Monday, 9 May 2022

DIO BULDANA NEWS 9.5.2022

 



शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची

- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
*चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचे उद्घाटन
बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :   शेतमालाच्या चांगल्या विपणन पद्धतीमुळे शेतमालाचा दर वाढून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते.  ज्याप्रकारे कपडा, सोने-चांदी व अन्य उत्पादीत होणाऱ्या मालासाठी मार्केटची गरज असते. त्याच प्रमाणे शेतमालसाठी मार्केट पाहिजे.  ही व्यवस्था बाजार समित्यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज केले.
  चिखली एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या उपबाजार संकुलाचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  याप्रसंगी आमदार संजय गायकवाड यांच्यासह राहुल बोंद्रे, रेखाताई खेडेकर, नरेंद्र खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड, कुणाल बोंद्रे, श्री. सुपेकर आदी उपस्थित होते. 
  सर्वप्रथम उपबाजार संकुलाचे  फित कापून व फलक अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल बोंद्रे यांनी केले. आभार मुख्य प्रशासक नंदू सवडतकर यांनी केले. कार्यक्रमाला बाजार समितीचे प्रशासक, माजी पदाधिकारी, व्यापारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment