्राप्त अहवालांपैकी 159 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 142 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्रयोगशाळेतून प्राप्त 65 व रॅपिड टेस्टमधील 94 असे एकूण 159 अहवाल प्राप्त आहे. त्यामध्ये प्रयोगशाळेतील 49 निगेटीव्ह, तर रॅपिड टेस्टमध्ये 93 निगेटीव्ह आहेत. तसेच प्रयोगशाळेतील अहवालात 16 पॉझीटीव्ह व रॅपिडमध्ये 1 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहे.
प्रयोगशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये खामगाव येथील 21 व 65 वर्षीय महिला, जळगांव जामोद येथील 50 वर्षीय पुरूष, पिं. राजा ता. खामगांव येथील 29 वर्षीय महिला, इंदिरा नगर चिखली येथील 29 व 61 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 38, 34 व 60 वर्षीय महिला, 38 व 18 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगी, 9 वर्षीय मुलगा, शिक्षक कॉलनी शेलूद ता. चिखली येथील 52 वर्षीय पुरूष, गुंजाळा ता. चिखली येथील 70 वर्षीय पुरूष, दुर्गानगर दे.राजा येथील 60 वर्षीय महिला संशयीत रूग्णांच्या अहवालाचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इदगाह मैदान शेगांव येथील 65 वर्षीय महिला रूग्ण व मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 3 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोलार ता. चिखली येथील 67 वर्षीय महिला, धोत्रा भनगोजी ता. चिखली येथील 50 वर्षीय पुरूष व फाटकपुरा खामगांव येथील 78 वर्षीय वृद्ध पुरूषाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत प्रयोगशाळेतून व रॅपिड टेस्टद्वारे 3429 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 204 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 204 आहे. आज रोजी 311 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3429 आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 360 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 204 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात प्रयोशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालातील 125 व रॅपिड टेस्ट किटमधील 16 अशाप्रकारे 141 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 15 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
****
सोयाबीनवरील चक्रीभुंगा व मक्यावरील लष्करी अळीचा बंदोबस्त करावा
- कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.8 : बुलडाणा जिल्हयात जुलै 2020 च्या पहिल्या आठवडयात सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडणे तसेच सोयाबीनवरील चक्रीभुंगा व मक्यावरील फॉल लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून त्याचे नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषि विभागाचेवतीने करण्यात येत आहे.
सोयाबीन तणनाशके फवारणीमुळे अथवा इतर कारणाने पिवळी पडत असल्यास शेतकऱ्यांनी युरीया देऊ नये. युरीयाचा वापर केल्याने पिकाची फाजील वाढ जास्त होते. याकरिता कोणतीही उपाययोजना न करता 10 दिवसांनी पीक पूर्ववत होईल. पावसाने दिलेल्या उघडीपमुळे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता असून प्रादुर्भाव टाळण्यासाठी सायंकाळच्या वेळी इंडोक्सीकर्ब 15.8 ईसी 6.60 मिली. (किंगडॉक्स), थायक्लोप्रीड 21.7 ईसी 15 मिली (स्प्लेंडर) क्लोस्ल्ट्रा निलीप्रोल 18.5 ईसी 3 मिली (कोटॉजन) किटकनाशकांची फवारणी 10 लीटर पाण्यातून करावी.
तसेच मक्यावरील फॉल लष्करी अळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सायंकाळच्यावेळी इमामेक्टीन बेन्झोएट - 4 मिली. , स्पिनोसॅड - 3 मिली., क्लोस्ल्ट्रानिलीप्रोल - 3 मिली किटकनाशकाची 10 लीटर पाण्यातून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment