DIO BULDANA NEWS 3.6.2020


कोरोना अलर्ट : प्राप्त 33 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 06 पॉझिटिव्ह
  •  चार रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका)दि.3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेल्या अहवालांमध्ये 1 महिला व 5 पुरूष आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 25 वर्षीय तरूण, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण आणि खामगांव येथील 36 वर्षीय पुरूषाचा आहे.
  त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगांव व बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे. खामगांव येथील सुट्टी झालेले रूग्ण चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 12 व 16 वर्षीय मुली आहेत. तसेच बुलडाणा येथून सुट्टी झालेल्यांमध्ये चिखली येथील महिला व निमखेड ता. दे.राजा येथील पुरूष आहे.
   आतापर्यंत 1318 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे.  सध्या रूग्णालयात 25 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
   तसेच आज 3 जुन रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझीटीव्ह, तर 33 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 81 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1318 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या