कोरोना अलर्ट : प्राप्त 164 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 61 पॉझिटिव्ह
- 67 रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.26: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 225 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 164 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 61 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपिड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 75 तर रॅपिड टेस्टमधील 89 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 164 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव : आदर्श नगर 38 व 52 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, पाजवा नगर 32 वर्षीय पुरूष, खामगांव : 25, 52 वर्षीय पुरूष, सुटाळा 57, 35, 51 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, महावीर चौक 3 वर्षीय मुलगा, 69, 32 वर्षीय पुरूष, देशमुख प्लॉट 35, 15 वर्षीय महिला, राठी प्लॉट 55 वर्षीय पुरूष, रॅलीस प्लॉट 59, 37, 31 वर्षीय महिला, 3, 6 वर्षीय मुलगा, पिं. राजा ता. खामगांव : 15 वर्षीय मुलगा, धाड ता. बुलडाणा : 27, 55,50 वर्षीय पुरूष, 25, 32 वर्षीय महिला, लोणार : 60 वर्षीय पुरूष, दिवठाणा : 65 वर्षीय महिला, चिखली : नगर परिषदजवळ 50, 52, 50 वर्षीय महिला, 22, 52 वर्षीय पुरूष,राऊतवाडी 35 वर्षीय पुरूष, माळीपुरा 38 वर्षीय पुरूष,सरस्वती नगर 26 वर्षीय पुरूष, सिंदखेड राजा : 25 वर्षीय पुरूष, आंबेवाडी ता. सिं. राजा : 32 वर्षीय पुरूष, दे. राजा : अहिंसा नगर 55 वर्षीय पुरूष, लोणी गवळी ता. मेहकर : 47, 12, 13, 35 वर्षीय पुरूष, 17, 70, 30 वर्षीय महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 33 वर्षीय महिला, अमडापूर ता. चिखली : 26 वर्षीय पुरूष, अंचरवाडी ता. चिखली : 95, 16, 45, 9, 14 वर्षीय महिला, 14, 50, 50, 28 वर्षीय पुरूष, दे. राजा : 65, 32 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 61 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 67 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव :31, 56 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, सिवील लाईन 45 वर्षीय पुरूष, शेगांव रोड 55 वर्षीय पुरूष, नॅशनल स्कूलजवळ 38 वर्षीय पुरूष, सीपीडी रोड 30 वर्षीय पुरूष, बस स्थानकाजवळ 55 वर्षीय महिला, जलंब नाका 25 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. खामगांव : 55 वर्षीय महिला, पोस्ट ऑफीसजवळ 44 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल 25 वर्षीय दोन पुरूष, 27 वर्षीय पुरूष, सुटाळा 20 वर्षीय महिला, शिवाजी नगर 38, 46, 42 वर्षीय महिला, वाडी 26, 47, 70 वर्षीय महिला, शंकर नगर 32, 28, 52 वर्षीय पुरूष, 60, 54, 19, 20, 46, 60, 45 वर्षीय महिला, दाल फैल 40 वर्षीय महिला, नवा फैल 75 वर्षीय पुरूष, कोठारी प्लॉट 31 वर्षीय पुरूष, रेखा प्लॉट 8, 45 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, जलालपूरा 50 वर्षीय महिला, भुसारी गल्ली 73, 32, 35, 44, 6, 36 वर्षीय पुरूष, 28, 33, 45, 22, 65 वर्षीय महिला, 6 महिन्याची मुलगी, मलकापूर : 38 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 25, 59 वर्षीय पुरूष, वडगांव हसनपूरा 50 वर्षीय महिला, शेगांव : जमजम नगर 36, 25 वर्षीय महिला, बालाजी फैल 62 वर्षीय पुरूष, चारमोरी 60 वर्षीय महिला, खिरानी मळा 19 वर्षीय महिला, उमेश नगर 46 वर्षीय महिला, दसरा नगर 30 वर्षीय पुरूष, देशमुखपुरा 58 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरूष, धनगर फैल 75 वर्षीय महिला, जानोरी ता. शेगांव : 24 वर्षीय पुरूष, खेर्डी ता. बुलडाणा : 5 वर्षीय मुलगा, कुंबेफळ ता. सिं. राजा : 56 वर्षीय महिला.
तसेच आजपर्यंत 7224 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 653 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 653 आहे.
आज रोजी 233 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7224 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1005 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 653 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 327 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 25 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
ज्ञानगंगा प्रकल्प 68; तर ढोरपगांव लघु प्रकल्प 84 टक्के भरला
- नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.26: सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत असलेला मध्यम प्रकल्प ज्ञानगंगा 68 टक्के व ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये 84 टक्के पाण्याने भरला आहे. या दोन्ही धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण क्षमतेने भरून सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. ज्ञानगंगा नदीकाठावरील 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदूळवाडी, पिं.राजा, घाणेगांव, ज्ञानगंगा (काळबाई), वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, नांदुरा तालुक्यातील नांदुरा, भुईसिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, वरूड, डोलारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा ईसापूर, दादगांव व दौडवाडा गावांचा समावेश आहे. तसेच ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदी काठावरील 6 गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्ञानगंगापूर, कासारखेड, पिं.राजा, भालेगांव, ढोरपगांव व वडजी भेंडी गावांचा समावेश आहे, असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी कळविले आहे.
*********
कोविड केअर सेंटरमधील सुविधांचा दर्जा उच्च ठेवावा
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
- खामगांव येथे कोरोना संसर्ग परिस्थिती आढावा सभा
बुलडाणा,(जिमाका) दि. 26 : कोरोनाचा संसर्ग खामगांव शहरात वाढत आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णाच्या हाय रिस्कमधील व्यक्तींची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या तपासण्यादेखील वाढल्या आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये संशयीत व्यक्ती दाखल करण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत खामगांव शहरातील कोविड केअर सेंटरमधील सुविधांचा दर्जा उच्च ठेवून दाखल व्यक्तींना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिताताई डवरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार श्री. रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
जवळच असलेली व खामगावसाठी धोकादायक ठरणारी अकोला जिल्हा सीमा सील करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री म्हणाले, या सीमेवर मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात यावी. बंदोबस्त चोख ठेवावा. विनाकारण येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. सीमेवर आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी. कारणास्तव येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. संशयीतांना बाहेर काढून विलगीकरण करावे. शहरातील भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात यावी. एकाच ठिकाणी भाजीपाला विक्रीमुळे गर्दी होणार याची काळजी घ्यावी. शहरात ठिकठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना जागा देवून एकाच ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी टाळावी.
पालकमंत्री पुढे म्हणाले, शहरात जरी कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या वाढत असली, तरी घाबरून जावू नये. तपासण्या वाढल्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे. तसेच शहरातील बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही चांगले आहे. शासन, प्रशासन खामगांवच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. येथील कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खामगांवसाठी मास्क, सॅनीटायझर, औषधांचा साठा विपुल प्रमाणात ठेवण्यात यावा. यामध्ये कमतरता येवू नये. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. अत्यावश्यक कामासाठी निघाल्यास तोंडावर मास्क किंवा रूमाल वापरावा, घरात आल्यावर हात धुवावे, लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवानही पालकमंत्री यांनी यावेळी केले. सभेला खामगांव शहरातील व्यापारी, नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment