Thursday, 15 October 2020

DIO BULDANA NEWS 15.10.2020

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ *कोलवड येथे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केली प्रत्यक्ष सुरुवात बुलडाणा, (जिमाका) दि. १५ -- माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ 14 ऑक्टोंबर रोजी कोलवड येथून करण्यात आला. जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी शनमुख राजन यांनी कुटुंबाची तपासणी करून प्रत्यक्षरित्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. अभियानाच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर हा टप्पा सुध्दा आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ता यांनी यशस्वी करावा. कोरोना विषाणू विरूध्द लढण्यास ही मोहीम निश्चितच निर्णायक ठरत आहे. या मोहिमेदरम्यान घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे. आपली तपासणी करून घ्यावी. कुणीही तपासणीचे सुटता कामा नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ वनिता रिंढे, लसीकरण सह नियंत्रक दीपक महाले, ग्राम विकास अधिकारी श्री. बिबे, आरोग्य सहाय्यक एम. पी. चव्हाण, आर. डी. राऊत, आरोग्य सेविका सुनीता जवंजाल, पूजा जाधव, तसेच गावातील आशा कार्यकर्ता उपस्थित होते. ******* जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. १५ -- देशाच्या माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी श्री घुगे यांची उपस्थिती होती. ******** *कोरोना अलर्ट : प्राप्त 193 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 37 पॉझिटिव्ह* *• 159 रूग्णांना मिळाली सुट्टी* बुलडाणा,(जिमाका)दि.15: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 230 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 193 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 68 तर रॅपिड टेस्टमधील 125 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 193 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे: बुलडाणा शहर :1, बुलडाणा तालुका : डोंगर खंडाळा 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : टेंभुर्णा 1, दे. राजा शहर :3, दे. राजा तालुका : नागणगाव 1, दे. मही 2, लोणार तालुका: रायगाव 1, जळगाव जामोद शहर :1, चिखली तालुका : दीवठाणा 1, मंगरूळ नवघरे 2, सिंदखेड राजा तालुका : साखरखेडा 1, केशव शिवणी 2, निमगाव वायाळ 3, नांदुरा शहर :10, नांदुरा तालुका: पोटळी 1, मलकापूर शहर: 2, मलकापुर तालुका : दुधलगाव 2, तसेच मूळ पत्ता जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान हाजी मलंग दर्ग्याजवळ, बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष व सवणा ता. चिखली येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 159 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली :18, चुनावाला हॉस्पिटल 23, मेहकर : 20, सिंदखेड राजा : 21, खामगाव :2, नांदुरा :8, दे. राजा : 18, लोणार : 14, शेगाव : 3, बुलडाणा: अपंग विद्यालय 25, मलकापूर :6, तसेच आजपर्यंत 35280 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7794 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7794 आहे. आज रोजी 468 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 35280 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8185 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7794 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 278 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********

No comments:

Post a Comment