अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी
शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 च्या शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्ती चा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हयातील रहिवासी असणा-या अनुसूचित जमातीचे विदयार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह परिपुर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 10 आक्टोबर 2020 पर्यंत सादर करावा. दिनांक 10 आक्टोबर 2020 नंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
**********
पाण्याचे होणारे ‘लॉसेस’ गृहीत धरून पिण्याचे पाणी आरक्षीत करावे
- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
- पाणी वापर थकीत रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी भरावी
- पाणी आरक्षण समिती सभा
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. त्यामुळे मुबलक पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. मात्र गत दोन वर्षांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्यामुळे जलाशयांमध्ये पाण्याचा समाधानकारक साठा नव्हता. अशावेळी पिण्याचे पाणी आरक्षण करताना मोठी कसरत करावी लागली. यावर्षी मुबलक पाणी आहे, मात्र या पाण्याचे होणारे बाष्पीभवन, गळती आदी ‘लॉसेस’ लक्षात घेवून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पाणी आरक्षण समितीच्या सभेचे आयोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्र सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.
खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्याचे मागणीनुसार आरक्षण करताना उन्हाळ्यातील या भागातील अतिरिक्त मागणी लक्षात घेत आरक्षण करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, या प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी असते. याबाबत पाण्याचे होणारी हानी लक्षात घ्यावी. ती संबंधीत मागणीदार संस्थांना लक्षात आणून द्यावी. तसेच यापुढे नदीपात्रात पाणी सोडण्याऐवजी या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कराव्यात. चिखली ते मेहकर या महामार्गाच्या कामामुळे काही पाणी पुरवठा योजनांच्या पाईप लाईनचे नुकसान झाले आहे. सदर पाईप लाईन रस्ता कार्यान्वयन यंत्रणेकडून दुरूस्त करून घ्याव्यात. चिखली तालुक्यातील शेलगांव आटोळ या बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी.
ते पुढे म्हणाले, पाणी वापर करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडील पाणी वापर देयकाची थकबाकीची रक्कम तातडीने भरावी. वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग नियमानुसार करावा. विकासासाठी निधी मिळत असल्यामुळे विकास कामांवर प्राधान्याने खर्च करण्यात यावा. जिल्ह्यातील नगर पालिकांनी शासनाच्या निर्देशानुसार आपणाकडील असलेली थकबाकी भरावी. एमआयडीसी खामगांव व चिखली यांनी त्यांच्याकडील थकबाकी भरावी. थकबाकीदार संस्थांनी प्राधान्याने भरावी, अन्यथा विभागाकडून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्याबाहेरील संस्थांनी खकडपूर्णा धरणातील बॅक वाटरची रक्कम भरावी. अशा संस्थांना यापुढे पाणी देवू नये, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. सभेचे संचलन व आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता श्री. योगेश तरंगे यांनी केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मुख्याधिकारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्ही गोलर लघुपाटबंधारे प्रकल्प मृत साठ्यातच
मोताळा तालुक्यातील कोल्ही गोलर हा लघु पाटबंधारे प्रकल्प अजूनही मृत साठ्यातच आहे. या प्रकल्पातून कोल्ही गोलर (गुगळी) व कोल्ही गवळी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार 0.032 दलघमी पाणीसाठा आरक्षीत ठेवण्यात यावा. जिल्ह्यात सर्व प्रकल्प लघु पाटबंधारे 100 टक्के भरले असताना कोल्ही गोलर प्रकल्प मृत साठ्यात असल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.
********
नांदुरा येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी जमिनीची आवश्यकता
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा कार्यालयातंर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाकरीता इमारत बांधकामासाठी नांदुरा जि. बुलडाणा येथे शासकीय जमिन उपलब्ध नसल्याचे तहसिलदार, नांदुरा यांनी कळविले आहे. त्याअनुषंगाने या वसतिगृह इमारत बांधकामासाठी दोन एकर खाजगी जमिनीची विभागास आवश्यकता आहे. ही जमिन विभागास पाहिजे आहे. तरी इच्छुक खाजगी जमिन मालकांनी जागेच्या 7/12 व आवश्यक त्या कागदपत्रांसह 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, डॉ अनिता राठोड यांनी केले आहे.
तृतीय पंथीय समुदायाच्या कल्याणाकरीता नोंदणी अभियान सुरू
- 16 ऑक्टोंबरपर्यंत मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : राज्यातील तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीय पंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ट आहे. तृतीयपंथी / ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न / भेदभावाची वागणुक दिली जाते. नेहमीच भेदभाव व सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या समाज घटकांची सर्वांगिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, या करीता जिल्ह्यातील तृतीय पंथीयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात 16 ऑक्टोंबर 2020 पर्यंत नोंदणी करण्यात यावी. तरी तृतीयपंथीयांनी या अभियानादरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
ई लोकशाही दिनात 11 तक्रारी प्राप्त
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने आज 5 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आला. या लोकशाही दिनामध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमाकाच्या माध्यमातून 11 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 10 तक्रारी शासन परिपत्रकानुसार लोकशाही दिन कक्षेत येत नसल्यामुळे सर्व सामान्य तक्रार म्हणून स्वीकृत करण्यात आल्या. तर एक तक्रार लोकशाही दिनामध्ये स्वीकृत झाली. या लोकशाही दिनात जिल्हा भूमी अधिक्षक कार्यालयाशी संबंधीत एक तक्रार निकाली काढण्यात आली आहे.
ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 80 उमेदवारांचा सहभाग
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यालयामार्फत 27 ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीत पं. दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 80 उमेदवारांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केली.
ऑनलाईन रोजगार मेळाव्यात नवभारत फर्टीलायझर नागपूर, परम स्किल इंडिया ट्रेनिंग प्रा. लि औरंगाबाद, सतिशजी इन्फ्राटेक ॲण्ड मिडीया प्रा. लि चिखली, श्री अभय क्रेन पीव्हीटी एलटीडी शेगांव, सेक्युरिटी ॲन्ड इन्टलीजन्स सर्व्हीस इंडिया लिमीटेड, गुरू मॅनेजमेंट सर्व्हीस प्रा. लि औरंगाबाद या कंपन्यामध्ये 80 उमेदवारांनी सहभाग घेतला, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
*****
कोरोना अलर्ट : प्राप्त 265 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 120 पॉझिटिव्ह
• 140रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका)दि.5 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 385 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 265 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 120 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 114 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 227 तर रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 265 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर शहर : 7, मेहकर तालुका : दे .माळी 1, जानेफळ 7, शेलगांव काकडे 1, मोळा 1, सिं. राजा तालुका : आडगांव राजा 2, पिंपळखुटा 4, देऊळगांव कोळ 3, साखरखेर्डा 1, दुसरबीड 6, शिंदी 3, जागदरी 1, सिं. राजा शहर : 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : हिंगणा 1, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : येरळी 2, वाडी 1, दहीगांव 1, माळेगांव गोंड 1, दे. राजा शहर : 11, दे. राजा तालुका : सातेगांव सावंगी 4, गोंधनखेड 1, अंढेरा 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : जांभूळ 1, रायगांव 1, सावरगांव मुंढे 2, आधा 2, सुलतानपूर 2, चिखली तालुका : अमडापूर 1, शेलगांव 1, कोलारा 1, सावरखेड 1, चिखली शहर : 11, मोताळा शहर : 1, बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : चौथा 1, वरवंड 1, रायपूर 2, घाटनांद्रा 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : वडोदा 1, दसरखेड 2, पिंपळखुटा 1, बेलाड 1, अनुराबाद 1, मूळ पत्ता मानकरखेड ता. बाळापूर जि. अकेाला येथील 1 व पुणे येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 120 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 140 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 35, खामगांव : 15, मेहकर : 15, शेगांव : 1, दे. राजा : 16, जळगांव जामोद : 1, संग्रामपूर : 1, सिं. राजा : 3, चिखली : 21, नांदुरा : 15, लोणार : 4, मलकापूर : 13
तसेच आजपर्यंत 32153 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6654 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6654 आहे.
आज रोजी 611 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 32153 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7768 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6654 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1015 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 99 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
********
बाल संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या प्रतिनिधींकडून अर्ज आमंत्रित
- जिल्हास्तरावरील प्रायोजकत्व व प्रतीपालकत्व मान्यता समितीवर होणार नामनिर्देशन
- 19 ऑक्टोंबर 2020 अंतिम मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 5 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 44 व 45 मध्ये तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण नियम 2018 मधील 25 नुसार प्रतीपालकत्व व 26 नुसार प्रायोजकत्व योजनेबाबत तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हास्तरावर प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मान्यता समिती गठन करण्यात येत आहे. सदर समितीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मार्फत जिल्ह्यात बाल सरंक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी मधून दोन स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनीधीचे सदस्य म्हणून नामनिर्देशन मागविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील बाल सरंक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी प्रायोजकत्व आणि प्रतीपालकत्व मान्यता समितीमध्ये सदस्य म्हणून निवडीसाठी आपला अर्ज 19 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सुवर्ण नगर, बस स्थानकामागे, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे सादर करावेत. तसेच अर्जाची प्रत कार्यालयाच्या dwcd_bul@yahoo.com या ईमेल आयडीवर पाठविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रामरामे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment