ढाई अखर पत्रलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
- एडेड हायस्कूलच्या अतुल राठोडला राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक
बुलडाणा,(जिमाका) दि.26 : भारतीय डाक विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने सर्व वयो गटातील विद्यार्थ्यांसाठी ढाई अखर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा विषय प्रिय बापू, आप अमर है.. हा होता. बुलडाणा डाक विभागातून या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेमध्ये बुलडाणा येथील एडेड हायस्कूलचा वर्ग 10 वीचा विद्यार्थी अतुल रोहीदास राठोड याने महाराष्ट्र स्तरावरील प्रथम क्रमांकाचे 25 हजार रूपयांचे पारितोषिक पटकाविले आहे.
बुलडाणा डाक विभागाचे अधिक्षक मनोहर पत्की यांनी स्वत: स्वयंस्फुर्तीने या विद्यार्थ्यांचा एडेड हायस्कूलमध्ये जावून गौरव केला. यावेळी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, सोसायटीचे सचिव ॲड बाळासाहेब कविमंडन, मुख्याध्यापक आर. ओ पाटील, बुलडाणा डाक विभागाचे निरीक्षक निलेश वायाळ, सुनील हिवराळे, कर्मचारी प्रमोद रिंढे, नितीन उमाळे, रामेश्वर सोळंकी, विद्यार्थ्याचे वडील रोहीदास राठोड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी एडेड हायस्कूल व बुलडाणा डाक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले,असे अधिक्षक, डाक कार्यालय, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
************
जिल्हाधिकारी कार्यालयात
राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
********
कोरोना अलर्ट : प्राप्त 15 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 13 पॉझिटिव्ह
- तीन रूग्णांनी केली कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 15 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल सुलतानपूर ता. लोणार येथील 42 वर्षीय महिला, काळीपूरा मलकापूर येथील 74 वर्षीय वृद्ध पुरूष, बावनबीर ता. संग्रामपूर येथील 27 वर्षीय पुरूष संशयीत रूग्णाचा आहे. तसेच शादीखाना शेगांव येथील 60 वर्षीय पुरूष, अळसना ता. शेगांव येथील 45 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 27 वर्षीय महिला, रामदास पेठ अकोला येथील 20 वर्षीय तरूण, 8 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्याचप्रमाणे नांदुरा येथील 10 वर्षीय मुलगी, 12 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी व 24 वर्षीय पुरूष संशयीत रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आहे. अशाप्रकारे 13 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
तसेच आज 3 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये जळगांव जामोद येथील 56 वर्षीय पुरूष, भिमनगर मलकापूर येथील 23 वर्षीय महिला व मलकापूर येथीलच 58 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
तसेच आजपर्यंत 2368 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 138 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 138 आहे. तसेच आज 26 जुन रोजी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 13 पॉझीटीव्ह, तर 15 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 68 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2368 आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 183 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 138 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 34 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment