जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 7 फेब्रुवारीला; प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

 


बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या रिक्त जागांसाठीची निवड चाचणी परीक्षा शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.  या परिक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवड चाचणी परीक्षा शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत इयत्ता 9 वीसाठी जे.व्ही. मेहता हायस्कुल ता.खामगाव जि.बुलढाणा, नॅशनल हायस्कुल ता.खामगाव जि.बुलढाणा व  अंजुमन हायस्कुल ता.खामगाव जि.बुलढाणा या तीन परिक्षा केंद्रावर तर 11 वीसाठी पी.एम. श्री स्कुल, जवाहर नवोदय विद्यालय, ता.शेगांव जि.बुलढाणा व म. बि. बुरुंगले हायस्कुल ता.शेगांव जि.बुलढाणा या दोन परिक्षा केंद्रावर निवड चाचणी परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.

परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र नवोदय विद्यालयाच्या www.navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट सोबत ठेवावी. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या केंद्राची खात्री करून परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत आवश्यक साहित्य घेऊन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन, पी.एम. श्री स्कुल जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या