जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नाझर गजानन मोतेकर, नंदकुमार येसकर, सुरेश खोडके, मनीषा पाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
0000000
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून फळबागांचे पुनरूज्जीवन
*फळे, फुले, मसाला लागवड, जुन्या बागांना लाभ
बुलडाणा, दि. 31 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड आणि जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यात येते. यात विदेशी फळे, फुले, मसाला लागवड आणि आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यात येत आहे.
राज्यात विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे, तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यामधील घटकांचे अनुदान हे फुले लागवडीसाठी कट फ्लावर्स अल्प भूधारक शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर, इतर शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रूपये प्रति हेक्टर, कंदवर्गीय फुलांसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रूपये प्रति हेक्टर, इतर शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रूपये प्रति हेक्टर, सुटी फुलांसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यांना 40 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकऱ्यांसाठी 40 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
मसाला पिक लागवडीसाठी बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिकांसाठी 30 हजार रुपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के 12 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवर्षिय मसाला पिकासाठी 50 हजार रुपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के 20 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
विदेश फळपिक लागवडीसाठी ड्रॅगन फ्रुट साठी चार लाख रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार रूपये प्रति हेक्टर, स्ट्रॉबेरी साठी दोन लाख 80 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार रुपये प्रति हेक्टर, अवॅकॅडोसाठी 1 लाख रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते. जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी 40 हजार रूपये प्रति हेक्टर मर्यादेत एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.
इच्छुक शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करणे आणि जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा आणि मोसंबी फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment