Friday, 7 July 2023

DIO BULDANA NEWS 07.07.2023

 फक्त एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना

बुलडाणा, दि‍. 7 : शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केवळ एक रूपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील काही भागात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी जुलै महिना आला तरी पावसाने हजेरी लावली नाही. यामुळे यंदाच्या वर्षात शेतकरी अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे सरकारने अतिदक्षता म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मान्यता दिली आहे. यंदाच्या वर्षातील खरीप 2023-24 करिता योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. 

शासनाकडून खरीप पीक विमा योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी, स्टॉक एक्सेस टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - 400023, ईमेल pikvima@aicofindi.com टोल फ्री क्रमांक 18004195004 या विमा कंपनीची शासनाकडून निवड केली आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.

      खरीप हंगामातील खरीप ज्वारीमूगउडीदतूरमकासोयाबीनकापूस या ७ पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 31 जुलै 2023पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे. चालू खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ 1 रूपया विमा हप्ता भरावयाचा आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, आठ अ, बँक पासबुकआधार कार्ड, पीक पेरणी स्वयंघोषणापत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीकरिता तालुका कृषि अधिकारी कार्यालयतहसील कार्यालयबँकेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                                        00000000

एका वर्षाच्या आत पिककर्जाचे नूतनीकरण करावे

*जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा, दि‍. 7 :  शेतकऱ्यांना गेल्या वर्षी वाटप करण्यात आलेल्या पिककर्जाचे एक वर्षाच्या आत नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

खरीप पिककर्ज वाटपाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पिककर्ज वाटप करणे, तसेच विद्यमान पिक कर्ज वाढीसह नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बँका शिबीर आयोजित करुन आणि घरोघरी भेटी देवून वेळेवर पीक कर्जाचे वाटपाचे निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार, अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परफेड 365 दिवसांच्या आत किंवा दरवर्षी 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी करणे आवश्यक आहे. पिककर्जाचे नूतनीकरण केल्यानंतर, शेतकरी मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रकमेत वाढ करण्यास पात्र होतील.

शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत प्रत्येकी 3 टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नूतनीकरण केल्यामुळे शेतकरी बँकाच्या इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात. कर्ज चुकते राहिल्यास, पीक कर्ज खाती थकीत खाते बनवतात. आशा शेतकऱ्यांसाठी बचत खात्यातील कामकाजावर मर्यादा येतात. त्यामुळे पिककर्जाचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी पिकर्जाचे नूतनीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                            000000000

मोताळा मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि‍. 7 : सामाजिक न्याय विभागाच्या मोताळ येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी प्रवेश प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त मोताळा येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदुरा रोड, एसबीआय बँकेच्या बाजुला या वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच इतरमागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थिनी प्रवेशास पात्र आहेत.

शालेय, विद्यालयीन आणि महाविद्यालयीन, व्यावसायिक अभ्यासक्रम मोताळा हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालयामधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थिनी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. app.eprashasan.com/onlineadmission/hostel या लिंकचा वापर करुन प्रवेश अर्ज भरता येईल. अमरावती विभागातील कोणत्याही वसतिगृहामध्ये या लिंकद्वारे प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेशाबाबत सर्व अद्ययावत माहिती, सूचना यापुढे सदर लिंक द्वारे मिळेल. विद्यार्थिनींनी प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती एम. व्ही. पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9689792891 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतिगृहाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                            0000000

आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि‍.07 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा येथे शैक्षणिक सन 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

अर्ज प्रक्रिया कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दि. 31 जुलै 2023 आणि इंजिनीअरींग विद्यार्थ्यांसाठी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहिल. जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह गृहपाल एस. एस. चौरपगार यांनी केले आहे.

                                                    0000000

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि‍.07 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज नोंदविल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                000000

वाघुळ वडोदा सावरगाव नेहू रस्ता पर्यायी मार्गाने वळविला

बुलडाणा, दि‍.07 :  सध्या प्रचलित असलेला वाघुळ-वडोदा सावरगाव नेहू रस्ता पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

नांदुरा तालुक्यातील वाघुळ-वडोदा सावरगाव नेहू रस्ता सध्या प्रचलित आहे. या रस्त्याच्या ऐवजी सावरगाव नेहू तसेच या रस्त्यावरील इतर गावांसाठी सावरगाव नेहू मोमिनाबाद ग्रा.मा. 3 या जिल्हा परिषद अखत्यारीत मार्गाचा अवलंब करावा. हा रस्ता दि. 7 जुलै 2023 पासून दि. 18 ऑक्टोंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000




क्रीडा संकुलातील गाळ्यांची भाडे वसुली करावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि‍.07  जिजामाता क्रीडा संकुल व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे तातडीने वसुल करावेत, यासाठी गाळामालकाला सात दिवसांच्या आत भाडे भरण्याची सूचना देण्यात यावी. यानंतरही भाडे भरले गेले नसल्यास गाळे सिल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची सभा पार पडली. यावेळी आमदार संजय गायकवाड, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी संकुलातील क्लब हाऊस भाडेतत्वावर चालविण्यात देण्यात आले आहे. याचे भाडे अवास्तव असल्याने त्यामुळे याठिकाणी नवीन निविदाधारक येत नाही. तीन वेळा निविदा मागवून केवळ एकच निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे क्लब हाऊसचे भाडे कमी करून नव्याने निविदा मागविल्यास त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. यासाठी बांधकाम विभागाने पुन्हा एकदा तपासणी करून नव्याने भाडे निश्चिती करून द्यावी. त्यानंतर नव्याने निविदा मागविण्यात याव्यात.

जिजामाता व्यापारी संकुलात असलेल्या गाळेधारकांकडून सुमारे साडेसात लाख भाडे वसुली होणे आहे. या गाळेधारकांना सात दिवसांची मुदत देण्यात यावी. या मुदतीनंतर गाळे सिल करण्यात यावे. तसेच गाळे खाली करून नव्याने भाड्यावर देण्यात यावे. तसेच काही गाळेधारकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. हे बांधकाम पोलिस आणि नगर पालिकेची मदत घेऊन अतिक्रमण हटविण्यात यावे.

जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटरचा सिंथेटीक ट्रॅकसाठी सुधारीत 12 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ट्रॅक सोबतच इतर विकासकामे करण्यात येणार आहे. यात बॅडमिंटन, कुस्ती, स्केटींग आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. जिजामाता व्यापारी संकुलातील मैदान भाडेतत्वावर देण्यात येऊ नये, त्याऐवजी जिल्हा क्रीडा कार्यालयाने या मैदानाचा विकास करावा, अशी सूचना आमदार संजय गायकवाड यांनी केली.

000000


No comments:

Post a Comment