Friday, 21 July 2023

DIO BULDANA NEWS 21.07.2023

 

डिजिटल इंडिया सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 21 : केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रद्योगिकी मंत्रालयातर्फे डिजिटल इंडिया सप्ताह दि. 25 ते 31 जुलै दरम्यान डिजिटल इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पुढील सहा दिवस नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत आयटी क्षेत्रातील सायबर सेक्युरीटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजंस, डिजिटल शासन आणि आयओटी या उदयोनमुख तंत्रज्ञान विषयावर तज्‍ज्ञाकडून राष्ट्रीयस्तर ऑनलाइन सेमीनार होणार आहेत. या सेमीनारमध्ये सामान्य नागरीक आणि विद्यार्थी भाग घेऊ शकतात. या सेमीनारमध्ये भाग घेण्यासाठी nic.in/diw2023-reg/ या लिंकवर वैयक्तिकरित्या नोंदणी करावयाची आहे. नोंदणी करताना आपला मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंदवून सबमिट केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी पडताळणी होईल. त्यानंतर डिजिटल इंडिया सप्ताहाच्या सूचना नोंदणीकृत मोबाईल वर प्राप्त होतील.

जिल्ह्यातील महाविद्यालय, विशेषतः औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र निकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डिजिटल इंडिया सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण संबंधित महाविद्यालयाच्या सभागृहात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी करून केंद्र शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड आणि जिल्हा सूचना विज्ञान आधिकारी सुनिल खुळे यांनी केले आहे.

00000

एकविध खेळ संघटनांनी अधिकृतीबाबत माहिती देण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी राज्य ऑलिम्पिक असोसिएशनला संलग्नित राज्य एकविध खेळ संघटनेच्या संलग्नता प्रमाणपत्र, तसेच क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणासह संघटना अधिकृत असल्याबाबतची माहिती, सोमवार, दि. 24 जुलै 2023 रोजी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत तसेच एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात अष्टे डू आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीड बॉल, तेंग सुडो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेस्लींग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलम्बम, वुड बॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पावर लिफ्टींग, बिच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, टेनिस क्रिकेट, जीत कुने दो, फुटसाल, कोर्फबॉल, टेबल सॉकर, हुपकॉन्दो, युग मुं दो, वोविनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेटॅक्यु, लंगडी, जम्परोप, स्पोर्ट्स डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, वुडो मार्शल आर्ट, म्युझिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट आदी खेळाच्या जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

संघटनेची माहिती कार्यालयाला विहित मुदतीत प्राप्त झाली नसल्याने संबंधित खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार नाही. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्‍याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संघटनेची राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

00000

राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 : लहान मुलांना असामान्य शौर्यासाठी आणि शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती तसेच समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी awards.gov.in पोर्टल सुरू करण्यात आले आहे. इच्छुकांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत नामांकने सादर करावीत, असे आवाहन करण्यात जिल्हा बालसंरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

00000

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी

10 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 : राज्यातील अल्पसंख्यांकाना शैक्षणिक आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेतून पायाभूत सुविधा आणि ग्रंथालयासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी पात्र इच्छुक मदरशांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीचे प्रस्ताव दि. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मदरशांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषयांच्या शिक्षण देण्यात येते. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांना अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या निवासी मदरशांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. 10 ऑगस्ट  2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी केले आहे.

0000000

अल्पसंख्याक शाळा, महाविद्यालयांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

बुलडाणा, दि‍. 21 : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण आणि अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेंतर्गत वार्षिक अनुदान उपलब्ध होणार आहे. यासाठी दि. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खासगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा आणि नगर पालिकेच्या शाळांनी कागदपत्रांची पुर्तता करुन परिपुर्ण अर्ज, प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

माजी सैनिकांना रूग्णालयाच्या कार्डचे वितरण

बुलडाणा, दि‍. 21 : जिल्ह्यातील माजी सैनिकांनी माजी सैनिक अंशदायी योजना अंतर्गत ईसीएचएस कार्डसाठी आवेदन केले आहे. या माजी सैनिकांचे कार्ड स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे प्राप्त झाले आहे. या ठिकाणाहून कार्ड घेतलेले नसल्याने सदर कार्ड बुलडाणा येथून प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी सैनिकांनी अंशदायी योजनेंतर्गत ईसीएचएस कार्डसाठी आवेदन सादर केले आहे, अशा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना ईसीएचएस कार्ड वितरीत करण्यात येत आहे. सदर कार्ड भुसावल हेडक्वार्टर येथून वितरीत झालेले नसल्याने कार्ड वितरणाची व्यवस्था माजी सैनिक दवाखाना, बस स्टँन्ड जवळ, करण्यात आली आहे. माजी सैनिकांनी तातडीने कार्ड प्राप्त करून घ्यावे. उर्वरीत कार्ड मिलीटरी स्टेशन, भुसावल येथे जमा करण्यात येतील.

कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी माजी सैनिक आणि त्यांचे अवलंबितांनी टेम्पररी स्लिपची मुळ प्रत, आइडेंटिटी कार्डची झेरॉक्स, पीपीओ झेरॉक्स, डिस्चार्ज बुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, जुन्या कार्डाची मुळ प्रत, मुलगा, आई, वडील यांच्यासाठी 18 वर्षावरील फॉर्म ही कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माजी सैनिक दवाखानाचे प्रभारी अधिकारी निवृत्त कर्नल सुहास जतकर यांनी केले आहे.

000000

मराठवाडा ईको बटालियनमध्ये पदभरती

बुलडाणा, दि‍. 21 : मराठवाडा ईको बटालियन, 136 इन्फंट्री बटालियनमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती फक्त सशस्त्र सेनेतील माजी सैनिक आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, तसेच राज्य शासनाच्या वन विभागातून सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांमधून होणार आहे. जेसीओ सोल्जर जीडी, भरती महाराष्ट्र राज्याकरिता होणार असून ट्रेडसमनसाठी ऑल इंडिया भरती होणार आहे.

पदभरतीमध्ये जेसीओ 6 जागा आणि 220 जागा सोल्जरच्या भरण्यात येणार आहे. ही पदभरती फक्त महाराष्ट्र राज्याकरिता असून भरती ही 101, इन्फंट्री बटालियन, जनरल परेड ग्राउंड, अर्जुन मार्ग, पुणे येथे दि. 24 ते 27 जुलै 2023 पर्यंत होणार आहे.

तसेच क्लार्क जीडी 6 पदे, चेफ कम्युनिटी 5 पदे, वाशरमॅन 2 पदे, ड्रेसर 3 पदे, हाऊस किपर 3 पदे, ब्लॅकस्मीथ 1 पद, मेस किपर 1 पद, आर्टीसन वुड वर्क 1 पद, मेस चेफ 1 पद, असे एकूण 249 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती मुख्यालय, 97, आर्टिलरी ब्रिगेड, संभाजीनगर, मिलीटरी कॅन्ट येथे दि. 31 जुलै ते दि. 4 ऑगस्ट 2023 पर्यंत होणार आहे.

भरती झालेले कर्मचारी मराठवाडा संभागमध्ये वृक्षारोपण गतिविधी, तसेच संपुर्ण युनिट बंदोबस्तासाठी कार्य करतील. संपुर्ण भारतात विविध नेमलेल्या ऑपरेशनल ड्युटी करतील. पेन्शनधारक माजी सैनिक हा निवृत्तीनंतर भर्तीच्या वेळेस पाच वर्षाआतील असावा. माजी सैनिक शेप-1 असावा. कोणत्याही पोलिस किंवा सिवील केसमध्ये सामील नसावा. कॅरेक्टर एक्झेम्पलरी किंवा व्हेरी गुड असावा. भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे ही डिस्जार्च बुक, इएसएम ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, फोटोग्राफ आवश्यक आहेत. भरतीबाबत अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक : 9168168136, 0240-230195 किंवा ईमेल- ecoterriersone36@gmail.com यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment