जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 



जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बुलढाणा, दि.26 (जिमाका) : भारताच्या 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, राजेंद्र पोळ, डॉ. जयश्री ठाकरे, अजिंक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी तंबाखु विरोधी, बालविवाह व भृण हत्या प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या