Tuesday, 2 May 2023

DIO BULDANA NEWS 29.04.2023

 बालकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित

 

          बुलडाणा, दि. 29 : बालकांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार बालकांची काळजी. संरक्षण आणि उपचाराकरिता आवश्यक असेल अशा कालावधीसाठी बालकाला तात्पुरता ताब्यात घेण्यास सक्षम असेल अशा व्यक्ती, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती योग्य व्यक्ती म्हणून घोषित करेल. सदर व्यक्ती हे मुलांचे सामाजिक पुर्नवसन, कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य करेल.

बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समितीस व्यक्तीची विश्वसनीयता, योग्यता, विद्वत्ता, व्यावसायिक अर्हता, बालकांना हाताळण्याचा अनुभव आणि बालक स्विकारण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असून अशा इच्छुक व्यक्तींनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बसस्थानकामागे, डॉ. जोशी नेत्रालयाजवळ, बुलडाणा येथे अर्ज करावा, अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

बालकांच्या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी अर्ज करावा. यासाठी अर्जदार व्यक्तीस बालकांना हाताळण्याचा अनुभव आणि बालक स्वीकारण्याची इच्छा असावी. सदर व्यक्तीवर अधिनियमातील कोणत्याही अपराधाचा आरोप ठेवण्यात आलेला नसावा किंवा तो कोणत्याही अनैतिक कृत्यात किंवा बालकाशी दूर्वतनाच्या कृत्यांमध्ये किंवा बालकामगारास कामावर ठेवण्यासाठीच्या कृत्यांमध्ये किंवा नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असलेल्या अपराधामध्ये गुंतलेला नसावा. बाल न्याय मंडळ, बालकल्याण समिती गरजेनुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीयतेचा यथोचितरित्या पडताळणी केल्यानंतर आणि जिथे शक्य असेल तिथे अशा व्यक्तीची पोलिसांकडून पडताळणी करून घेतल्यानंतर बालक किंवा बालकांसाठी योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती करेल. बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती किंवा बाल न्यायालय बालकाच्या गरजेवर आधारित व योग्य व्यक्तीशी विचार विनिमय करून ज्या कालावधीसाठी बालक योग्य व्यक्तीकडे राहील तो कालावधी निर्धारित करील. बाल न्याय मंडळ, बालकल्याण समितीचे कोणत्याही वेळी काळजी व संरक्षण यांच्या दर्जाबाबत किंवा इतर कोणत्याही कारणामुळे समाधान झाले नाही तर मंडळास किंवा समितीस कोणत्याही वेळी आदेशाद्वारे अशा मंडळ किंवा समितीच्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपासून योग्य व्यक्ती म्हणून असलेली अशा व्यक्तीची मान्यता काढून घेता येईल. सदर सेवा ही विनामूल्य राहील, योग्य व्यक्तीला या कामाचा कोणताही मोबदला दिला जाणार नाही, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी कळविले आहे.

00000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 29 : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मे महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, दि. 2 मे  2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील, असे पाठवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment