पोटखराबा क्षेत्र लागवडीयोग्य होणार; आजपासून 10 एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर
पोटखराबा क्षेत्र लागवडीयोग्य होणार; आजपासून 10 एप्रिलपर्यंत
जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर
बुलढाणा,दि.
06 (जिमाका): जिल्ह्यातील
अभिलेखामध्ये पोटखराब क्षेत्र बऱ्याच शेतकऱ्यांनी सुधारणा करुन लागवडीखाली आणली आहे.
त्यामुळे वर्ग अ मधील क्षेत्र जमीन धारकांना लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात
अतिरिक्त आकारणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. 5 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025
पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात
आली असून या कालबद्ध कार्यक्रमाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नुकतेच जारी
केले आहे.
राज्यातील अधिकार अभिलेखामधील पोटखराब क्षेत्र बऱ्याच शेतकऱ्यांनी
सुधारणा करुन लागवडीयोग्य आणलेले आहे. सदर सुधारणा केलेल्या लागवडीयोग्य क्षेत्राच्या
नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना विविध लाभ मिळत नव्हते. तसेच
जमीनधारकाने पोटखराब वर्ग (अ) खाली येणारी जमीन लागवडीखाली आणली तरी त्यावर कोणतीही
आकारणी करता येत नव्हती. वर्ग अ खाली येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडी खाली
आणता येणार आहे. सदर क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरिता अतिरिक्त आकारणी केली
जाणार असून कालबद्ध कार्यक्रमानुसार टप्पे निश्चित करण्यात आले आहे.
> कालबद्ध कार्यक्रमानुसार...
पहिल्या टप्यात दि. 5 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत ग्राम महसूल
अधिकारी यांनी संबंधित गावातील सर्व सर्व्हे/गट नंबर निहाय पोटखराब वर्ग अ ची माहिती
गाव नमुना नंबर सात बारावरुन तयार करणे.
दुसऱ्या टप्यात दि. 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत ग्राम
महसूल अधिकारी यांनी गावच्या चावडीमध्ये अथवा दवंडीव्दारे कळवून किंवा स्थळ पाहणी करण्यासाठी
नोटीस पाटविणे.
तिसरा टप्यात दि. 17 ते 24 फेब्रुवारीपर्यंत ग्राम महसूल अधिकारी
यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोटखराब वर्ग अ क्षेत्र लागवडीखाली आणले असल्याची खात्री
करुन तसा जबाब पंचनामा व हस्तस्केच नकाशा तयार करणे.
चौथ्या टप्पा दि. 25 फेब्रुवारी ते 4 मार्च परिशिष्ट 1 अ मधील
पात्र स.नं./गट नंबरची एकत्रित यादी परिशिष्ट 1 ब मध्ये तयार करणे.
पाचव्या टप्यात दि. 5 मार्च ते 8 मार्च परिशिष्ट-1 ब बाबतचा
अहवाल ग्राम महसूल अधिकारी यांनी मंडळ अधिकारी यांचेकडे सादर करावे.
सहाव्या टप्यात दि.9 मार्च ते 12 मार्च 2025 पर्यंत मंडळ अधिकारी
यांनी किमान 10 टक्के स.नं. किंवा गट नंबरची स्थळ पाहणी करुन पडताळणी अंती शिफारशीसह
अहवाल तहसिलदार यांचेकडे सादर करणे.
सातव्या टप्यात दि. 9 मार्च ते 12 मार्चपर्यंत तहसिलदार यांनी
गावनिहाय माहिती उप अधिक्षक भुमि अभिलेख यांचेकडे अभिप्रायासाठी पाठविणे .
आठव्या टप्यात दि.13 ते 18 मार्चपर्यंत उपअधिक्षक भुमिअभिलेख
यांनी संबधित सर्व्हे नबंर/गट नंबरच्या मुळ वर्गीकरण नकाशा (सर्व्हे नबंर गाव नकाशा,
प्रतिबुक प्रत फाळणीबुक, मोजणी इत्यादी) अभिलेखावरुन गाव नमुना नं सातबारा दर्शविलेले
क्षेत्र हे पोटखराब वर्ग अ असल्याची खात्री करणे. तसेच आवश्यक त्या अभिलेखांच्या प्रतिसह
आवश्यक असल्यास जागा पाहणी करुन व सुधारित आकारणी ठरवुन अभिप्राय तहसिलदार यांना पाठविणे.
नव्या टप्यात दि. 19 मार्च ते 26 मार्च 2025 पर्यंत तहसीलदार
यांनी त्यांचे अभिप्रायासह अहवाल संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करणे.
दहाव्या टप्यात दि. 27 मार्च ते 31 मार्चपर्यंत जमीन धारकाने
लागवडीखाली आणलेले क्षेत्र पोटखराब वर्ग अ मधील असल्याची खात्री झाल्यानंतर जमीन महसूल
सुधारणा नियम 2018 अनव्ये सुधारीत नियम 2 (2) मधील तरतुदी नुसार उपविभागीय अधिकारी
यांनी अंतिम आदेश पारित करावा.
11 व्या टप्यात दि. 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत या कालावधीत
उपविभागीय अधिकारी यांचे कडील आदेशानुसार उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी गावनिहाय कमी
जास्त पत्रक मंजूर करुन तहसिलदार यांचेकडे गाव वहिवाटीस पाठवावे.
12 व्या टप्यात दि. 6 ते 10 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकारी
यांचेकडील आदेश व उपअधीक्षक भूमिअभिलेख यांचेकडील कमी जास्त पत्रकानुसार ग्राम महसूल
अधिकारी यांनी अधिकार अभिलेखास गाव नमुना नं 1 व 7 मध्ये अंमल घ्यावा.
निश्चित कालबध्द
कार्यक्रमाकरीता संबंधित उपविभागीय अधिकारी व जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख यांची नोडल
अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात असून संबंधित उपविभागाने कालबध्द कार्यक्रम विहित
मुदतीत पुर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
000000
Comments
Post a Comment