Monday, 19 October 2020

DIO BULDANA NEWS 19.10.2020

 पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आजपासून आयोजन

·        उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

  • 23 ऑक्टोंबर पर्यंत चालणार मेळावे

बुलडाणा,(जिमाका)दि.19 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 20 ऑक्टोंबर पासून करण्यात येत आहे. सदर मेळावे 23 ऑक्टोंबर 2020 पर्यंत चालणार आहे.  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या  www.rojgar.mahaswayam. gov.in संकेतस्थळावर भरावे.

        या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम., जी. एन. एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर,  पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

    रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 ******

रिक्त पदांची माहिती ऑनलाईन सादर करण्यात यावी

  • जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका)दि.19 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना, अनुदानित अथवा विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये यांनी माहे सप्टेंबर 2020 चे त्रैमासिक विवरण पत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आयुक्तालयाच्यावतीने रोजगार विषयक सर्व सेवा या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा यांच्याकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक, आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपणे अधिसूचीत करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्वये सदर कार्यालयास रिक्त पदांची माहिती सादर करावयाची असते.

  त्यानुसार माहे सप्टेंबर 2020 चे त्रैमासिक विवरण पत्र संकेतस्थळावर 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत ऑनलाईन सादर करावयाचे आहे.  तरी सर्व आस्थापना, उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पद्धतीने सदर संकेतस्थळावर सादर करावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन ई आर 1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. 

बालाजी महाराज वार्षिक उत्सवात मंडपोत्सव, लळीत उत्सवास परवानगी नाही

  • कोविड संसर्गामुळे निर्णय
  • मंदीराच्या अंतर्गत भागात 10 भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक उत्सवास परवानगी

बुलडाणा,(जिमाका)दि.19 : देऊळगांव राजा येथील बालाजी महाराज वार्षिक उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र कोविड 19 या साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात देऊळगांव राजा येथील बालाजी महाराज वार्षिक उत्सवात 24 ऑक्टोंबर रोजी साजरा होणारा मंडपोत्सव, 3 नोव्हेंबर रोजी असणारा लळीत उत्सवाला परवानगी देण्यात आलेली नाही. बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 4 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यासाठी वरील उत्सवांना परवानगी नाकारली आहे.

        तसेच मंदीराच्या आतील कार्यक्रमास जास्तीत जास्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत दि. 25 ऑक्टोंबर रोजी दसरा पालखी मिरवणूक प्रतिकात्मक स्वरूपात करण्याची परवानगी दिलेली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्तीत जास्त 10 व्यक्ती / खांदेकरी सोशल डिस्टसिंग व मास्क वापरून  राहतील. गर्दी होणार नाही तसेच खांदेकरी यांची कोविड 19 ची तपासणी करण्यात येईल, अशा हमीपत्रावर पालखी मिरवणूकीस परवानगी देण्यात येत आहे. पालखीचा मार्ग केवळ मंदीर परीसर (गरूड मुर्ती ते हनुमान मुर्तीपर्यंतचा भाग) इतकाच मर्यादीत राहील. सदर मिरवणूकीदरम्यान भाविक दर्शनासाठी गर्दी करणार नाहीत, तसेच मिरवणूकीमध्ये सहभागी होणार नाही, याबाबतची सर्वतोपरी दक्षता घेण्याची जबाबदारी आयोजक संस्थानची असणार आहे.   

   तसेच दि. 16 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या कार्तिक उत्सवास मंदीराच्या अंतर्गत भागात जास्तीत जास्त 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनींगद्वारे तपासणी करूनच उत्सवात प्रवेश देण्यात यावा. मंदीराचा परीसर वारंवार निर्जंतुकीकरण करावा. मंदीरातील पुजारी व संस्थानचे कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकाकर राहील. मंदीर परीसरात हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था असावी. सदर उत्सवादरम्यान कोविड आजारावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मंदीर परीसरात गर्दी होणार नाही, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, मास्क न वापरल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची सर्व जबाबदारी नगर परिषद व पोलीस विभागाची असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

                                                                        ******

    तुळजा भवानी देवीच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा

  • www.shrituljabhavani.org संकेतस्थळावरून घ्यावे दर्शन
  • कोविड पार्श्वभूमीमुळे मंदीर भाविकांसाठी बंद

बुलडाणा,(जिमाका)दि.19 : उस्मानाबाद जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तुळजापूर येथे नवरात्र उत्सवात श्री तुळजा भवानी देवीची यात्रा असते. याठिकाणी कुलाचार व धार्मिक विधी करण्याकरीता भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यावर्षी मात्र कोरोना संसर्गामुळे येथे श्री. देवीच्या होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवात धार्मिक विधी आवश्यक असलेले पुजारी, महंत, सेवेधारी व मानकरी यांचे उपस्थितीत करावयाचे ठरले आहे. या महोत्सवाचे कालावधीत तुळजापूर शहरात प्रवेश दिल्या जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांनी तुळजापूर येथे दर्शनाकरीता जावू नये. भाविकांच्या दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी शासकीय www.shrituljabhavani.org या संकेतस्थळावर श्री देवीचे दर्शन घ्यावे. त्यासाठी तुळजापूरला जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                            **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 343 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 73 पॉझिटिव्ह

  • 32 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.19: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 416 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 343 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 73 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 69 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 265 तर रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 343 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  संग्रामपूर तालुका : बावनबीर 2, भोन 1, मनसगांव 1,  मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : पुन्हई 1, मोलखेडा 1, तपोवन 1,  बुलडाणा शहर : 8, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 2, सातगांव म्हसला 2, दे. राजा शहर : 3,दे. राजा तालुका : सावखेड भोई 1, सावखेड तेजन 1, असोला 1,गारगुंडी 1,दगडवाडी 1,   चिखली तालुका : बोरगांव काकडे 6, पेठ 1,उंद्री 1, चिखली शहर : 3, सिं. राजा तालुका : सिंदी 1, शेलगांव राऊत 1,  लोणार शहर : 3, लोणार तालुका : वडगांव तेजन 1, नांदुरा तालुका : फुली 1, भोटा 1, नांदुरा शहर : 9, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : उकळी 1,परतापूर 1, कळंबेश्वर 1, शेगांव तालुका : कठोरा 1, शेगांव शहर : 6, जळगांव जामोद शहर : 3,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 73  रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे भोटा ता. नांदुरा येथील 74 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 32 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 7, आयुर्वेद महाविद्यालय 2,  दे. राजा : 5, चिखली : 2, मेहकर : 6, सिं. राजा : 4,

   तसेच आजपर्यंत 36749 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7949 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7949 आहे. 

  आज रोजी 388 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 36749 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8539 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7949 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 476 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 114 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***********

 

  

No comments:

Post a Comment