मान्सूनपूर्व कापूस लागवड टाळा
बुलडाणा, दि.9 :- बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम छेदण्यासाठी मान्सूनपूर्व कापूस लागवड थांबविणे गरजेचे झाले आहे. मात्र या बाबीकडे सतत दुर्लक्ष झाले. यातुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. यावर मात करण्यासाठी कृषि विभागाचा निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण विभागाने जिल्ह्यामध्ये १ जुन नंतरच शेतक-यांना कपाशीचे बियाणे विक्री करण्याच्या सूचना दिलेला आहेत. तसेच १ जुन पूर्वी कृषि निविष्ठा विक्रेत्याने कपाशी बियाण्याची विक्री केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असे आढळून आल्यास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केली तर कपाशीचे उत्पादन मोठया प्रमाणात वाढ होते. असा शेतक-यांचा तर्क आहे.
कापूस उत्पादक पट्टयात मान्सूनपूर्व कापुस लागवड करण्याची प्रथा वाढली आहे. याचा दुष्प्रीणाम म्हणुन गुलाबी बोंडअळीचा प्रकोप् वाढला आहे. सन 2017 मध्ये हा प्रकार प्रकर्षाने दृष्टीस पडला. यावर मात करण्यासाठी सन 2018 ते 2022 या कालावधीत उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. यातुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. गुलाबी बोंड अळीचे चक्र भेदण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशी लागवड थांबविण्याच्या मा. संचालक, (निवगुनि) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्रृ राज्य्, पुणे यांच्या सूचना आहेत. कपाशीची मान्सूनपूर्व लागवड टाळता यावे म्हणून बोंड अळीचा जीवनक्रम भेदण्यासाठी जून नंतरची लागवडच उपयोगी पडणारी आहे. कोषावस्थेत जाणा-या अळीच्या विस्ताराचे चक्र थांबविता येणार आहे. म्हणुन १ जुन पूर्वी कपाशी बियाणांची विक्री करुन नये अशा सुचना जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ कृषि निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
महाडीबीटी पोर्टल प्रणाली शेतकऱ्यासाठी उपलब्ध
बुलडाणा, दि.9 :- सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे कळविण्यात येते की, सद्यस्थितीत सोशल मीडिया मार्फत महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक 15.05.2023 पर्यंत असल्याचे तसेच दिनाक 15.05.2023 नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश/माहिती अज्ञाताने विविध सामाज माध्यमांवर प्रसारित केलेले आहेत.
महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश/माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. “महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असुन सदर अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे.” तरी https://mahadbt.maharashtra.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चिखली व मेहकर व्दारा
छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबीर आयोजन
बुलडाणा, दि.9 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,म.रा.मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली व शासकीय औद्योगिक प्रशक्षिण संस्था मेहकर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 मे 2023 रोजी श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच 19 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता कृषी वैभव लॉन डोणगांव रोड मेहकर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीरामध्ये 10 वी 12 वी नंतर काय करावे, या भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास , बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नविन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांकडून करण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंराजगारासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बुलडाणा जिल्हयातील सर्व विद्याथी्र व पालक यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली व प्राचार्य एस.डी.गंगावणे तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकरचे प्रचार्य व्ही बी शिरसाट यांनी आवाहन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी चिखली व मेहकर येथे होणाऱ्या शिबीराचा लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment