खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

 

खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

बुलडाणा, (जिमाका) दि.3:  कोटापा कायद्याअंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकामार्फत खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई  करण्यात आली. यात पथकाने बस स्टँड परिसर, तहसील कार्यालय, शाळा व महाविद्यालया जवळील परिसर, शहरातील शासकीय व निम शासकीय कार्यालयाच्या जवळचा परिसर अशा विविध ठिकाणी कारवाई करुन 17 हजार 200 रूपये  दंड वसूल केला.

 

जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव पोलीस निरीक्षक पवार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वसावे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे लखन सरकटे, अर्चना आराख यांच्या टीमने जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाअंतर्गत कोटापा कायद्यातील कलमानुसार खामगाव शहरात ही कारवाई केली.00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या