पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’
- मोसंबी व केळी फळपिकाकरिता 31 ऑक्टोंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत
- आंबा व डाळींब फळपिकासाठी 31 डिसेंबर व द्राक्ष फळासाठी 15 ऑक्टोंबर 2020 अंतिम मुदत
- गारपीट नुकसानीला मिळणार स्वतंत्र संरक्षित विमा रक्कम
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 - सन 2020-21 साठी आंबिया बहारासाठी 5 जुन 2020 च्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा व डाळींब या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना जिल्ह्यात 13 तालुक्यांमध्ये फळपिकांनुसार महसूल मंडळात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच फळपिकांना विम्याचे कवच प्रदान होणार आहे.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान, जादा आर्द्रता, जास्त पाऊस, कमी पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे ही मुख्य उद्देश या योजनेचा आहे. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळ पिके घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिय बहार सन 2020-21 साठी अधिसुचीत फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण फळपिक निहाय धोके (ट्रिगर) लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक हा महसुल मंडळ असणार आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचीत फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग न होणेबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षीत आहे. जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार 2020-21 या हंगामाकरीता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.
आंबिया बहारासाठी शेतकऱ्यांना द्राक्ष फळपिकाकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख 15 ऑक्टोंबर आहे. मोसंबी व केळी फळपिकाकरीता 31 ऑक्टोंबर, संत्रा फळपिकासाठी 30 नोव्हेंबर, आंबा व डाळींबकरीता 31 डिसेंबर 2020 अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अधिसूचीत फळपिकासाठी नजिकच्या ई सेवा केंद्र, बँक / वित्तीय संस्था यांचेशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
फळपिकनुसार विमा संरक्षण कालावधी, शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता व एकूण विमा संरक्षण रक्कम
द्राक्ष : अवेळी पावसासाठी विमा संरक्षण कालावधी 16 ऑक्टोंबर ते 31 मार्च 2021, दैनंदिन कमी तापमान 1 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021, गारपीटकरीता 1 जाने 2021 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत, शेतकऱ्यांन भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 16 हजार व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 3 लक्ष 20 हजार. गारपीटसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रती हेक्टरी 5333 व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टरी 46 हजार 667 मोसंबी : अवेळी पावसासाठी विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020, जास्त तापमान 1 मार्च 2021 ते 31 मार्च 2021, जास्त पाऊस 15 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021, गारपीटकरीता 1 जाने 2021 ते 15 मार्च 2021 पर्यंत, शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 4 हजार व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 80 हजार. गारपीटसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रती हेक्टरी 1333 व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टरी 26 हजार 667 डाळींब : जास्त तापमान विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी 2021 ते 15 मार्च 2021, जास्त पाऊस व आर्द्रता 1 जुलै 2021 ते 31 जुलै 2021, गारपीटकरीता 1 जाने 2021 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत, शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 6500 रू व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 1 लक्ष 30 हजार. गारपीटसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रती हेक्टरी 2167 व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टरी 43 हजार 333 केळी : कमी तापमान विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021, वेगाचा वारा 1 फेब्रुवारी 2021 ते 30 जुन 2021, जास्त तापमान 1 मार्च 2021 ते 31 मे 2021, गारपीटकरीता 1 जाने 2021 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत, शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 7 हजार व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 1 लक्ष 40 हजार. तर गारपीटसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रती हेक्टरी 2333 व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टरी 46 हजार 667. संत्रा : अवेळी पावसासाठी विमा संरक्षण कालावधी 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020, दैनंदिन कमी तापमान 16 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021, जास्त तापमान 1 मार्च 2021 ते 31 मे 2021, गारपीटकरीता 1 जाने 2021 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत, शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 4 हजार व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 80 हजार. गारपीटसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रती हेक्टरी 1333 व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टरी 26 हजार 667. आंबा : अवेळी पावसासाठी विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 31 मे 2021, दैनंदिन कमी तापमान 1 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021, जास्त तापमान 1 मार्च 2021 ते 31 मार्च 2021, गारपीटकरीता 1 फेब्रुवारी 2021 ते 31 मे 2021 पर्यंत, शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 7 हजार व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 1 लक्ष 40 हजार. गारपीटसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रती हेक्टरी 2333 व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टरी 46 हजार 667.
योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकास शासकीय सुट्टी आल्यास सहभागाचा दिनांक पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसापर्यंत लागू राहणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
द्राक्ष : बुलडाणा, बोराखेडी ता. मोताळा, जळगांव, सोनाळा व बावनबीर ता. संग्रामपूर, दे.राजा, सि. राजा व सानोशी मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांगरा, शेंदुर्जन व साखरखेर्डा ता. सिं.राजा, तुळजापूर ता. दे. राजा व म्हसला बु ता. बुलडाणा. डाळींब : पेठ, चिखली, चांधई, धोडप, कोलारा, एकलारा, अमडापूर, उंद्री, शेळगांव आटोळ, हातणी, मेरा खु ता. चिखली, बुलडाणा, धाड ता. बुलडाणा, शेलापूर, बोराखेडी, मोताळा, पिंप्री गवळी व धा. बढे ता. मोताळा, हिवरखेड, पिंपळगांव राजा व काळेगांव ता. खामगांव, सि.राजा, दुसरबीड, शेंदुर्जन, साखरखेर्डा ता. सिं.राजा, दे.राजा, दे.मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा ता. दे.राजा, जामोद व पिंपळगांव काळे ता. जळगांव जा, जांबुळधाबा व नरवेल ता. मलकापूर, लोणार ता. लोणार, डोणगांव, हिवरा आश्रम, शेलगांव देशमुख, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, केळी : बुलडाणा ता. बुलडाणा, मेरा खुर्द ता. चिखली, डोणगांव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, बोराखेडी, मोताळा, धा. बढे, पिंप्री गवळी, पिं. देवी, रोहीनखेड ता. मोताळा, जळगांव व जामोद ता. जळगांव जामोद, संग्रामपूर, बावनबीर, सोनाळा, पातुर्डा ता. संग्रामपूर, हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, पि.राजा ता. खामगांव. संत्रा : डोणगांव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव दे, जानेफळ, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर, लोणार, हिरडव ता. लोणार, हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, आडगांव ता. खामगांव, दे. मही, मेहुणा राजा व अंढेरा ता. दे.राजा, बावनबीर, सोनाळा, संग्रामपूर ता. संग्रामपूर, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा, जामोद ता. जळगांव जामोद, आंबा : सि.राजा ता. सिं.राजा.
*******
आंतर जिल्हा व शिवशाही नवीन बस वाहतुक आजपासून सुरू
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 - विभागातंर्गत आंतर जिल्हा व शिवशाही नविन बस वाहतुक दि. 8 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांना प्रति बस पुर्ण आसन क्षमतेने प्रचलीत दराने प्रवास करता येणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशास मास्क घालणे बंधनकारक राहील. चालविण्यात येणाऱ्या बसेस ह्या पुर्णत: निर्जंतुकीकरण करून चालविण्यात येतील. तसेच प्रवाशी गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असून या नविन बस वाहतुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ह्या बसेसला संगणकीय आरक्षण उपलब्ध आहे. त्यासाठी प्रवाशांनी www.msrtc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा व या नवीन बसवाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक श्री. रायलवार यांनी केले आहे.
असे आहे वेळापत्रक
बुलडाणा आगार : यवतमाळ दुपारी 3.30 वाजता, लातूर सकाळी 8.30 वा, अमरावती दु. 12 व 4 वा, परतवाडा दु 1 वाजता, चिखली आगार : जळगांव खांदेश सकाळी 11.45 वा, मुंबई दु. 4.45 वा, पुणे सायं 6.30 वाजता शिवशाही, खामगांव आगार : नांदुरीगड (सप्तश्रृंगीगड) सकाळी 8.30 वा, मेहकर आगार : त्र्यंबकेश्वर स 7 वा, जळगांव जामोद आगार : पुणे स 8 वा, अमरावती स 11 वाजता, शेगांव आगार : पंढरपूर स 7.30 वा, औरंगाबाद स 6.15 वा, शिर्डी स 9.15 वा शिवशाही, पुणे सकाळी 7 वाजता शिवशाही.
कोरोना अलर्ट : प्राप्त 249 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 22 पॉझिटिव्ह
• 81 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका)दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 271 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 249 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 18 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 139 तर रॅपिड टेस्टमधील 110 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 249 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 10, चिखली तालुका : रानअंत्री 1, बुलडाणा शहर : 4, लोणार तालुका : सरस्वती 1, रायगांव 2, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सातेगांव 1, दे. मही 1, मूळ पत्ता राजूर जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 22 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 81 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद : 2, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 26, खामगांव : 2, दे. राजा : 3, मेहकर : 33, नांदुरा : 2, शेगांव : 7, लोणार : 3, चिखली : 3,
तसेच आजपर्यंत 32895 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6894 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6894 आहे.
आज रोजी 719 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 32895 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7871 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6894 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 875 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 102 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment