कोरोना अलर्ट : प्राप्त 43 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर चार पॉझीटीव्ह
बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी आज 47 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 43 अहवाल निगेटीव्ह व चार अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. पॉझीटीव्ह अहवाल पातुर्डा, ता. संग्रामपूर येथील 58 वर्षीय पुरूष आहे. तसेच 40 बीघा मलकापूर येथील 10 वर्षीय मुलगा, 40 व 39 वर्षीय पुरूष आहेत. सदर पॉझीटीव्ह रूग्ण हे आधीच्या पॉझीटीव्ह रूग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. तसेच दोन रूगांना आज खामगांव कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगांव येथील 31 वर्षीय पुरूष व नांदुरा येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आतापर्यंत 1611 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 96 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आजच्या दोन रूग्णांसह आतापर्यंत 66 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 66 आहे. सध्या रूग्णालयात 27 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 10 जुन रोजी 47 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 43 निगेटीव्ह, तर चार पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 37 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1611 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
आज दोन रूग्णांची कोरोना वर मात..!
•खामगाव येथील 31 वर्षीय पुरुष व नांदुरा येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश
बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : कोरोना या शब्दाने आज धडकी भरवली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून या शब्दाने भीतीच्या स्वरूपात सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जग देश राज्य करता-करता जिल्ह्यातही कोरोनाने आपली दखल घ्यायला लावली. मात्र प्रशासनाच्या यशस्वी समन्वयातून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग मर्यादित आहे. अनेक रुग्ण कोरोना वर मात करीत घरी परतले आहे. यामध्ये आज आणखी दोन रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 66 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज खामगाव येथील कोविड केअर सेंटरमधून 2 रूग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले. यामध्ये खामगाव येथील 31 वर्षीय पुरुष आणि नांदुरा येथील 45 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. या सर्व रूग्णांना मागील दहा दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. त्यांना मागील 10 दिवसापासून कोरोनाची कुठलेही लक्षण आढळून न आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार सुट्टी देण्यात आली.
आज सुट्टी झालेल्या सदर रूग्णांसह 66 रूग्णांना रूग्णालयातून आजपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाय योजनांमुळे सदर रूग्ण बरे झाले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी स्वागत करून घरी पाठविले. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णही आनंदाच्या भावमुद्रेत बाहेर पडले.
या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात येतात. कोरोना बाधित आढळलेल्या या रूग्णांना शासनाच्या निकषांनुसार वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसल्यामुळे बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. यावेळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment