धाड येथील भगवा झेंडा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा होणार
- गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी नाही
बुलडाणा,(जिमाका) दि.24: धाड ता. बुलडाणा येथे दसऱ्या निमित्ताने दरवर्षी परंपरेनुसार आठवडी बाजारातील मदीना मस्जिदला लागून असलेल्या समोरील बाजूस डावीकडील असलेला भगवा झेंडा लोखंडी पाईप काढणे. त्यास रंगरंगोटी करणे व नवीन भगवा झेंडा तयार करणे. सिमोल्लंघनापूर्वी नवीन झेंड्याची गावातून मिरवणूक काढून परंपरेप्रमाणे असलेल्या ठिकाणी झेंडा लावण्यात येतो. कोविड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासन परिपत्रकानुसार उत्सव व धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने गर्दी न करता साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसेच 31 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे सदरचा भगवा झेंडा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून कोणत्याही मोठ्या प्रमाणावर गर्दी करता येणार नाही.
दसऱ्याच्या दिवशी नवीन भगवा झेंड्याचे अनुषंगाने काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीस पुर्णत: बंदी असणार आहे. तसेच आठवडी बाजारातील मदिना मस्जिद जवळील असलेले लोखंडी पाईप काढून त्यास रंगरंगोटी करणे आदी कामे सकाळी 7 ते सकाळी 10 या वेळेतच करावी. सदर कामाकरीता कोविड 19 च्या अनुषंगाने शासन नियमांचे पालन करून जास्तीत जास्त 10 व्यक्तींची उपस्थिती ठेवावी. दुपारी 2 ते दुपारी 2.30 या वेळेत जोहरची नमाज संपल्यानंतर दुपारी 3.30 ते दु 4 यावेळेत भगवा झेंडा लावणे व पुजा अर्चा कार्यक्रम करावा. या कार्यक्रमासही कोविडच्या शासन नियमांचे पालन करून जास्तीत जास्त 10 लोकांना उपस्थित ठेवावे. या कार्यक्रमासाठी लाऊड स्पीकरचा वापर करू नये. कार्यक्रमादरम्यान कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देवू नये. या कार्यक्रमादरम्यान मदीना मस्जिद परिसरात कोणीही इसम राहणार नाही.
या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचेवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी. तसेच या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील व कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.
***************
दसरा सण घरातच साजरा करावा; प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.24: दरवर्षीप्रामाणे येत्या रविवार, 25 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी दसरा सणाच्या उत्साहाला कोरोनो विषाणू संसर्गाच्या काळजीची किनार आहे. संपूर्ण जगृ, देश, राज्य कोरोना संसर्गाच्या सावटाखाली वावरत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी दसरा हा सण आपल्या घरातच साजरा करावा. आपल्यामुळे इतरांना किंवा इतरांमुळे आपल्या कुटूंबाला संक्रमणाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुणीही सोने देण्यास कुठेही जावू नये. कोरोना संसर्ग रोखणे आपल्य हातात आहे. त्यामुळे प्रत्येकाने देशकार्य म्हणून कोरोना संसर्गाच्या शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांना सोने देणे व घेण्याचा आग्रह धरू नये. थोडा संयम बाळगला तर, पुढील काळात येणारा प्रत्येक सण उत्साहाने साजरा करता येईल. तरी दसरा हा सण घरातच साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
***********
नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कोविड संसर्गाची जनजागृती करावी
- प्रमोदसिंह दुबे
- जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा संपन्न
बुलडाणा,(जिमाका) दि 24 : सध्या संपूर्ण जगात कोविड या साथरोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे जग भितीच्या सावटाखाली आहे. कोविडवर मात करावयाची असल्यास जनजागृती आवश्यक आहे. शासनाने त्यासाठी नियमावली घालून दिलेली आहे. नेहरू युवा केंद्राने कोविड -19 जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात कार्यक्रम राबविण्यात यावेत. या मध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टंगसींगचे पालन करणे, साबणाने स्वच्छ हात धुणे या सोबतच प्रत्येकाने कोविड-19 विरोधात लढण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा 22 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बोलत होते. या सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक अे.टी. तायडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवथापक नरेश हेडाऊ, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. डी. गोफणे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक सुनिल पाटील, भारत स्काऊट जिल्हा संघटक सुभाष आठवले, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. एम.व्ही.कदम, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानोबा कांदे, एनसीसी अधिकारी प्रा.सुबोध चिंचोले, जिल्हा समाज कल्याण विभागाचे एन.डी.वाकोडे, जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र, लेखालिपीक अजयसिंग राजपूत व स्वयंसेवक सपना मोरे आदी उपस्थित होते.
या सभेत वर्ष 2020-21 चा कार्यक्रम कृतिआराखडा वर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा युवा समन्वयक श्री. नरेंद्र म्हणाले, नेहरु युवा केंद्र संगठन नवि दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वर्ष 2020-21 चा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये युवा मंडळ विकास कार्यक्रम, स्वच्छता ही सेवा अभियान, कोविड-19 जागृती अभियान, राष्ट्रीय –अंतरराष्ट्रीय दिवस व सप्ताह, राष्ट्रीय युवा दिन व सप्ताह, जिल्हा युवा मंडळ पुरस्कार, देशभक्ती व राष्ट्र निर्माण या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, जिल्हास्तरीय युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम, तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी., व शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्री तायडे यांनी हॅण्डवॉश डे सोबतच आरोग्य स्वच्छतेचे कार्यक्रम राबविण्याची सुचना केली. शेवटी सर्व उपस्थितांचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र यांनी आभार मानले. सभेला संबधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment