बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे 31 मे रोजी आयोजन
- 200 पदांसाठी होणार भरती
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यानुसार सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्कील पॅरामेडीकल कॉलेज, वेदीका बिल्डींग, वानखेडे ले आऊट, डॉ. मेहेत्रे हॉस्पीटल जवळ, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
बेरोजगार उमेदवारांना ग्रामीण व दुरक्षेत्रातील मेळाव्याबाबत माहिती होवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याला उमेदवारांनी उपस्थित राहण्यासाठी अवश्यक कागदपत्र सेवायोजन कार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, 2 पासपार्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या मेळाव्यात महिंद्रा अँण्ड महिंद्रा लि. चाकण पुणे, बजाज इलेक्ट्रीकल लि. चाकण पुणे कंपन्या 200 पदांसाठी भरती करणार आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10, 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर असावा. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्र. 07262-242342 वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment