मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा,
दि. 11 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार, दि. 12 मे 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहे.
त्यांच्या
दौऱ्यानुसार, श्री. शिंदे यांचे दुपारी 12.10 वाजता इसरूळ, ता. चिखली येथील हेलिपॅडवर
आगमन होईल. त्यानंतर ते दुपारी 12.20 वाजता संत सेवा ट्रस्ट द्वारा संचालित
महाराष्ट्राचे संत शिरोमणी श्री संत चोखोबाराय यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळ्यास
उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर दुपारी 1.40 वाजता इसरूळ हेलिपॅड येथून छत्रपती
संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण करतील.
00000
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा
बुलडाणा, दि. 11 : सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने घरकुल, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्याच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा आज नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, प्रकल्प संचालक श्रीमती पवार आदी उपस्थित होते.
खासदार जाधव म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने रस्ते बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चिखली मेहकर, चिखली जालना, शेगाव खामगाव या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. शेगाव खामगाव या रस्त्यावरील 120 मीटरचे काम रखडले आहे. आवश्यक ती मदत घेऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच काही रस्ते आणि पुलांचे कामे सदोष झाले आहेत. त्यावर योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी कामे करावीत. राष्ट्रीय महामार्गाची काही ठिकाणी उंची वाढली आहे. त्यामुळे पोचमार्गाची योग्य दुरूस्ती करावी.
सिंचन प्रकल्पांमुळे गावांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहे. जिगाव प्रकल्पातील तीन गावांचे पूनर्वसन अद्यापही होणे आहे. जून 2024 पासून पाणी साठविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पूनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा आधार ठरत आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिककर्जाच्या वेळी सीबिलची अट रद्द करण्यात आली आहे. यावर्षी 1470 कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज मिळण्यासाठी बँकांना सूचना देण्यात याव्यात. जलजीवन मिशन अंतर्गत 681 कामे करण्यात येत आहे. यात असून 16 योजना घेण्यात आल्या आहे. यावर 161 कोटी रूपये खर्च होणार आहे. या योजनांबाबत येणाऱ्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात यावी. कामे योग्य पद्धतीने होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. कामे योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याशिवाय देयक अदा करण्यात येऊ नये.
महिलांसाठी बचतगटांची स्थापना करण्यात येत आहे. यातून ग्रामीण आणि शहरी भागात चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे बचतगटांना योग्य ती मदत करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेतून 44 हजार घरांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. जाधव यांनी दिल्या.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नामुळे लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या असलेल्या गावांची दखल तातडीने घेण्यात यावी. गावात भेट देऊन नागरिकांची समस्या जाणून घ्यावी. तसेच याठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.
000000
बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये
*कामगार विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 11 : बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषास बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नुतणीकरण आणि विविध कल्याकारी योजनांचे लाभ संगणकीकृत प्रणालीद्वारे केले जातात. अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांच्या छाननी आणि तपासणीअंती सदरचे लाभ बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट जमा केले जातात. तथापि सदरचे कामे करुन देण्याबाबत काही खासगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी कोणत्याही अमिष अथवा दबावास बळी पडू नये, तसेच अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.
कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नुतनीकरण आणि विविध योजना लाभ वाटप सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाते. या अर्ज नोंदणीसाठी वार्षिक 1 रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यांची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडुन कोणतेही अतिरिक्त शुल्क आकराले जात नाही.
बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषला बळी पडू नये. त्यांनी आपली नोंदणी व नुतणीकरण नियमाप्रमाणे करुन घ्यावे. अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.
00000000
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण
बुलडाणा, दि. 11 : वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्या टेस्ट ट्रॅकवर घेण्यात येते. सद्यास्थितीमध्ये जादा तापमान वाढलेले असल्यामुळे या चाचण्या सकाळच्या सत्रात करण्यात येणार आहे.
वाढलेल्या उन्हाचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी दि. 15 मे ते दि. 15 जून 2023 या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment