अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. १७ : अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉऊटींग च ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रिकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे. इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींना किंवा पालकांनी दि. 31 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावे किंवा समक्ष भेटावे. संपर्क करिता मोबाईल क्रमांक 9960900369, 9403207100, 7378641136, 9503078767.
0000000
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून बांधकाम सल्लागाराची नेमणूक
करण्यात येणार
बुलडाणा, दि. १७ :- जिल्हयातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजना लागू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केलेल्या टाईप प्लॅन व अंदाजपत्रकानुसार आवश्यक बांधकामासाठी बांधकाम सल्लागार नियुक्त करवायाचा आहे. नोंदणीकृतव अनुभवी बांधकाम सल्लागार यांनी आपले विहित नमुन्यातील दरपत्रक, 18 जुलै 2023 पर्यंत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, गणेश नगर बुलडाणा येथे सीलबंद पाकिटात सादर करावे विहित नमुना तसेच अटी व शर्ती यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधवा.
0000000
No comments:
Post a Comment