Tuesday, 16 May 2023

DIO BULDANA NEWS 16.05.2023


जिल्हा नियोजनमधून डायलिसिस सुविधेसाठी 9 कोटी

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

बुलडाणा, दि. 16 : जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला 370 कोटी रूपयांचा निधी यावर्षी प्राप्त होणार आहे. या निधीमधून जिल्ह्यातील रूग्णांसाठी डायलिसीसची सुविधा प्राधान्याने उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून 9 कोटी रूपयांचा निधी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्हा नियोजन व विकास समितीतर्फे येत्या वर्षात करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, श्वोता महाले, कृषि सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून गुणवत्तापूर्ण कामे होण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीमध्ये तीन हजारावर डायलिसीसचे रूग्ण आहेत. या रुग्णांना डायलिसिस साठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या निधीतून सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. गेल्या काळात 140 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात आल्यामुळे रूग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

यावर्षीच्या निधीमून अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यात उघड्यावर अंगणवाडी भरत असलेल्या ठिकाणीची यादी मागविण्यात येणार आहे. या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच 22 आदर्श शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यातून विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आणि शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. या विकासात्मक कामांना विजेची गरज असल्याने या शाळांना सौरऊर्जेची व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.

पोलिस दलाला नविन चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी रूपये देण्यात येणार आहे. यातून 20 चारचाकी आणि दुचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलिस विभागाला करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन मधून जिल्ह्याच्या विकासासाठी आश्वासित निधी प्राप्त होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

000000

व्हॉलीबॉलच्या कौशल्य वृद्धीसाठी खेळाडूंना प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 16 : तामिळनाडू येथील व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी. सी. पांडीयन यांच्या मार्गदर्शनात शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे मुलीसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातून पाच खेळाडू मुलींची निवड करण्यात येणार आहे.

व्हॉलीबॉल खेळाडूचा शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलांसाठी 15 दिवसांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे दि. 17 ते 30 मे 2023 या कालावधीत करण्यास प्रस्तावित आहे. दि. 17 मे 2023 रोजी निवड प्रक्रियेनंतर सुरु होईल. यात 24 खेळाडूंची निवड करण्यात येऊन त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी खेळाडू 1 जानेवारी 2023 रोजी 17 वर्षाखालील असावा. उंची 6 फुट 2 इंच, शाळेत शिकत असलेला किंवा नसलेले खेळाडू शिबीरासाठी पात्र ठरणार आहे. जिल्ह्यातील गावपातळीपासून असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्थांमधील खेळाडू, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20 या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाचे खेळाडूंना प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून पाच खेळाडूची निवड केली जाणार आहे. यात एक सेंटर, एक अटॅकर, दोन युनिव्हर्सल, ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे निवड करण्यात येणार आहे. पात्र खेळाडूनी आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला या कागदपत्रांच्या छायाकिंत प्रतीसह आपल्या नावाची नोंदणी दि. 17 मे 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात खेळाडूंनी स्वत: उपस्थित राहून करावी. खेळाडूंची उंची प्रत्यक्ष खात्री करुन आणि निकष पूर्ण केल्यानंतरच पाठविण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहितीकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे 9970071172 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

मेहकर येथे शुक्रवारी युवाशक्ती शिबीर

बुलडाणा, दि. 16 : मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मेहकर येथील डोणगाव रस्त्यावरील कृषी वैभव लॉन येथे सकाळी ११ वाजता हे शिबिीर होणार आहे.

सदर शिबीरामध्ये दहावी आणि बारावीनंतर शिक्षण, तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी आदीबाबत माहिती तज्‍ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात येणार आहे. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक आणि वित्तीय संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

000000

लेख

लघु पौष्टीक तृणधान्ये : ओळख आणि महत्व

          कृषि क्षेत्राच्या विकास कार्यात लघु तृणधान्य पिके (राळावरईबर्टीनाचणीकोडोबाजरी व इतर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षितच राहिली होतीपरंतु या पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सद्यपरिस्थितीत उत्तम आरोग्यासाठी आणि आहारविषयक जनजागृतीमुळे या पिकाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेया सर्व गोष्टींचा विचार करता केंद्र शासनाने राळानाचणीबर्टीकोडोबाजरी आणि ज्वारी इपिकांचा त्याच्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे पौष्टिक तृणधान्य (Nutri Cereals) या वर्गात समावेश करुन अधिसूचित केले आहे.

          येणाऱ्या काळात सर्व जनतेला जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच आरोग्य संपन्नपौष्टिक शाकाहार उत्तमरित्या मिळण्याकरिता या दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख आणि महत्व घेऊन सुधारित पद्धतीने लागवड करुन उत्पादकता वाढवणे ही काळाची गरज आहे.

बर्टी (Barnyard Millet) :

बर्टी या पिकास सावाशमुलसावऱ्या या नावानेही ओळखतातइंग्रजीमध्ये याला बार्नयार्ड मिलेट म्हणतातगुजरात – सयाहिंदी – झंगोरातमिल – कुधिरवालि तर कन्नडमध्ये ओडलु या नावाने बर्टी परिचित आहे.

          बर्टी हे एकदल वर्गातील पीक असून वाणानुसार 50-13सें.मीसरळ उंच वाढतेपिकास 4-7 फुटव्याची  संख्या असतेपाने गवताच्या पात्याप्रमाणे असून बारिक लव पानावर असतेहे पीक दुष्काळजन्य तसेच अतिपर्जन्यमान असलेल्या भागात तग धरुन राहतेबर्टी या लघु पौष्टीक तृणधान्याची लागवड धान्य आणि चारा अशा दुहेरी उददेशासाठी केली जातेभारतात उत्तराखंडमध्यप्रदेशआंध्रप्रदेशआसामओरिसातमिलनाडुगुजरात आणि महाराष्ट्रात लागवड केली जातेभारतात 0.93 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून 0.73 लाख टन उत्पादन मिळतेसरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टर एवढी आहे.

          उपवासासाठी बर्टीचा वापर भाताप्रमाणे शिजवून केला जातोनवरात्रीमध्ये तसेच इतर उपवासाच्या दिवशी पचन्यास हलके अन्न पदार्थ म्हणूनही अनेकांची पसंती बर्टी भगरीला असते.

आहारातील महत्व :

धान्याचे पोषण मुल्यद्रव्ये प्रति 100 ग्रॅम मध्ये प्रथिने         6.3, स्निग्ध पदार्थ 2.2, कार्बोदके 65.5, तंतुमय पदार्थ 9.8,    खनिज द्रव्ये   4.4, झिंक 3.0 मि.ग्रॅ., लोह 15.0 मि.ग्रॅ.,  फॉस्फरस 280 मि.ग्रॅ., नियासिन 4.20 मि.ग्रॅ. असे आहे.

बर्टी धान्य हे प्रथिनाचा चांगला स्त्रोत असून हे प्रथिने सहज पचण्याजोगे आहेतपिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होत असल्यामुळे आधुनिक जीवनशैलीत कमी श्रमाचे किंवा बैठे काम करणाऱ्यांसाठी बर्टी धान्य वरदान आहेयातील नियासिन घटकामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होतेबर्टी धान्यात असलेल्या लिनोलिकपाल्मेटिक आणि ओलिक या असंपृप्त स्निग्धाम्ले मुळे हृदयरोग  मधुमेहासाठी उपयुक्त आहाररक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी बर्टीचे सेवन प्रभावी ठरतेबर्टी धान्य ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ग्लुटेनची ॲलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त आहार आहे.

सुधारित लागवड तंत्रज्ञान :

जमीन : हलकी ते मध्यम जमीन उपयुक्तपाणी धरुन ठेवण्याची क्षमता उत्तम.

हवामान : उष्ण  समशितोष्ण प्रदेशात येणारे पीकसमुद्रसपाटीपासून 2700 मीउंचीपर्यंतच्या भागात पीक लागवड वार्षिक पर्जन्यमान 200 ते 400 मिमि आवश्यक.

हंगाम : खरीप हंगाम.

पेरणी : बर्टीची लागवड पेरणी पद्धतीने केली जातेजास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड करतात.

पेरणी अंतर :          30 सें.मी. x 10 सें.मी.

बियाणे : ते 4 किप्रति हेक्टरी.

आंतर पिक पद्धती : बर्टी + राजमा (4 : 1) प्रमाणात फायदेशीर.

पिक संरक्षण : खोड माशीचा प्रादूर्भाव पीक सहा आठवड्याचे झाल्यापासून जास्त होतोऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतोक्विनॉलफॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावेमावा आणि लष्करी अळीसाठी क्लोरोपायरिफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात सायंकाळच्या वेळेस फवारावे.

काढणी  मळणी : पक्व झालेले पीक जमिनीलगत कापावे किंवा वाळलेली कणसे पीक उभे असताना कापावेउन्हामध्ये वाळवून बडवावे किंवा मशिनद्वारे मळणी करुन स्वच्छ धान्य उन्हात वाळवून साठवण करावी.

उत्पादन :    धान्य - 18 – 20 क्विंटल प्रति हेक्टरी.

                   कडबा - 20 – 25 क्विंटल प्रति हेक्टरी.

---

डॉ. दिनेश गोपीनाथ कानवडे,

डॉ. चंद्रकांत पंढरीनाथ जायभाये,

कृषि संशोधन केंद्र, बुलडाणा.

00000

No comments:

Post a Comment