कोरोना अलर्ट : प्राप्त 165 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 29 पॉझिटिव्ह
- 71 रूग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत एका दिवसात सर्वात जास्त सुट्टी झालेले रूग्ण
बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 194 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 165 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 29 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 86 तर रॅपिड टेस्टमधील 79 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 165 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा : चांदेश्वरी मंदीराजवळ 19, 67, 52 वर्षीय पुरूष, 42, 75, 7, 13 व 60 वर्षीय महिला, खामगांव : देशमुख प्लॉट 13, 40 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, सराफा गल्ली 37 वर्षीय पुरूष, सुटाळा 51 वर्षीय पुरूष, फरशी 36 वर्षीय पुरूष, पुरवार गल्ली 57 व 16 वर्षीय महिला, पिं. राजा ता. खामगांव : 36 वर्षीय महिला, मलकापूर : पंत नगर 65 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 72 वर्षीय महिला, शेगांव : बालाजी फैल 70, 30, 60 वर्षीय पुरूष, 1 महिन्याचे बाळ, 30, 20, 17, 29, 60 वर्षीय महिला, पहुरजिरा ता. शेगांव : 43 वर्षीय महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 29 रूग्ण आढळले आहे. यापैकी दे. राजा येथील 88 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 71 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. एका दिवसात सुट्टी झालेल्या रूग्णांची ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :
मलकापूर : 45 वर्षीय पुरूष, संत ज्ञानेश्वर नगर 11, 16 वर्षीय पुरूष, 73 वर्षीय महिला, मेहकर : जामा मस्जिदजवळ 60 वर्षीय महिला, 15 वर्षीय दोन तरूणी, 9 वर्षीय मुलगा, बुलडाणा : मुठ्ठे ले आऊट 58 वर्षीय पुरूष, कोथळी ता. मोताळा : 47 वर्षीय पुरूष, खामगांव : जलंब नाका 20 वर्षीय पुरूष, 21 वर्षीय महिला, शिवाजी नगर 55, 30 वर्षीय पुरूष, 45, 36 वर्षीय महिला, बाळापूर फैल 22 वर्षीय दोन महिला, 28, 40 वर्षीय महिला, 17, 15 वर्षीय पुरूष, भुसारी गल्ली 53 वर्षीय पुरूष, बोबडे कॉलनी 29, 35 वर्षीय महिला, देशमुख प्लॉट 27 वर्षीय पुरूष, पन्हाळ गल्ली 54 वर्षीय पुरूष, पीडब्ल्यूडी क्वॉर्टर 37 वर्षीय पुरूष, यशोधरा नगर 22 वर्षीय पुरूष, सिवील लाईन 20, 45 वर्षीय महिला, रायगड कॉलनी 28 वर्षीय पुरूष, राठी प्लॉट 29 वर्षीय पुरूष, भालेगांव ता. खामगांव : 66 वर्षीय महिला, दे .राजा : वाल्मिक नगर 65, 31, 36, 37, 30, 11, 9 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी 51, 19 वर्षीय पुरूष, 43, 45 वर्षीय महिला, अग्रसेन चौक् 29 वर्षीय पुरूष, 2 वर्षीय मुलगा, 65 वर्षीय महिला, जुना जालना रोड 57 वर्षीय पुरूष, 45, 23, 51, 20, 17 वर्षीय महिला, बालाजी नगर 34 वर्षीय पुरूष, 56, 26 वर्षीय महिला, दुर्गापुरा 22, 37 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, जुन्या नगर परिषदे जवळ 24, 59 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 52 वर्षीय महिला, जळगांव जामोद : 5 वर्षीय मुलगी, शेगांव : 60 वर्षीय महिला,दसरा नगर 19 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, देशमुखपुरा 28 वर्षीय पुरूष, धनगर फैल 12 वर्षीय मुलगा.
तसेच आजपर्यंत 7060 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 586 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 586 आहे.
आज रोजी 286 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7060 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 944 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 586 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 333 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 25 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
खडकपूर्णा प्रकल्पातून 45 हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात
- सध्या 5 दरवाजे 10 से. मी ने राहणार उघडे
बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रकल्पाच्या उर्ध्व भागात तथा पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला होता. परिणामी हा मोठा प्रकल्प 74 टक्क्यांपेक्षा जास्त भरला होता. त्यामुळे पूर नियंत्रणाकरीता प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता. त्यानुसार नदीकाठावरील जिल्ह्यातील 19 गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. प्रकल्पातून पूर्ण 19 वक्रद्वारे 60 से. मी ने उघडून 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला. सध्या धरण पाटबंधारे विभागाच्या नियमांनुसार उद्दिष्टपातळी पर्यंत आले असल्यामुळे धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
सद्यपरिस्थितीत प्रकल्पाचे 5 दरवाजे 10 से. मी ने उघडे ठेवण्यात आले आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
*********
मस प्रकल्पाने गाठली शंभरी..!
- नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.25: पाटबंधारे उपविभाग खामगांव यांचे अंतर्गत सिंचन शाखा हिंगणा कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मस 100 टक्के पाण्याने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात येणार आहे. या सांडव्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मस नदीकाठावरील खामगांव तालुक्यातील हिंगणा, कारेगांव, संभापूर, शेंद्री, लासूरा जहा, उमरा लासूरा व चितोडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पूर आल्यास ही नदीकाठावरील जिल्ह्यातील गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे. असा इशारा उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी दिला आहे.
**********
No comments:
Post a Comment