DIO BULDANA NEWS 13.7.2020

कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे
·         महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना
·         जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ही महत्वाकांक्षी योजना घोषित केलेली असून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्याटप्याने प्रसिध्द होत आहे. योजनेच्या निकषानुसार यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र/ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.
      आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते. आजरोजी जिल्हयामध्ये योजने अंतर्गत 1 लक्ष 62 हजार 943 शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. यापैकी, 1 लक्ष 50 हजार 698 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पुर्ण झालेली आहे. उर्वरीत 12 हजार 245 शेतकऱ्यांची अद्यापही आधार प्रमाणिकरण पुर्ण न केल्यामुळे योजनेच्या निकषानुसार सदरचे शेतकरी प्रलंबित आहेत.
   तरी ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून अद्यापही आधार प्रमाणिकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र / ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंन्सिग चे पालन करून तात्काळ आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण करावी,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                            *********

कोविड तपासणी प्रयोगशाळेसाठी तांत्रिक बाबींची पुर्तता करावी
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
  • जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट, कामांची केली पाहणी
बुलडाणा, दि. 13 (जिमाका) : राज्य शासनाने बुलडाणा येथे RT PCR ही कोविड आजाराचे निदान करणारी प्रयोगशाळा मंजूर केली आहे. प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातच कोविडचे निदान होणार आहे. त्यामुळे आपल्या येथील संशयीत व्यक्तींना चाचणी अहवालासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही.  प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची तातडीने पुर्तता करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
  जिल्हा स्त्री रूग्णालय अर्थात डेडीकेटेड कोविड केअर हॉस्पीटल येथे टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, डॉ. भुसारी,  टाटा ट्रस्टचे श्री. लोणारे आदी उपस्थित होते.
   टाटा ट्रस्टने लवकरात लवकर रूग्णालयाचे काम पूर्ण करून रूग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोविड रूग्णांची वाढती संख्या पाहता रूग्णालय लवकर रूग्णसेवेत रूजु करणे गरजेचे आहे. टाटा ट्रस्ट दर्जेदार काम करीत आहे. त्यामुळे एक अद्ययावत रूग्णालय जिल्हावासियांना मिळणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सदर रूग्णालयाचा रूग्णसेवेसाठी प्रभावी वापर करता येणार आहे. येथील प्रयोगशाळेसाठी  आवश्यक असणारे मनुष्यबळ राष्ट्रीय हेल्थ मिशन व नियमित स्टाफमधून पुरविण्यात यावे. प्रयोगशाळा लवकर सुरू करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.
    याप्रसंगी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रयोगशाळा जागा, नर्सींग रूम, डॉक्टर्स रूम, वाटर ट्रीटमेंट प्लँन्ट व आयसीयु कक्षाची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करीत अडचणीही जाणून घेतल्या. 
दृष्टीक्षेपात कोविड रूग्णालय
  • एकूण 104  बेड
  • सर्व बेड्सला ऑक्सीजन, नर्स बोलाविण्याची सुविधा
  • आयसीयु बेडची संख्या 20, व्हेन्टिलेटरने सुसज्ज
  • मेडीकल वेस्ट प्लँन्ट, वाटर ट्रिटमेंट प्लँन्ट
  • रूग्णालयात वैद्यकीय सेवा देण्यापूर्वीं पिपिई किट घालणे व काढण्याची खास व्यवस्था
  • जंतुसंसर्ग टाळण्यासाठी रूग्ण आत जाणे व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र रस्ता
  • स्वॅब नमुने तपासणीसाठी ICMR स्टँण्डर्ड प्रमाणे RT-PCR लॅब मंजूर
·        रूग्णाच्या आरोग्यविषयक तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी VEDIO CONFERNCING ने सुसज्ज टेलिमेडीसीन विभाग
  • संपूर्ण हॉस्पीटलला वातानुकूलन व्यवस्था
  • डॉक्टरांसाठी रेस्ट रूम

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या