वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजेनत पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध
· अपात्र कलावंतांनी 27 मे पर्यंत आक्षेप सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयास वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेतंर्गत कलावंतांचे मानधन मंजुरीसाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 1753 अर्ज प्राप्त झाले. प्रतिवर्षी तीन व सहा महिन्यातून एकदा जिल्हा वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समितीची बैठक घेवून इष्टांकानुसार शासन निर्णयान्वये एक वर्षात 100 तर तीन वर्षात 300 कलावंतांची मानधनासाठी निवड करण्याचे निकष आहेत.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 7 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर एकूण 1753 प्राप्त अर्जांची अटी व शर्तीनुसार समाज कल्याण कार्यालयाने छाननी केली. छाननी बाबत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या योजनेतंर्गत सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षातील एकूण 191 पात्र अर्जांची यादी समाज कल्याण, जि.प कार्यालयात उपलब्ध आहे. कार्यालयात दर्शनी फलकावर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ज्या वृद्ध साहित्यिक, कलावंत यांना अपात्र यादीबाबत आक्षेप असल्यास अशा वृद्ध साहित्यिक, कलावंतांना त्यांचे मूळ कागदपत्र यावरून खात्री करून घ्यावी. तरी आक्षेप 27 मे 2022 अखेर आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी, असे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सिंदखेडराजा आयटीआय येथे कालबाह्य अवजारांच्या लिलावाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा यांचे कार्यालय, कार्यशाळेतील कालबाह्य अथवा तुटफूट झालेली अवजारे व भंगर साहित्याच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भंगर खरेदीदाराकडून निविदा आमंत्रित करण्यात येत आहे. या साहित्याची यादी कार्यालयीन वेळेत आयटीआय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व निवीदेतील निर्लेखन साहित्याची संख्या कमी अथवा अधिक करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निवीदा नाकारण्याचे तसेच रद्द करण्याचे अधिकार, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा यांनी राखून ठेवलेला आहे. निविदा विक्री 31 मे 2022 पर्यंत मिळतील. तसेच निवीदा कार्यालयीन वेळेत दिनांक 7 जुन 2022 पर्यंत स्वीकारल्या जातील. तसेच 10 जुन 2022 रोजी सकाळी 12 वाजता निवीदा उघडण्यात येतील. उशिराने आलेल्या निवीदांचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. निवीदेच्या शर्ती व अटी लागू राहतील. निवीदा अर्जाची किंमत 100 रूपये रोख भरून वर नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिं.राजा यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment