हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
*२० जून पर्यंत अर्ज
करण्याची मुदत
बुलडाणा, दि. 26 : केंद्र शासनाच्या
भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ यावर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी
प्रथम सत्राकरिता एकूण १५ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातून
प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांच्यामार्फत २० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज
करता येणार आहेत.
ओडिशातील बरगढ येथील
भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदविका अभ्यासक्रमाकरीता राज्यातून १३, तर आर्थिक
दुर्बल घटकासाठी १ जागा, तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पसकरीता २ जागांच्या प्रवेशासाठी
अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांकडून प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. प्रवेश अर्जाचा
नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा
नमुना प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयात उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग,
नागपूरचे आयुक्त एम. जे. प्रदिप चंदन यांनी कळविले आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यातील
पात्र विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपायुक्त
वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, बी विंग, सिव्हील लाईन, नागपूर यांच्याकडून
प्राप्त करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0712-2537927 वर
संपर्क साधावा. अर्जाचा नमुना व विहित पात्रता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात
आली आहे.
00000
No comments:
Post a Comment