Wednesday, 10 May 2023

DIO BULDANA NEWS 08.05.2023

 पाणी टंचाई निवारणार्थ सावरगाव माळ गावाला टँकर मंजुर

*   सिंदखेड राजा तालुक्यातील 1 गावाचा समावेश

बुलडाणा, दि‍.8 :- जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी (दरडोई दरदिवशी 20 लिटर्स) उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा रण्यात येणार आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ या 1920 लोकसंख्या व 325 पशुधन असलेल्या गावासाठी  40 हजार 475 ली., टँकरव्दारे पाणी पुरवठा  मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल),सिंदखेड राजा  या कार्यालयाने कळविले आहे.

                                                            000000

 

पाणी टंचाई निवारणार्थ मौजे पोखरी गावाला टँकर मंजुर

*   मोताळा तालुक्यातील 1 गावाचा समावेश

बुलडाणा, दि‍.8 :- जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी (दरडोई दरदिवशी 20 लिटर्स) उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा रण्यात येणार आहे. त्यामध्ये मोताळा  तालुक्यातील मौजे पोखरी  या 650 लोकसंख्या व 200 पशुधन असलेल्या गावासाठी  15 हजार 250 ली., टँकरव्दारे पाणी पुरवठा  मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे.                                                            000000

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शिबीराचे आयोजन

बुलडाणा, दि‍.8 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा तर्फे तालुक्यास्तरावर शिबरीराचे आयोजन केले आहे. शिबीर कार्यालयामध्ये शिकाऊ  अनुज्ञप्ती, पक्के अनुज्ञप्तीचे कामकाज करण्यात येते. शासकीय योजनांची जत्रा अभियानाअंतर्गत सर्व जनतेस सदर मे महिन्यात शिबीराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी parivahan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ड्राईव्हिंग लासन्स रिलेटेड सर्व्हीस मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती पक्के अनुज्ञप्ती करीता अर्ज करुन विहीत शुल्क भरून शिबिरास उपस्थित रहावे. शिबीराचे कार्यालय दिनांक 9.5.2023 रोजी मेहकर, 11 मे 2023 ते 25 मे 2023 खामगाव, 12 मे ते 29 मे2023 मलकापूर,15 मे 2023 चिखली, 17 मे 2023 देऊळगावराजा, 18 मे 2023 रोजी लोणार, 19 मे 2023 नांदुरा, 22 मे 2023 सिंदखेडराजा, 24 मे 2023 शेगांव, 30 मे 2023 रोजी मेहकर या ठिकाणी शिबीराचे आयोजन केले आहे, तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

                                                            000000

No comments:

Post a Comment